सोलापूर – मोहोळ तालुका परिसरातील देवडी आणि वरवटे येथे विष प्राशन केल्याने दोघांचा सोलापुरातील शासकीय रुग्णालयात उपचार घेताना काल गुरुवारी मृत्यू झाल्याची नोंद पोलिसात झाली आहे.
रमेश पितांबर थोरात (वय 53 रा.देवडी ता. मोहोळ) असे मयताचे नाव आहे. त्याने 7 फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास स्वतःच्या शेतात दारूच्या नशेत विष प्राशन केले होते. त्याला मोहोळ येथे प्राथमिक उपचार करून रोहन (मुलगा) यांनी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तो आज सकाळी मरण पावला.
दुसरी घटना वरवटे येथे घडली. मंदाकिनी गंगाराम वाघमोडे (वय ३५) असे मयत महिलेचे नाव. आहे काल बुधवारी सकाळी तिने खोकल्याचे औषध समजून विषारी द्रव प्राशन केली होती. तिला उपचारासाठी सोलापुरात दाखल केले असता ती दुपारी मरण पावली. या दोन्ही घटनांची प्राथमिक नोंद तालुका पोलिसात झाली आहे .
□ पंढरपूर येथे ट्रकच्या धडकेने दुचाकी चालक ठार
सोलापूर – पंढरपूर येथील अहिल्या चौकाजवळ वेगाने जाणार्या ट्रकच्या धडकेने उमेश रामू चव्हाण (रा.पाथर्डी जि. अहमदनगर) हा दुचाकी चालक गंभीर जखमी मरण पावला. बुधवारी (ता.9) सकाळी 11 वाजेच्या सुमारास तो दुचाकी वरून पंढरपुर ते अहिल्या चौकाच्या दिशेने निघाला होता. जगताप पेट्रोल पंपाजवळ पाठीमागून सिजे 04 – 6852 हा ट्रक धडकल्याने तो गंभीर जखमी होऊन मरण पावला. या अपघाताची नोंद पंढरपूर पोलिसात झाली. पोलिसांनी शुभम पटेल (रा.सतना,मध्य प्रदेश) या ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. हवालदार ढवळे पुढील तपास करीत आहेत. Two killed due to poisoning in Mohol area, one killed in Pandharpur accident
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
□ रेल्वेतून उडी मारल्याने चौदा वर्षाची मुलगी जखमी
सोलापूर – पुणे रेल्वे स्थानकात रेल्वेतून उडी मारल्याने सोलापुरातील विजापूर नाका झोपडपट्टी परिसरात राहणारी एक चौदा वर्षाची मुलगी जखमी झाली. तिला पुणे येथील ससून रुग्णालयात उपचार करून सोलापुरातील शासकीय रुग्णालयात गुरुवारी दाखल करण्यात आले. ७ फेब्रुवारी रोजी सायंकाळच्या सुमारास तिने पुणे स्थानकात रेल्वेतून उडी मारली होती. यामागचे कारण समजले नाही. या घटनेची नोंद सिव्हील पोलीस चौकीत झाली आहे.
□ आष्टी येथे पूर्वीच्या भांडणावरून तलवारीने हल्ला, तरुण जखमी
सोलापूर – पूर्वीच्या भांडणावरून तलवार, लोखंडी गज आणि काठीने केलेल्या मारहाणी तरुण जखमी झाला. ही घटना आष्टी (ता.मोहोळ) येथील चौकात बुधवारी (ता. 9) रात्रीच्या सुमारास घडली.
राम नागनाथ माने (वय 30, रा.आष्टी) असे जखमीचे नाव आहे. त्याला मोहोळ येथे प्राथमिक उपचार करून सोलापुरातील शासकीय रुग्णालयात सुनील खंदारे (भाऊजी) यांनी दाखल केले. काल रात्री दहा वाजेच्या सुमारास गावातील चौकात त्याला अरविंद भीमराव गुंड, लालासाहेब गुंड, शेखर शिंदे, विष्णु शिंदे आणि अन्य पाच जणांनी मारहाण केली. असे प्राथमिक नोंद तालुका पोलिसात झाली आहे .