पंढरपूर : गोपाळपूर ते ओझेवाडी व रांझणी शिरगाव तरटगाव Gopalpur to Ojhewadi and Ranjani Shirgaon Taratgaon रस्त्यासाठी आमदार प्रशांत परिचारकांच्या MLA Prashant Paricharak नेतृत्वाखाली आंदोलन आज रास्तारोको आंदोलन झाले. अधिकारी व ठेकेदार यांनी काम सुरू करण्याचे आश्वासन दिल्याचे सांगण्यात आले. यावेळेस आमदार परिचारक यांनी ठेकेदार दिरंगाई करीत असल्याचा आरोप केला.
पंढरपूर तालुक्यातील गोपाळपूर ते ओझेवाडी या रस्त्याचे काम करण्याचे आदेश देऊन आठ महिने तर रांझणी-शिरगांव-तरटगांव या रस्त्याचे काम करण्याचा आदेश देऊन दोन वर्षे झाली. तरीही ठेकेदार हे काम सुरू करीत नसल्याने मागील आठ दिवसाखाली रितसर प्रशासनाला निवेदन देवून ही दखल घेतली गेली नाही. यासाठी गुरुवारी गोपाळपूर चौक येथे आ प्रशांत परिचाराकांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
या रस्त्याला 2019 साली मंजुरी मिळाली आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकालात रांझणी ते सरकोली या रस्त्याला 3 कोटी 72 लाखाचा निधी मिळाला, सरकोली ते ओझेवाडी या रस्त्यासाठी 4 कोटींचा निधी व रांझणी शिरगाव ते तरटगाव या रस्त्यासाठी 2 कोटींचा निधी मिळाला.
BJP’s Rastaroko for road in Pandharpur; Contractor’s delay
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
बागायत क्षेत्र म्हणून ओळख असलेली गाव सरकोली, आंबे, चळे, मुंढेवाडी, ओझेवाडी, रांझणी, अनवली, नेपतगाव व गोपाळपूर 2 लाख ते 2.50 लाख टन ऊस या भागात आहे. म्हणून या भागातील रस्ते चांगले असावे यासाठी प्रयत्न करत आहे. गेल्या दोन वर्षाच्या काळामध्ये रस्त्याच्या कामाला निधी मिळालेला नाही. परंतू गेल्या तीन वर्षामध्ये फक्त 3 किलोमीटर पर्यंतच रस्त्याचे काम झाले. दोन्ही रस्ते पूर्वीचे कार्यकाळामध्ये मंजूर असून सुध्दा सदर रस्ताचे काम अर्धवट असल्याचे प्रशांत परिचारक यांनी सांगितले.
गोपाळपूर ते ओझेवाडी व रांझणी शिरगाव तरटगाव या रस्त्याला निधी मंजूर असूनही रस्त्याचे काम सुरू न केल्यामुळे माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करताच अधिकारी व ठेकेदार यांनी आंदोलनस्थळी येऊन लवकरच हे काम सुरू करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी दिनकर मोरे, वसंतनाना देशमुख, सोमनाथ आवताडे, राजश्रीताई भोसले, लक्ष्मण धनवडे, सुभाष मस्के, कैलास खुळे, प्रशांत देशमुख, माऊली हळणवर, हरीभाऊ गांवधरे, भास्कर कसगावडे, सुनिल भोसले, रोहित पानकर, विक्रम शिरसट, बादलसिंह ठाकुर, सुदाम मोरे, दत्तात्रय ताड, दिपक भोसले, शिवाजी आसबे, नितीन कारंडे, अक्षय वाडकर, दिपक येळे आदींसह नागरिक, शेतकरी व विविध गावांतील सरपंच व भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.