□ लोक जेनेरिक औषधांकडे मोठ्याप्रमाणात वळतील
मुंबई : अत्यावश्यक औषधांच्या यादीत येणाऱ्या सुमारे 800 औषधांच्या किमती येत्या एप्रिलपासून 10.7 टक्क्यांनी वाढणार आहेत. किमती वाढल्याचा परिणाम ताप, संक्रमण, हृदयविकार, उच्च रक्तदाब, त्वचारोग आणि रक्तक्षय यांवर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांच्या किमतींवर होणार आहे. घाऊक दर निर्देशांकात झालेल्या तीव्र वाढीमुळे हे घडणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
सततच्या महागाईमुळे सर्वसामान्य लोकांचं अक्षरश: कंबरडं मोडलं आहे. सतत या नाही तर त्या वस्तूंच्या किमती दिवसेंदिवस वाढत आहे. महागाई थांबायचे नाव घेत नाही. सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागत आहे. त्यात आता आरोग्य औषधे ही महागणार आहे. आता औषधांच्या किमती देखील वाढवण्यात येणार आहेत. त्यामुळे येत्या काही काळात सर्वसामान्यांना जगणं मुश्किल होणार आहे. सर्वसामान्य ताप आल्यास त्यावर वापरल्या जाणाऱ्या पॅरासिटामॉलसह 800 प्रकारच्या औषधांच्या दरात वाढ होणार आहे. नॅशनल फार्मासिट्युकल प्रायझिंग ऑथोरिटी’ने (एनजीजीए) ही दरवाढ केली आहे. तसे पत्रकही त्यांनी जारी केले आहे.
The generic drug will cost more than 800 from April
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
पेन किलर, अँटीबायोटिक्स (Antibiotics), अँटी-व्हायरससह (Anti-Virus) अशा अनेक औषधांच्या किमती 1 एप्रिलपासून वाढणार आहेत. सरकारने शेड्यूल्ड औषधांसाठी 10 टक्क्यांहून अधिक दरवाढ करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे आता औषधांच्या किमतीमध्ये देखील वाढ होणार आहे. याचा फटका सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार आहे. कारण आजारी पडल्यानंतर बरं होण्यासाठी लागणारी औषधे महागणार असल्यामुळे त्याचा थेट परिणाम घराच्या बजेटवर होणार आहे. भारताच्या औषध किंमत प्राधिकरणाकडून शुक्रवारी औषधांच्या किमतींमध्ये 10.7 टक्के वाढ करण्याची परवानगी देण्यात आली आहे.नॅशनल लिस्ट ऑफ एसेंसियल मेडिसिनच्या (NLIM) अंतर्गत एप्रिलपासून 800 हून अधिक औषधांच्या किमती वाढणार आहेत. या औधषांच्या किमती दोन टक्क्यांनी वाढू शकतात.
दरम्यान, होलसेल प्राइज इंडेक्सने दिलेल्या आकडेवारीचा अभ्यास आणि विचार करूनही ही वाढ करण्याचा निर्णय घेतल्याचे म्हटले आहे. औषध किंमत वाढीचा अध्यादेश अद्याप रिटेलर किंवा होलसेल डिस्ट्रिब्युटरकडे आला नाही. तो आल्यावर त्यामध्ये औषधाच्या किंमती का वाढवल्या याचे कारण दिलेले असते. कच्चा माल बाहेरच्या देशातून घेतो. तो आणताना कस्टमपासून सर्व आयातशुल्क वाढले आहे. औषधांच्या किंमती स्थिर राहिल्या पाहिजेत, किंवा वाढण्यापेक्षा कमी झाल्या तरी चालणार आहेत. औषधांच्या किंमती वाढल्या तर लोक जेनेरिक औषधांकडे मोठ्याप्रमाणात वळतील. सध्या हे प्रमाण 20 टक्के आहे. हृदयरोग, न्यूमोनिया किडनीविकार असणाऱ्यांसाठी स्टॅंडर्ड कंपनीच्याच गोळ्या लागतात.
औषधांचे दर सर्वसामान्यांना परवडले पाहिजे. मुळात नवे परिपत्रक अद्याप मिळाले नाही, त्यामुळे कोणत्या प्रकारची औषधे वाढली आहेत हे अजूनही समजले नाही. कच्चा माल कमी पडल्याने औषधे निर्माण करता आली नाहीत, ही जरी वस्तुस्थिती असली तरी आता भारताने कच्चामाल निर्मितीत सक्षम झाले पाहिजे. यामुळे परवडणाऱ्या दरात औषधे मिळतील, केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्टने सांगितले आहे.