Wednesday, May 25, 2022
सुराज्य डिजिटल
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

घरच्या त्रासाला कंटाळून अक्कलकोटमधून निघून गेलेल्या दोन मुली टेंभुर्णीत आढळल्या

Surajya Digital by Surajya Digital
March 19, 2022
in Hot News, गुन्हेगारी, सोलापूर
0
घरच्या त्रासाला कंटाळून अक्कलकोटमधून निघून गेलेल्या दोन मुली टेंभुर्णीत आढळल्या
0
SHARES
19
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अक्कलकोट  : अक्कलकोट तालुक्यातील डोंबरजवळगे येथून आई वडील रागावल्यामुळे घरातून निघून गेलेल्या दोन मुली पोलिसांच्या तत्परतेमुळे टेंभुर्णीत सापडल्या आहेत. 

येथील उत्तर पोलिस स्टेशन हद्दीतील तालुक्यातील डोंबरजवळगे गावातील इयत्ता आठवी व दहावीत शिकणा-या दोन अल्पवयीन मुली घरातील आईवडील रागावल्याने शनिवारी  सकाळी नऊ वाजता घरातून निघून गेल्या होत्या. या दोघी गावापासून तीन किलोमीटर अंतरावर बोरेगाव येथे इंग्रजी विषयाचा त्यातील एकीचा दहावीचा पेपर असल्यामुळे  गेल्या होत्या.

बोरेगांव  येथून अज्ञात व्यक्तीच्या टू व्हीलरवर लीफ्ट घेऊन सोलापूरला गेल्या. तिथून पुण्याच्या दिशेने जात होत्या.  त्यातील एकीकडे मोबाईल होता. डोंबरजवळगेच्या पोलीस पाटलांनी तातडीने उत्तर पोलीस स्टेशनला माहिती कळविले.

पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी यांनी तातडीने हालचाली करत मोबाईल लोकेशन घेतले. मोबाईल लोकेशन मोहोळ येथे आढळल्याने टेंभुर्णी येथे नाकाबंदी केली. मुलींची माहिती पाठवून टेंभुर्णी येथे प्रत्येक वाहन तपासणी करण्याचे आदेश दिले. टेंभुर्णी टोलनाक्यावर एस टी बसमध्ये दोन्ही मुली आढळून आल्या. मुलींना आई वडिलांच्या स्वाधीन केले. Two girls were found in Tembhurni after fleeing from Akkalkot

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

घरी आईवडिल रागावल्याने व घरच्यांचा त्रास नको म्हणून निघून गेले असल्याचे मुलींना सांगितले. शाळेसाठी दिलेल्या मोबाईलवरून गुगल वर सर्च करून पुणे येथे रूम बघून ठेवले होते.

टेंभुर्णीचे सपोनी सुजीत भोसले, पोलीस हवालदार प्रवीण वाळके, महादेव चिंचोळकर, अश्पाक मियाँवाले, प्रमोद शिंपाळे, चिदानंद उपाध्ये आदींनी तातडीने हालचाल करत मुलींना पालकांच्या स्वाधीन केले. हे कळताच अक्कलकोट उत्तर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक  जितेंद्र कोळी यांच्या आदेशानुसार पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रवीण वाळके आणि डोंबर जवळगे पोलीस पाटील पुनम गायकवाड यांनी ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या हेल्पलाइन (18002703600) नंबर वरून ही माहिती व मुलींचे फोटो अक्कलकोट तालुक्यातील सर्व गावांना तसेच सोलापूर जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकारी-कर्मचारी आणि गावकऱ्यांना पाठविले.

सगळीकडे नाकाबंदी लावण्यात आली. टेंभुर्णी टोल नाक्यावर नाकाबंदीमध्ये टेंभुर्णी पोलिसांनी मुलींना ताब्यात  घेतले व पालकांच्या स्वाधीन केले. ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या तात्काळ व प्रभावी वापरामुळे घरातून निघून गेलेल्या दोन्ही मुली सुरक्षित रित्या पालकांच्या स्वाधीन करण्यात सोलापूर ग्रामीण पोलिसांना यश आले.

“मुलांना विश्वासात घेऊन त्यांच्या मनाचा विचार करून वाईवडिलांनी लक्ष ठेवावे. ग्रामसुरक्षा यंत्रणेमुळे तातडीने हालचाल होऊन यश मिळाले. पालकांनी मुलांना विश्वासात घेऊन वर्तन ठेवावे”

जितेंद्र कोळी – पोलीस निरीक्षक

Tags: #Two #girls #found #Tembhurni #fleeing #Akkalkot#घरच्या  #त्रास #कंटाळून #अक्कलकोट #दोनमुली #टेंभुर्णी #आढळल्या
Previous Post

परदेशात कोरोना वाढला, महाराष्ट्राला पुन्हा सतर्क राहण्याच्या सूचना

Next Post

…आणि ‘बेळगाव फाईल्स’ काय कमी भयानक आहेत?

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
…आणि ‘बेळगाव फाईल्स’ काय कमी भयानक आहेत?

...आणि 'बेळगाव फाईल्स' काय कमी भयानक आहेत?

वार्ता संग्रह

March 2022
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
« Feb   Apr »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697