पुणे : शिवजयंतीनिमित्त आठ शाळकरी रणरागिणींनी तिकोना गडावरून शिवज्योत मशाल आणून स्त्री शक्तीचे दर्शन घडवले आहे. या आठ शिवकन्यांचे विविध स्तरातून कौतुक होत आहे.
अखंड हिंदुस्थानाचे आराध्यदैवत श्रीछत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे निमित्त साधून 8 मुलींच्या समूहाने ( मोरेवस्ती)येथील फक्त मुलींची टीम,अशा ह्या सर्व कराटे च्या मुलींनी तिकोना किल्ला येथे 12.15 च्या, सुमारास शिवज्योत पेटवून शिवरायांना मानाचा मुजरा करत अभिवादन केले
साधारण रात्री 2 वाजता तेथून मार्गस्थ होऊन तिकोना ते चिखली मोरेवस्ती ( ओम साई सोसायटी) अनवाणी पायांनी पेटती मशाल धावत येऊन त्यांनी 44 किलोमीटरचा टप्पा अगदी सहजगत्या पार पाडला. अगदी जिद्द आणि चिकाटी मनाशी बाळगून राजमाता जिजाऊ यांच्या आचार विचारांची प्रेरणा घेऊन या छोट्या रनरागिणी धावत होत्या. सकाळी आपला प्रवास पूर्ण करून थोडा वेळ तासभर विश्रांती घेतली. पुन्हा त्या कोरीगड, तुंग, आणि विसापूर किल्ला, या ठिकाणी ज्योत लावण्यासाठी पुढे सरसावल्या, तो प्रवास गाडीने जाऊन पूर्ण केला. किल्ला सर केला, तिकोणापासून सुरवात नंतर कोरीगड, तुंग किल्ला, शेवटी विसापूर किल्ला असा प्रवास केला. हा सर्व प्रवास 1 दिवसातच पूर्ण केला. आपला प्रवास न थकता कुठलीही तक्रार न करता यशस्वी पणे पार पाडला. Schoolgirl Ranaraginis brought Shivajyot torch and performed ‘Stri Shakti’
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
महाराष्ट्राला लाभलेलं हे गड किल्यांचं अप्रतिम सौंदर्य,अभिमान वाटावा, छत्रपती शिवाजीराजांच्या ह्या भूमीत अशा लेकीं जन्माला येणं खूप भाग्याच समजतो, ह्या रणरागिणीच कौतुक करावे तेव्हढ थोडंच, आज पर्यंत ऐकलं होतं पाहिलं होतं, फक्त पुरुषमंडळी आणि तरूण वर्ग यांनाच मशाल घेऊन येताना पाहत आलोय, तिकोना किल्ल्यावरील सेवेकरी बाबानी देखील त्यांचं कौतुक करत ते बोलले, की मी इथे बरीच वर्षे झाली गडाची देखभाल आणि सेवा करत असल्यापासून, पहिल्यांदा असे मुलींनच्या समूहा एव्हड्या रात्री उत्साहाने गड चढत येऊन शिवज्योत लावण, खरं खूप अभिमानाची गोष्ट आहे, मी 1 मुलगी म्हणून हे करू शकते, मी कुठे ही मागे राहणार नाही, स्त्रीयांना कुठल्याही क्षेत्रात कमी लेखू नका, अशा आशयाचा जणू संदेश ह्या समाज मनात निर्माण करण्याचा त्यांचा एक छोटासा प्रयत्न आणि कुठलीही तक्रार न करता पार पाडल्याचे त्या सेवेकरीनी सांगितले.
□ शिवकन्याविषयी थोडक्यात
वृदुला पवार, भक्ती दहिफळे, सानिका माने, श्रावणी पाटील, माधुरी पाटील, नेत्रा ढगे, श्वेता निमन,दीप्ती पाटील असे या शिवकन्येची नावे आहेत. या आधी त्यांनी बरेच किल्ले, गड सर केलेत, ह्या उपक्रमास त्यांना नेहमी प्रोत्साहित करणारे, त्यांना नेहमी सपोर्ट करणारे त्यांचे प्रशिक्षक प्रफुल यांचे सहकार्य लाभले.