Tuesday, January 31, 2023
Surajya Digital
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

पौरोहितांच्या मंत्रोच्चारात स्वामींचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा संपन्न

महेश इंगळे कुटुंबियांच्या हस्ते प्रतिष्ठापना रूद्राभिषेक

Surajya Digital by Surajya Digital
March 28, 2022
in Hot News, सोलापूर
0
पौरोहितांच्या मंत्रोच्चारात स्वामींचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा संपन्न
0
SHARES
74
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

□ मंदार पुजारींच्या हस्ते निर्गुण पादुका गाभाऱ्यात पुनश्च स्थानापन्न

□ प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यास मान्यवरांची उपस्थिती

अक्कलकोट – येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिराच्या मूळ गाभाऱ्यातील स्वामी समर्थांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना व निर्गुण पादुकांची स्थानापन्नता रविवारी विधीवत धार्मिक सोहळ्यांनी भक्तीमय वातावरणात संपन्न झाला.

यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या उज्ज्वला शिंदे, आमदार प्रणिती शिंदे, भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते आमदार आशिष शेलार, आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे, माजी आमदार रविकांत पाटील, जिल्हा परिषद सदस्य मल्लिकार्जुन पाटील, नगरसेवक मिलन कल्याणशेट्टी, नगरसेवक अशपाक बळरोगी, अक्कलकोट कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती आप्पासाहेब पाटील, राष्ट्रवादीचे शिवराज स्वामी आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी सुशिलकुमार शिंदे व कुटुंबिय, आमदार आशिष शेलार व कुटुंबिय, आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांचा स्वामींचे, कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन सन्मान केला. गेल्या चार दिवसापासून स्वामींच्या या प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त वास्तुशांती रक्षोज्ञा होम, शुद्धिकरण पूजा, मयूरासन मूर्ती प्रतिष्ठापना, बिंबशुद्धी, प्रतिष्ठापना याग, नवग्रह प्रतिष्ठायाग, गुरुशांती, कलश, आभिषेक, गणयाग, मूर्ती प्रतिष्ठापना, पंचदुर्गा नमस्कार, नवचंडी याग, शांती, चक्रपुजा, रुद्रयाग, मंडल आराधना, एकादशी रुद्रयाग या धार्मिक विधी संपन्न झाले.

सोहळ्यासह अधिक व्हिडिओ पाहण्यासाठी surajya digital फेसबुक पेजला भेट द्या

रविवारी ( २७ मार्च) स्वामींच्या मुख्य प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यास प्रारंभ झाला. यावेळी उडपीचे मुख्य पुरोहित राघवेंद्र भट व सहकाऱ्यांच्या विविध मंत्रोच्चारात सकाळी ६ वाजता अतिरुद्र पारायण तर सकाळी ७ वाजता मंदार महाराज पुजारी यांच्या हस्ते स्वामींच्या निर्गुण पादुका मुळ गाभाऱ्यात पुनश्च स्थानापन्न करण्यात आल्या. सकाळी ८ ते ११ या वेळेत स्वामीभक्त नरेंद्र हेटे, अमेय हेटे, मंजिरी हेटे यांच्या प्रमुख उपस्थितीत मंदिर समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे, रूपाली इंगळे, प्रथमेश इंगळे कुटुंबीयांच्या हस्ते पुरोहितांच्या मंत्रोच्चारात श्री स्वामी समर्थांच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचा महारुद्राभिषेक संपन्न झाला.

यादरम्यान मूळ गाभाऱ्यातील शिवलिंगास मंदार पुजारी व पौरोहितांच्या हस्ते मुकुट परिधान करून स्वामींची मूर्ती सजविण्यात आली. यानंतर हेटे परिवार व आमदार आशिष शेलार परिवाराकडून महेश इंगळेंच्या प्रमुख उपस्थितीत समर्थांची आरती संपन्न झाली. सकाळी ११:३० च्या नैवेद्य आरतीपूर्वी स्वामी मुद्रेची प्रसन्न पूजा संपन्न झाली. त्यानंतर दुपारी एक वाजता फलमंत्राक्षते विधी संपन्न होऊन गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेला स्वामींचा प्रतिष्ठापना सोहळा संपन्न झाला.

यानंतर उडपीतील पौरोहित्य राघवेंद्र भटांच्या हस्ते स्वामी भक्त अमेय हेटे, मंजिरी हेटे, प्रवीण टकले, विजू टकले, नरेंद्र सोनवळकर, नाना वेदक यांनी स्वामी सेवेत केलेल्या विशेष सहकार्याबद्दल श्रींची सेवा आरती, फळांचे प्रसाद व श्रीफळ गौरव प्रसाद देऊन गौरव करण्यात आला. या प्रसंगी पुनश्च एकदा मुळ गाभाऱ्यातील स्वामी दर्शनाचा हजारो स्वामी भक्तांनी व दुपारी १ ते ४ या वेळेत उपस्थित स्वामी भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

या कार्यक्रमानंतर सायंकाळी ४ ते ७ या वेळेत पुण्यातील गायिका धनश्री कुलकर्णी यांच्या भक्ती संगीताचा कार्यक्रमाने या प्रतिष्ठापना सोहळ्याची सांगता झाली. सदरील सोहळा यशस्वी करण्यासाठी चोळप्पा महाराजांचे वंशज व मंदीर समितीचे पुरोहित मोहनराव पुजारी, मंदार पुजारी व कुटुंबीय, मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, उज्वलाताई सरदेशमुख, दयानंद हिरेमठ, संपतराव शिंदे, संजय पवार, श्रीशैल गवंडी, प्रसाद सोनार, सागर गोंडाळ, गिरीश पवार, शिवशरण अचलेर, मच्छिंद्र सावंत, बसवराज आलमद, शांतलिंगप्पा आलमद, राजू गव्हाणकर, संजय पाठक, रवी मलवे, श्रीकांत मलवे, महेश मस्‍कले, अविनाश शिरसागर, सिद्धाराम कुंभार, ऋषिकेश लोणारी, शिवाजी यादव, गणेश इंगळे, दीपक गवळी, दिपक जरिपटके, भिमा मिनगले, ज्ञानेश्वर भोसले, बालाजी सोमवंशी, नागनाथ गुंजले, सचिन पेटकर, अरविंद पाटील, विपुल जाधव, श्रीपाद सरदेशमुख, अक्षय सरदेशमुख, महादेव तेली आदींनी परिश्रम घेतले.

Tags: #Swami's #Pranapratishthapana #ceremony #held #chant #priests#पौरोहित #मंत्रोच्चार #स्वामी #प्राणप्रतिष्ठापना #सोहळा #संपन्न
Previous Post

…आणि ‘बेळगाव फाईल्स’ काय कमी भयानक आहेत?

Next Post

अक्कलकोट : घुंगरेगाव जि.प.शाळेतील मुलांना खिचडीतून विषबाधा

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
अक्कलकोट : घुंगरेगाव जि.प.शाळेतील मुलांना खिचडीतून विषबाधा

अक्कलकोट : घुंगरेगाव जि.प.शाळेतील मुलांना खिचडीतून विषबाधा

वार्ता संग्रह

March 2022
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
« Feb   Apr »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697