अमरावती : अमरावतीत amravati छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्यामुळे काही संतप्त कार्यकर्त्यांनी अमरावती महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांच्यावर शाईफेक केली होती. आता या प्रकरणी आमदार रवी राणा mla Ravi rana आणि युवा स्वाभिमान संघटनेच्या 10 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी राजापेठ पोलीसांनी rajapeth police 5 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
रवी राणा आणि इतर 11 आरोपींवर कलम 307 अंतर्गत हत्येचा प्रयत्न करण्याचा आरोप ठेवण्यात आलाय. गुन्हा दाखल झाल्यानंतर आमदार रवी राणा यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर राजकारण केलं. महानगरपालिका, पालकमंत्री, मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष देऊन त्या ठिकाणी पुतळा बसवू दिला नाही. प्रशासनावरही दबाव आणला असल्याचा आरोप रवी राणा यांनी केला आहे. तसेच गृहमंत्र्यांच्या सांगण्यावरुन माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचं आमदार रवी राणा यांनी सांगितलंय.
राजापेठ उड्डाणपुलावरील अनधिकृत पुतळा हटवल्यानं आयुक्तांवर काल शाईफेक करण्यात आली होती. या प्रकरणात युवा स्वाभिमान पक्षाच्या 5 कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. या हल्ल्याच्या निषेधार्थ अग्निशमन दल वगळता सर्व कार्यालयांमध्ये कामबंद आंदोलन करण्यात आलंय. राजपत्रित संघ आणि नगरपालिका प्रशासन, महसूल विभाग ही या आंदोलनात सहभागी झाले. Shaifek – MLA Ravi Rana and 10 other activists charged
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
राजापेठ उड्डाणपुलावरील अनधिकृत पुतळा हटवल्यानं आयुक्तांवर काल शाईफेक करण्यात आली होती. आयुक्तांवर शाईफेक करणाऱ्या सात जणांपैकी पाच आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. भारतीय दंडसहीता कलम 307 म्हणजेच प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. यात पाचही आरोपी युवा स्वाभिमान पार्टीचे कार्यकर्ते असल्याची माहिती मिळतेय.
राजापेठ उड्डाण पुलावरील छत्रपति शिवाजी महाराज पुतळा प्रकरणात महिलांनी संताप व्यक्त केल्याचे दिसून येत आहे. काल बुधवारी (ता. 9) दुपारी मनपा आयुक्त आष्टीकर हे त्यांच्या अंगरक्षक पोलीस कर्मचारी आणि मनपा अधिकारीसह उड्डाणपुलाखाली दाखल झाले. तेवढ्यातच दोन महिला आणि काही शिवप्रेमी दाखल होऊन काहीच वेळात मनपा आयुक्त आष्टीकर यांना पकडून त्यांच्या अंगावर काळी शाई फेकली.
या झटापटीतून आष्टीकर यांनी पळण्याचा प्रयत्न ही केला. मात्र पुन्हा त्यांचा पाठलाग करून त्यांची कॉलर पकडून दोन महिलांनी शाई फेकून त्यांच्या विरोधात घोषणा देऊन तेथून पळ काढला. त्याचंवेळी मनपा आयुक्त आष्टीकर यांच्या अंगरक्षक पोलीस कर्मचाऱ्याने धाव घेऊन त्यांना वाहनापर्यंत नेण्यात आले. या घटनेची माहिती वाऱ्यासारखी शहरात पसरताच महानगरपालिका मधील कर्मचारी-अधिकारी चांगलेच आक्रमक झाले. त्यांनी कामबंद करून मनपा समोर येऊन आंदोलन सुरू केले. या घटनेचा मात्र संपूर्ण जिल्ह्यात निषेध केला जात आहे.
अमरावती महापालिकेत भाजपची सत्ता आहे. या पुतळ्याला महापालिकेने परवानगी द्यावी, अशी मागणी रवी राणा यांनी काही दिवसापूर्वी महापालिकेत केली होती, पुतळ्यावरून जिल्ह्यात राजकारण चांगलेच तापले आहे.
775581 247526Wow, incredible blog structure! How lengthy have you ever been blogging for? you made running a weblog look straightforward. The full look of your internet site is wonderful, well the content! 848179
830406 552053I havent checked in here for some time because I thought it was obtaining boring, but the last few posts are actually very good quality so I guess Ill add you back to my every day bloglist. You deserve it my friend. insurance guides 212483
688750 761411Hello. Neat post. There is an problem along with your web site in firefox, and you might want to test this The browser could be the market chief and a big part of other individuals will miss your fantastic writing because of this problem. 322806