● सोने स्वस्त होण्याची दाट शक्यता
मुंबई : राज्यात CNG स्वस्त होणार आहे. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज अर्थसंकल्पात याबाबत मोठी घोषणा केली आहे. ‘पर्यावरण पूरक नैसर्गिक वायूचा घरगुती वापर होतो, CNG वर चालणाऱ्या वाहनांना फायदा होतो, मूल्यवर्धित कर VATचा दर हा 13.5 टक्क्यांवरून 3 टक्के करायचा प्रस्ताव आहे. यामुळे 800 कोटी महसुली घट होईल,’ असे अजित पवार यांनी म्हटले आहे. मात्र ठाकरे सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील कर कमी केला नाही.
पेट्रोल-डिझेलचे भाव गगनाला भिडले असल्यामुळे अनेकांनी आपला मोर्चा CNG गॅस वर चालणाऱ्या वाहनांकडे वळवला आहे. दरम्यान त्या किमतीदेखील मध्यंतरी वाढीस लागल्या होत्या. परंतु आता CNG, PNG गॅस वापरणाऱ्यांसाठी एक खुशखबर आहे. आज उपमुख्यमंत्री अन अर्थमंत्री असणारे अजित पवार यांनी राज्याचा 2022-23 चा अर्थसंकल्प सादर केला.
पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढणार आहेत. परंतु राज्यात सीएनजीवरील मूल्यवर्धित कर साडेतेरा टक्क्यांवरून तीन टक्के करायचा प्रस्ताव मांडला आहे. पर्यावरण पूरक सीएनजी या नैसर्गिक वायूचा घरगुती वापर होतो. त्याचा सीएनजीवर चालणाऱ्या वाहनांनाही मोठा लाभ होतो. राज्यात सीएनजी स्वस्त झाला तरी पेट्रोल-डिझेलच्या बाबतीत सरकारनं करकपात केलेली नाही. त्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या बाबतीत कुठलाही दिलासा मिळालेला नाही.
अर्थमंत्री अजित पवारांनी नैसर्गिक वायूचा वापर वाढवण्याच्या दृष्टीने घरगुती पाईप गॅस, सीएनजीवर चालणारी वाहने, याचा वापर वाढावास यासाठी ही घोषणा केली. यामुळे राज्यात CNG आणि PNG गॅस स्वस्त होणार असून सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या अर्थसंकल्पात त्यांनी महत्वाची घोषणा केली.पर्यावरण पूरक नैसर्गिक वायूच्या वापरास प्रोत्साहन आणि सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळण्यासाठी मूल्यवर्धित कराचा दर 13.5 टक्क्यांवरून 3 टक्के इतका केला आहे. त्यामुळे राज्याच्या तिजोरीत अंदाजे 800 कोटी रुपयांची महसुली घट होणार आहे. CNG is cheaper in Maharashtra, but there is no consolation about petrol
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
अजित पवारांच्या या घोषणेमुळे राज्यात CNG आणि PNG गॅस स्वस्त होणार असून सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान या अर्थसंकल्पामध्ये पेट्रोल-डिझेल या इंधनावरील करात कपात होईल अशी अपेक्षा सर्वसामान्यांची अशा होती.
पण ती आशा फोल ठरली आहे. परंतु राज्यात CNG आणि PNG गॅस स्वस्त होणार असल्याने तेव्हडा दिलासा सर्वसामान्यांना मिळाला आहे.
दरम्यान आणखी एक निर्णय जो यावेळी घेण्यात आला. त्यानेदेखील सर्वसामान्यांना चांगला दिलासा मिळू शकतो. कारण असे की, महाराष्ट्रात आयात होणाऱ्या सोने चांदीच्या डिलिव्हरी ऑर्डरच्या दस्तांवर महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमानुसार आकारण्यात येणाऱ्या 0.1 टक्के मुद्रांक शुल्क माफ करण्याची घोषणा अजित पवारांनी केली आहे. त्यामुळे सोने स्वस्त होण्याची दाट शक्यता आहे. या मुद्रांक शुल्क माफीमुळे राज्याला शंभर कोटींच्या महसुलीची तूट येण्याची शक्यता आहे.
□ 16 जिल्ह्यात स्त्री रोग रुग्णालय, आरोग्य विभागासाठी 11 हजार कोटी
#surajyadigital #budget #Budget2022 #सुराज्यडिजिटल #बजेट
हिंगोली, वर्धा, यवतमाळ, बुलडाणा, सांगली, सातारा, कोल्हापूर, सिंधुदूर्ग, भंडारा, जळगाव, अहमदनगर, धुळे, सोलापूर, रत्नागिरी, औरंगाबाद व रायगड येथे प्रत्येकी 100 खाटांचे स्त्री रोग रुग्णालय स्थापन करण्यात येणार आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करताना ही घोषणा केली आहे. आरोग्य विभागासाठी 11 हजार कोटींच्या निधीची भरीव तरतूद करण्यात आली आहे. तर कर्करोग व्हॅनसाठी 8 कोटींची तरतूद आहे.
□ लता मंगेशकर विद्यालयासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात 100 कोटींची तरतूद
विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जात आहे. या अर्थसंकल्पामध्ये मुंबईतील कलिना विद्यापीठात गानसम्राज्ञी लता मंगेशकर विद्यालयासाठी 100 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे लता दीदींच्या चाहत्यांनी आनंद व्यक्त करत कौतुक केलं आहे.
□ शेतकऱ्यांना दिलासा, 964 कोटी 15 लाख रुपयांचे कर्ज माफ
#कर्ज #loan
#कर्जमाफी #farmers #शेतकरी #budget #Budget2022 #सुराज्यडिजिटल #surajyadigital #DebtForgiveness
राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करताना मोठी घोषणा केली आहे. भूविकास बँकांचे 34 हजार 788 कर्जदार शेतकऱ्यांना दिलासा देण्यात आला आहे. या शेतकऱ्यांचे तब्बल 964 कोटी 15 लाख रुपयांचे कर्ज माफ करण्यात आले आहे. तसेच भूविकास बँकांच्या जमिनींचा, इमारतींचा वापर यापुढे शासकीय योजनांसाठी केला जाणार आहे.
□ अर्थसंकल्प #Budget2022 #surajyadigital
– मुंबई ते हैदराबाद बुलेट ट्रेनचा प्रस्ताव स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवासाठी 500 कोटींची तरतूद
#budget #अर्थसंकल्प
– महाबळेश्वर, अजिंठा, वेरुळचा सर्वांगिण विकास करणार, सुविधा केंद्र सुरु करणार
#सुराज्यडिजिटल #mumbai #हैदराबाद #haidrabaad
– मुंबई ते हैदराबाद बुलेट ट्रेनचा प्रस्ताव
#pune #nagpur
– मुंबई, पुणे, नागपूरमध्ये स्वातंत्र्यलढा हेरिटेज वॉक सुरु करणार
□ अर्थसंकल्प – अजित पवारांची घोषणा
#surajyadigital
– भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभ सुशोभीकरण
#AjitPawar #budget
– संदेशवहन उपग्रहण, ड्रोन टेक्नॉलॉजी जागतिक तंत्रज्ञानाच्या युगात युवकांना संधी मिळावी म्हणून इनोव्हेशन हब सुरु करण्यात येणार प्रत्येक विभागात स्थापना होणार
#Budget2022
– उच्च आणि तंत्रशिक्षण विभागासाठी 1 हजार 619 कोटींची तरतूद
#सुराज्यडिजिटल
– महिला आणि बालविकास विभागासाठी 2 हजार 472 कोटींची तरतूद