सोलापूर – शहर परिसरात लुटमार करण्याच्या यापूर्वी अनेक घटना घडल्या आहेत. परंतु गावठी पिस्तूल व गुप्तीचा धाक दाखवून आणि लोकांना विवस्त्र करून तसेच अश्लील कृत्य करण्यास भाग पाडून लुटमार करणाऱ्या टोळीस जोडभावी पेठ पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने अटक केली आहे.
ज्या नागरिकाबाबत या अटक आरोपींनी अशा प्रकारचे बेकायदेशीर कृत्य केले आहे. अशाने जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात संपर्क साधावा, अशा पीडित व्यक्तींचे नाव गोपनीय ठेवले जाईल. असे आवाहन पोलीस खात्याच्या वतीने करण्यात आले आहे.
पोलीस उपनिरीक्षक केतन मांजरे यांना मिळालेल्या माहितीनुसार काही तरूण जुना तुळजापूर नाका ते रुपाभवानी मंदिर दरम्यान रस्त्याने ये-जा करणाऱ्या लोकांना त्यांच्याजवळील पिस्तुलाचा धाक दाखवून व मारहाण करून लुटमार करीत असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार महिला पोलीस निरीक्षक विजयालक्ष्मी कुरी व त्यांच्या पथकाने रुपाभवानी मंदिराकडून जुना तुळजापूर नाक्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर सापळा रचून सागर अरुण कांबळे (वय २२, रा. न्यू बुधवार पेठ), बुद्धभूषण नागसेन नागटिळक (वय २६, रा. न्यू बुधवार पेठ, आंबेडकर उद्यानाजवळ) सतीश ऊर्फ बाबुला अर्जुन गायकवाड (वय २५, रा. मिलिंदनगर, बुधवार पेठ), अक्षय प्रकाश थोरात (वय २६, रा. मातोश्री रमाबाई आंबेडकर नगर, न्यू बुधवार पेठ) यांना ताब्यात घेऊन त्यांची अंगझडती घेतली. In Solapur, looting by forcing them to perform obscene acts by undressing, now the appeal of the police
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
त्यावेळी त्यांच्या ताब्यातून एक गावठी पिस्तूल, एक धारदार गुप्ती, चार मोबाइल फोन व दोन मोटारसायकली मिळून आल्या. मिळालेल्या मोबाइल व्हिडिओची दोन पंचांसमक्ष पाहणी केली असता, त्यामध्ये हे युवक त्यांच्याकडील गावठी पिस्तुलाचा व गुप्तीचा धाक दाखवून ये-जा करणाऱ्या लोकांची अडवणूक करीत होते.
अटक केलेल्या आरोपींना न्यायालयात हजर केले असता सात दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. ही कामगिरी पोलीस आयुक्त हरीश बैजल, पोलीस उपायुक्त डॉ. वैशाली कडूकर, सहायक पोलीस आयुक्त डॉ. संतोष गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब भालचिम यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने बजावली.
□ विवस्त्र करून व्हिडिओ शुटींग
आरोपींकडून मिळालेल्या मोबाईल व्हिडिओची दोन पंचांसमक्ष पाहणी केली असता, त्यामध्ये हे युवक त्यांच्याकडील गावठी पिस्तुलाचा व धारदार वृत्तीचा धाक दाखवून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची अडवणूक करणे, दमदाटी करून जिवे मारण्याची धमकी देत होते. तसेच त्यांना विवस्त्र करून त्यांना हस्तमैथुन व अनैसर्गिक संभोग करण्यास भाग पाडून, त्यांना शेण खाऊ घालण्यास भाग पाडत होते. याचे ते मोबाईलवर व्हिडिओ रेकॉर्डिंग करून ते आपापसात व्हाट्स अपद्वारे प्रसारित करत होते, अशी माहिती पुढे आली.