सोलापूर : अलीकडील काळात अपघाताचे प्रमाण प्रचंड वाढले असून वाहनांची संख्या अमर्यादित झाली असतानाच वाहनांचे वेग प्रचंड वाढले आहेत. सिमेंटचे रस्ते चकचक झाल्यापासून वाहनांच्या वेगाला मर्यादा उरली नसून रोज अनेकांचे प्राण अपघातात जात आहेत. अशातच दोन अपघात आणि एका विजेच्या धक्क्याच्या घटनेत सोलापुरातील सातजणांचा मृत्यू झाला आहे.
देवदर्शन करून जत येथून बुलेटवरून खडर्डीला (ता. पंढरपूर) परत येणाऱ्या तिघांचा कंटेनरच्या धडकेत मृत्यू झाला. सोनंद (ता. सांगोला) गावाजवळ शुक्रवारी दुपारी बाराच्या सुमारास हा अपघात झाला. किरण सुधाकर गुजले (वय २३), अक्षय अण्णासाहेब मलमे पाटील (वय २३ , दोघेही रा. कोसारी, ता. जत) आणि अजित शशिकांत मंडले (वय २३, रा. मलकरंजी, ता. आटपाडी) अशी मृतांची नावे आहेत. हे तिघेही सध्या खर्डी येथे राहत होते
सांगोला तालुक्यात सोनंद गावानजीक झालेल्या एका भीषण अपयातात पंढरपूर तालुक्यातील खर्डी येथील तियांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात अक्षव मलपे, शरद गजले आणि आदिनाथ मंडले यांचा मृत्यू झाला आहे.
काल धुळवडीचा सण सगळीकडे साजरा केला जात असताना पंढरपूर तालुक्यातील खड़ीं येथील तिघांचा सांगोला तालुक्यातील अपघातात मृत्यू झाला आहे. त्यामुळे गावावर शोककळा पसरली आहे. सांगोला तालुक्यातील सोनंद गावाजवळ हा अपघात झाला असून यात पंढरपूर तालुक्यातील खर्डी येथील तीन तरुणांचा मृत्यू झाला. खर्डी येथील तीन तरुण खर्डी येथून सांगोला तालुक्यातील सोनंद येथे देवदर्शनासाठी एकाच बुलेटवरून गेले होते. Two accidents, seven killed in an accident in Solapur
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
सोनंद येथे दर्शन घेऊन ते परत खर्डी गावाकडे नियालेले असताना एका ट्रकने त्यांच्या बुलेटला जोरदार धडक दिली आणि भीषण अपघात झाला. या अपघातात अक्षय मलमे, शरद गजले आणि आदिनाथ मंडले यांचा मृत्यू झाला आहे. अपयात होताच गावकरी मदतीला धावले आणि त्वांनी जखमी असलेल्या दोघांना लगेच उपचारासाठी सांगोला देवील रुग्णालयात दाखल केले. दुर्दैवाने उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू झाला.
● विजेचा धक्का, पंढरपुरात दोन ठार
पंढरपूर : भीमा नदीच्या काठावर वीजपंप दुरुस्तीचे काम करत असताना विजेचा धक्का लागून चळे (ता. पंढरपूर) येथे शुक्रवारी (ता. १८) सायंकाळी सातच्या सुमारास दोन शेतमजुरांचा मृत्यू झाला. राजाराम सातपुते (वय ३२) आणि आनंदा मोरे (वय ३५) अशी मृतांची नावे आहेत. चळे शिवारात विनोद सुभाष पंडित यांच्या शेतात ही दुर्घटना घडली. आनंद मोरे आणि राजाराम सातपुते हे दोघे शुक्रवारी सायंकाळी चळे येथील विनोद पंडित यांच्या शेतातील पंप दुरुस्तीचे काम करताना दोघांना विजेचा जोरात धक्का लागून ते सातपुते हे दोघे शुक्रवारी सायंकाळी चळे येथील पाण्यात पडले. दोघांचाही जागीच मृत्यू झाला.
● औरंगाबादजवळ अपघातात सोलापूरच्या दोघांचा मृत्यू
सोलापूर : वैजापूर- गंगापूर रस्त्यावर (जि. औरंगाबाद) गंगापूर हद्दीतील मुद्देशिवडगाव येथील आशीर्वाद हॉटेल समोर ट्रक आणि टाटा पिकअपच्या भीषण धडकेत सोलापूरच्या दोघांसह एकूण तीन जण ठार, तर दोनजण जखमी जाले. शुक्रवारी (ता. १८) रात्री साडेनऊच्या सुमारास हा अपघात झाला.
सोलापूरचे रोहित अरविंद सुरवसे व आकाश क्षीरसागर तर नगर येथील एकाचा मृतांत समावेश आहे. लातूर जिल्हातील एकजण जखमी झाला आहे. टाटा पिकअप (एमएच १३ सीयू – १५००) व ट्रक (एमएच १८ एए- २७३७) या दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. ट्रकमध्ये ऊसतोड कामगार होते. टाटा पिकअप वाहनामध्ये सोलापूरचे दोघे होते.
गंगापूर पोलिसांनी शासकीय रुग्णालयात दाखल केल्यानंतर दोघांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. घटनास्थळी फौजदार शकील शेख व त्यांच्या पथकाने जखमींना मदत केली. त्यांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचार करून जखमींना औरंगाबादला हलवण्यात आले आहे.