नवी दिल्ली : काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी १० जनपथ या निवासस्थानाचे ४ हजार ६१० रुपये भाडं भरले नाही. त्याचबरोबर काँग्रेस पक्षाच्या मुख्यालयाचे देखील १२ लाख ६९ हजार ९०२ रुपये भाडं थकीत आहे. एका आरटीआयमध्ये ही बाब उघड झाली आहे. त्यानंतर आता सोनिया गांधी यांचे निवासस्थान आणि इतर इमारतींचे काँग्रेसकडून प्रलंबित भाडे भरण्यासाठी भाजपनं देणगी गोळा करण्याचा निर्णय घेतला आहे.
काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या सरकारी निवासस्थानासह इतर काँग्रेस नेते व पक्षाच्या ताब्यातील सरकारी संपत्तीचे भाडे अनेक वर्षांपासून थकवण्यात आल्याची बाब माहितीच्या अधिकारातून समोर आली आहे. सोनिया गांधींच्या १० जनपथवरील निवासस्थानाचे ४६१० रुपयांचे भाडे जवळपास दीड वर्षापासून थकीत आहे. भाजपच्या नेत्यांनी यावरून काँग्रेसवर निशाणा साधला.
माहिती अधिकार कार्यकर्ते सुजित पटेल यांनी दाखल केलेल्या आरटीआयला केंद्रीय गृहनिर्माण व शहर विकास मंत्रालयाने उत्तर दिले आहे. त्यानुसार काँग्रेसच्या ताब्यातील अनेक संपत्तींचे भाडे प्रलंबित असल्याचे समोर आले आहे.
Millions of rupees rent of Sonia Gandhi’s house exhausted Janpath
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
राजधानीतील अकबर रोडवरील काँग्रेस पक्षाच्या मुख्यालयाचे १२,६९,९०२ रुपयांचे भाडे डिसेंबर २०१२ पासून थकलेले आहे. याचप्रमाणे सोनिया गांधी यांच्या सरकारी निवासस्थानाचेही ४६१० रुपयांचे भाडे थकीत आहे.
सोनियांनी सप्टेंबर २०२० नंतर या भाड्याचा भरणाच केलेला नाही. सोनियांचे खासगी सचिव विन्सेंट जॉर्ज यांच्या चाणक्यपुरीतील सरकारी बंगल्याचे ५,०७,९११ रुपयांचे भाडे बाकी आहे. ऑगस्ट २०१३ पासून या बंगल्याचे भाडे भरण्यात आलेले नाही. गृहनिर्माणच्या
नियमानुसार राष्ट्रीय व राज्याच्या प्रादेशिक पक्षांना जागेची मुभा दिली जाते. प्रत्येक पक्षाला आपले कार्यालय बनवण्यासाठी ३ वर्षांचा अवधी दिला जातो. यानंतर सरकारी बंगला रिक्त करावा लागतो. काँग्रेसला जून २०१० मध्ये पक्ष कार्यालय बनवण्यासाठी जागा देण्यात आली होती. त्यानुसार २०१३ पर्यंत काँग्रेसने अकबर रोडवरील कार्यालय व काही बंगले रिक्त करणे अपेक्षित होते; पण काँग्रेसने असे न करता अनेक वेळा मुदतवाढ घेतली आहे.
भाजपच्या तेजिंदर पाल सिंग बग्गा यांनी या मुद्द्यावरून काँग्रेसवर टीका केली. सोनियांना आता घोटाळे करता येत नसल्याने भाडेही भरता येत नसल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. तसेच राजकीय मतभेद बाजूला सारत सोनियांच्या मदतीसाठी पैसे जमा करण्यासाठी आपण एक मोहीम सुरू केली असून, लोकांना यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. सोनियांच्या बँक खात्यामध्ये १० रुपये पाठवल्याचा स्क्रीनशॉटही बग्गा यांनी ट्विटरवर अपलोड केला आहे. जुलै २०२० मध्ये सरकारने काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांनादेखील महिनाभरात लोधी रोडवरील सरकार निवासस्थान रिकामे करण्याची नोटीस बजावली होती.