चंदीगड : पंजाबचे नवीन मुख्यमंत्री म्हणून भगवंत मान यांनी शपथ घेतली आहे. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी मान यांनी महत्त्वाची घोषणा केली. 23 मार्च, शहीद दिवसाला भ्रष्टाचारविरोधी हेल्पलाइन सुरू करण्यात येणार आहे. राज्यातील जनता व्हॉट्सॲपच्या माध्यमातून भ्रष्टाचाराच्या तक्रारी करू शकणार असल्याचेही ते म्हणाले.
पंजाबचे नवीन मुख्यमंत्री म्हणून भगवंत मान यांनी शपथ घेतली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी मान यांनी मोठी घोषणा केली आहे. ‘पंजाबमधील नागरिकांच्या हितासाठी आज खूप मोठा निर्णय घेतला जाणार आहे, पंजाबच्या इतिहासात आजपर्यंत कोणत्याच सरकारने असा निर्णय घेतला नाही, काही वेळातच घोषणा करणार, ‘ असे ट्विट मान यांनी केले होते.
राज्यात जनता आता व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून भ्रष्टाचाराच्या तक्रारी करू शकणार आहे. इतकेच नाही तर, हा नंबर खुद्द पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचा वैयक्तिक व्हॉट्सअॅप नंबर असणार आहे. हा हेल्पलाईन नंबर भगतसिंग यांच्या हुतात्मादिनी म्हणजे 23 मार्च रोजी प्रसिद्ध होणार असल्याचे मान यांनी सांगितले. 99 टक्के लोक प्रामाणिक आहेत, एक टक्का लोक व्यवस्थेचा नाश करतात. मी नेहमीच प्रामाणिक अधिकार्यांच्या पाठीशी उभा असल्याचे ते म्हणाले.
23 मार्च शहीद दिनानिमित्त लाचलुचपत प्रतिबंधक (भ्रष्टाचार विरोधी) हेल्पलाइन सुरू करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे. राज्यातील जनतेला थेट मुख्यमंत्र्यांच्या व्हॉट्सॲपच्या WhatsApp नंबरच्या माध्यमातून भ्रष्टाचाराच्या तक्रारी नोंदवता येतील असं भगवंत मान यांनी म्हटलं आहे.
“23 मार्च, शहीद दिनानिमित्त मी हेल्पलाइन सुरू करेन जो माझा वैयक्तिक व्हॉट्सअॅप नंबर असेल. पंजाबमध्ये, कोणी तुमच्याकडून लाच मागितल्यास, नकार देऊ नका, त्याचा व्हिडिओ/ऑडिओ रेकॉर्डिंग करा आणि त्या नंबरवर पाठवा. माझे कार्यालय त्याची चौकशी करेल आणि कोणत्याही दोषीला सोडलं जाणार नाही”, असं पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी म्हटलं आहे. Punjab’s new CM announces corruption allegations on WhatsApp
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
हेल्पलाइनबाबत माहिती देताना सीएम मान म्हणाले की, 99% लोक प्रामाणिक असतात पण 1 टक्क भ्रष्ट लोकांमुळे संपूर्ण यंत्रणा बिघडते. आपण नेहमी प्रामाणिक लोकांच्या पाठीशी उभं राहणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. भ्रष्टाचार रोखण्यासाठी सर्वात आधी हफ्ता वसूली थांबवली जाईल, वसुलीसाठी कोणताही नेता कोणत्याही अधिकाऱ्याला यापुढे त्रास देणार नाही, असं पंजाबचे नवे मुख्यमंत्री मान यांनी जाहीर केलं.
आता पंजाबमध्ये हफ्तेवसुली थांबणार आहे. हफ्ते वसुलीसाठी कोणताही नेता कोणत्याही अधिकार्याला त्रास देणार नाही. तुम्हाला कोणी लाच मागत असेल, तर त्याचा व्हिडीओ आणि ऑडीओ रेकॉर्डिंग करून मला पाठवा. भ्रष्टाचार्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल. पंजाबमध्ये आता भ्रष्टाचार चालणार नाही, असेही मान यांनी ठणकावले आहे.
एका मीडिया रिपोर्टनुसार या शपथविधीला पटियाला – नाभा येथील आम आदमी पक्षाचे आमदार गुरदेव सिंह देव मान हे नाभा ते चंडीगड असा 90 किमीचा सायकल प्रवास करून शपथविधी सोहळ्याला हजर झाले. त्यासोबतच, केवळ महिना 1 रुपये मानधन स्वरुपात पगार घेणार असल्याची घोषणाही त्यांनी केली आहे. त्यामुळे सध्या गुरदेव सिंह यांची जोरदार चर्चा सुरु आहे. आपण सुरक्षा आणि सरकारी कारही वापरणार नसल्याचे मान यांनी जाहीर केले आहे.