सोलापूर – बार्शी तालुक्यातील गौडगाव येथे राहणारे बीएसएफ जवान रामेश्वर वैजनाथ काकडे यांना वीरमरण आले आहे. बुधवारी (ता.16) रात्री उशिरा काकडे कुटुंबियांना सैन्य दला मार्फत देण्यात आली आज गुरुवारी सायंकाळी 5 च्या सुमारास शहीद जवान रामेश्वर काकडे त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
छत्तीसगडमधील रायपूर येथे बुधवारी पहाटे नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत ते शहीद झाले. गुरुवारी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास काकडे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. Barshi jawan Rameshwar Kakade martyred, cremated at Government Itama this evening
#सोलापूर जिल्ह्यातील गौडगाव इथले निवासी आणि सीमा सुरक्षा दलामध्ये कार्यरत असलेले रामेश्वर काकडे यांना छत्तीसगढमध्ये वीरमरण आलं आहे. रामेश्वर काकडे यांना दहशतवाद्यांशी लढताना तीन दिवसांपूर्वी गोळी लागली होती. त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाल्याची बातमी काल समजली. pic.twitter.com/9R55GeS4ZK
— AIR News Pune (@airnews_pune) March 17, 2022
काकडे 2012 साली सैन्यदलात रुजू झाले होते. सध्या ते छत्तीसगड राज्यातील रायपूर भागात कार्यरत होते.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
रामेश्वर काकडे यांना दहशतवाद्यांशी लढताना तीन दिवसांपूर्वी गोळी लागली होती. त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाल्याची बातमी बुधवारी समजली. 2012 शहीद जवान रामेश्वर काकडे हे सैन्यदलात रुजू झाले होते, त्यानंतर त्यांनी विविध राज्यातील सेवा बजावली होती. छत्तीसगडमधील रायपूर भागात कार्यरत होते, बुधवारी पहाटे झालेल्या नक्षलवादी हल्ल्यात त्यांना वीरमरण आले आहे.
सोशल मिडीयावर शहीद काकडे यांचा फोटो पिंपळाच्या पानावर कोरून अभिवादन केल्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय.