मोहोळ : टाकळी (सि) येथील भीमा सह.साखर कारखान्याच्या मोलॅसिस टाकीचा स्फोट होऊन मरण पावलेला मृताच्या घरी भीमा कारखान्याचे चेअरमन धनंजय महाडिक यांनी भेट दिली. कामगाराच्या मुलास नोकरी व तीन लाखाची मदत करून सांत्वन केले.
कामगार विष्णू बचुटे यांच्या कुटुंबातील सदस्यास भेटून त्याच्या दुःखात सहभागी होत कायम स्वरूपी नोकरी व ३ लाख रुपयेचा धनादेश देत मदतीचा हात देऊन कारखान्याचे चेअरमन तथा माजी खासदार धनंजय महाडिक त्या कुटुंबाच्या दु:खात सहभागी असल्याचे सांगितले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,’ गुरूवारी (ता. 24) भिमा सह.साखर कारखान्यावर मोलॅशिस (द्रवरूप) टाकीचा स्फोट होऊन कामगार विष्णू महादेव बचुटे या कागाराचा मृत्यु झाला होता. बचुटे यांच्या पश्चात पत्नी व एक मुलगा महेश असा परिवार आहे. त्या कुटुंबातील सदस्यास आधार मिळावा म्हणून कारखान्याचे चेअरमन तथा माजी खासदार धनंजय महाडिक, उपाध्यक्ष सतिश आण्णा जगताप व संचालक मंडळानी कुटूंबातील सदस्याची भेट घेतली.
मदत म्हणून ३ लाख रूपये व मुलास कायम वर्कऑर्डर देऊन कामावर घेतले. या वेळी बोलताना महाडिक म्हणाले, ‘ कामगार हा माझ्या परिवारातील सदस्य होता व नंतर कामगार होता. ही घटनाच दुर्दैवी होती. त्यांच्या अचानक जाण्याने आपल्या सर्वांना खूप दु:ख झाल्याचे म्हणाले.
Bhima factory provides job and Rs 3 lakh assistance to the son of a deceased worker
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
या वेळी संचालक दादासाहेब शिंदे, माजी संचालक प्रकाश बचुटे, पांडूरंग बचुटे, सुभाष बचुटे, दाजी बचुटे, पोलीस पाटील शिताराम भुसे, विकास शिंदे, डॉ. गुड, सिध्देश्वर पाटील, अर्जुन शिंदे, युवराज विलास शिंदे, संतोष मांढरे, अविनाश राऊत उपस्थित होते.
□ कंटेनरला अडवून तीन गाड्या पळवणा-या तिघांना तेलंगणामधून अटक
मोहोळ : नवीन किया कंपनीच्या कार गाड्या घेऊन निघालेल्या कंटेनरला इंडीका कार आडवी लावून चालकाला मारहाण करित तीन गाड्या पळवून नेल्या होत्या , त्या गाड्या व तीन जणांना तेलंगणामधून ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक अमोल भारती यांनी दिली.
याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, एम एच १२ एन एक्स ९८३४ या कंटेनरमधून चालक शिवम कुमार पांडे (वय-२८, रा. दामोदरपूर, ता. जि. बलिया) हे दोन पांढऱ्या रंगाच्या किया व एक काळ्या रंगाची किया अशा एकूण तीन कार या बेळ्यारी ते अहमदाबाद असे २४ फेब्रुवारी रोजी विजयपूर येथून घेऊन निघाला होता. दि. २५ रोजी पहाटे दोन वाजताच्या दरम्यान मोहोळ ते मंद्रूप रस्त्यावर नजीक पिंपरी हद्दीमध्ये राजस्थानी ढाब्याजवळ सदरचा कंटेनर आला.
याचवेळी अज्ञात इंडिका कार त्या कंटेनरच्या समोर आडवी लावली तसेच ऑइल बॉक्सला त्यांनी काहीतरी फेकून मारले. त्यामुळे चालकाने काहीतरी नुकसान झाले आहे का, म्हणून कंटेनर सावकाश रोडच्या खाली घेतला असता इंडिका कारमधील चार अज्ञात चोरट्यांनी कंटेनर चालकाला पकडून मारहाण केली. त्या चार चोरट्यांनी गाडीचा पडदा वर करून पाहिला असता सदर कंटेनरमध्ये कार असलेले दिसले. यातील तीन नवीन विना नोंदणी केलेल्या या कंपनीच्या तीन गाड्या धमकी देत मारहाण करून चोरून नेल्या.
याप्रकरणी चालक शिवम कुमार पांडे यांनी मोहोळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यानुसार उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल भारती, मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला त्यांच्या मागावर पाठवले होते. पोलीस उपनिरीक्षक संतोष माने, पोलीस हेड कॉन्स्टेबल शरद डावरे, पांडुरंग जगताप यांचे पथक हैदराबाद कडे रवाना झाले होते.
या तीन पैकी दोन गाड्यांना GPS सिस्टीम होती. त्यामुळे या गाड्या तेलंगणामध्ये नेमक्या कोणत्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत आहेत हे लक्षात आले. त्यानुसार तेथील पोलिसांशी संपर्क साधून या गाड्यांवर लक्ष ठेवण्यास सांगितले. तोपर्यंत मोहोळ पोलिस त्या ठिकणी पोचले एक चोरटा व दोन जण गाड्या विकत घेवून कमीशनवर पुढे विकणारे असे तिघांना ताब्यात घेण्यात आले.
नियाज रशीद मोहमद (वय ३०) हरियाना शोयब महंमद सय्यद (रा हुबळी कर्नाटक) शेखर गोडा दुडडन गौडा हळी (रा बेल्लाळी कर्नाटक) यांना ताब्यात घेतले. मिळालेल्या माहितीच्या आधारे पुढील आरोपीचा तपास सुरु असल्याचे अमोल भारती यांनी सांगितले.