Thursday, May 26, 2022
सुराज्य डिजिटल
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

‘द काश्मीर फाईल्स’ चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांना वाय दर्जाची सुरक्षा

Surajya Digital by Surajya Digital
March 18, 2022
in Hot News, टॉलीवुड, देश - विदेश
0
‘द काश्मीर फाईल्स’ चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांना वाय दर्जाची सुरक्षा
0
SHARES
32
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांची सुरक्षा वाढवल्याचे वृत्त आहे. केंद्र सरकारने अग्निहोत्री यांना सीआरपीएफची Y दर्जाची सुरक्षा दिल्याचे वृत्त समोर आले आहे. ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. लोकांना तो पसंत येत आहे. काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचारावर हा चित्रपट आधारित आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अग्निहोत्री सध्या विविध ठिकाणी भेट देत आहेत.

चित्रपटावरून सोशल मिडीयात होणारी वक्तवे आणि संभाव्य धोका लक्षात घेऊन त्यांना ही सुरक्षा प्रदान करण्यात आलीय. गेल्या 11 मार्च रोजी रिलीज झालेला ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट 1990 च्या कश्मीर बंडखोरी दरम्यान काश्मिरी हिंदूंच्या निर्गमनावर आधारित आहे. एकीकडं देशभरातून या चित्रपटावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. तर, दुसरीकडं अनेकांकडून चित्रपटावर जोरदार टीका देखील केली जात आहे.

सोशल मीडियावर देखील अशाच प्रकारचे दोन गट पडलेले पाहायला मिळत आहेत. याच पार्श्वभूमीवर बॉलिवूड चित्रपट निर्माते आणि ‘द कश्मीर फाइल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांना ‘वाय’ दर्जाची सुरक्षा प्रदान करण्यात आलीय. अग्निहोत्रींच्या सुरक्षेसाठी 4 ते 5 सशस्त्र कमांडो तैनात करण्यात आले असून त्यांचा मुक्काम आणि भारतभर प्रवासादरम्यान सीआरपीएफ कडून त्यांचे रक्षण केले जाणार आहे.

बॉक्स ऑफिसवर 100 कोटींचा टप्पा पार करणाऱ्या या चित्रपटाला देशभरातून मोठा पाठिंबा मिळाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही काश्मिरी पंडितांचा संघर्ष आणि वेदना दाखवल्याबद्दल चित्रपट आणि चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचे कौतुक केले आहे.
जर सूत्रांवर विश्वास ठेवायचा असेल तर, केंद्रीय गुप्तचर संस्थांनी, धमकीचा अंदाज घेत, द काश्मीर फाइल्सचे संचालक विवेक अग्निहोत्री यांना व्हीआयपी सुरक्षा देण्याची शिफारस केली. Vivek Agnihotri, the director of ‘The Kashmir Files’, has Y-grade security

Film director Vivek Agnihotri has been given 'Y' category security with CRPF cover pan India: Government Sources

(File photo) pic.twitter.com/63l1B0BlMz

— ANI (@ANI) March 18, 2022

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

इंटेलिजन्स ब्युरो (IB) च्या शिफारशीनुसार केंद्रीय गृह मंत्रालय दरवर्षी विशिष्ट लोकांच्या सुरक्षेचा आढावा घेते. धोक्याच्या पातळीनुसार, उच्चभ्रू आणि विशेष लोकांना संरक्षणाचे विविध स्तर दिले जातात. देशातील व्हीआयपी सुरक्षा लक्षात घेऊन त्यांना विविध श्रेणींची सुरक्षा दिली जाते. बड्या नेत्यांना आणि अधिकाऱ्यांना कोणत्या प्रकारची सुरक्षा द्यायची हे ठरवण्याचा अधिकार सरकारला आहे.

दहशतवाद्यांच्या जाचामुळे जम्मू काश्मीरमधून काश्मीरी पंडितांचे मोठ्या प्रमाणावर पलायन झाले होते. या घटनेवर आधारित सिनेमा ‘द काश्मीर फाइल्स’ विवेक अग्निहोत्री यांनी तयार केला आहे. हा सिनेमा देशभरातील थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यापासून राजकारणाने जोर पकडला आहे. ‘इंटेलिजन्स ब्युरो’ने (आयबी) विवेक अग्निहोत्री यांच्या जिवाला धोका असल्याचा अहवाल दिला आहे. ही माहिती मिळताच विवेक अग्निहोत्री यांना वाय दर्जाचे संरक्षण देण्याचा निर्णय झाला आहे. अग्निहोत्री यांना सीआरपीएफकडून देशभर वाय दर्जाचे संरक्षण दिले जाणार आहे.

भारतातील सुरक्षा व्यवस्थेचे विविध श्रेणींमध्ये वर्गीकरण केले जाते. यात एसपीजी सिक्युरिटी, झेड प्लस, झेड, वाय आणि एक्स श्रेणीचा समावेश आहे. वाय श्रेणी ही सुरक्षिततेची तिसरी पातळी आहे. हे संरक्षण कमी जोखमीच्या लोकांना दिले जाते. यामध्ये एकूण ११ सुरक्षा कर्मचारी सहभागी आहेत. ज्यामध्ये दोन पीएसओ (खासगी सुरक्षा रक्षक) आणि एक किंवा दोन कमांडो तैनात असतात. देशातील सर्वाधिक लोकांना वाय श्रेणीची सुरक्षा देण्यात आली आहे.

Tags: #VivekAgnihotri #director #TheKashmirFiles #Ygrade #security#दकाश्मीरफाईल्स #दिग्दर्शक #विवेकअग्निहोत्री #वायदर्जा #सुरक्षा
Previous Post

पंजाबच्या नवीन मुख्यमंत्र्याची घोषणा, व्हॉट्सॲपवर करा भ्रष्टाचाराच्या तक्रारी

Next Post

बांग्लादेशात इस्कॉन मंदिरात हल्ला

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
बांग्लादेशात इस्कॉन मंदिरात हल्ला

बांग्लादेशात इस्कॉन मंदिरात हल्ला

वार्ता संग्रह

March 2022
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
« Feb   Apr »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697