मुंबई : राज्यात दहावी व बारावीच्या परीक्षांचे निकाल रखडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विनाअनुदानित शाळांच्या शिक्षकांनी उत्तर पत्रिका तपासणीवर बहिष्कार घातला आहे. जवळपास 30 हजार शिक्षकांनी हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे उत्तरपत्रिकांचे 1200 गठ्ठे तपासणीविना पडून राहणार आहेत. परिणामी निकालाला उशीर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
अनेक अडचणींनतर दहावी आणि बारावीच्या परीक्षांचं होत आहेत. दहावीची परीक्षा 15 मार्च ते 4 एप्रिल पर्यंत घेण्यात येत आहेत. मंडळाकडे दहावीसाठी 16 लाख 25 हजार 311 अर्ज आले आहेत. बारावीच्या बोर्ड परीक्षेला आजपासून सुरूवात होणार आहे. ही परिक्षा राज्यातील 14 लाख 85 हजार 826 विद्यार्थी देणार आहेत. विद्यार्थी दहावी आणि बारावीच्या परीक्षा देऊन निश्चित होत असताना आणखी एक नवी अडचण उभी राहिली राहत आहे. परीक्षांचे निकाल रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
महाराष्ट्रातील विनाअनुदानित शाळांच्या शिक्षकांनी त्यांच्या मागण्यांसाठी उत्तर पत्रिका तपासणीवर बहिष्कार घातला आहे. यामुळं दहावी आणि बारावीचा निकाल लांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे. Tenth-twelfth exam results likely to be delayed
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
राज्याच्या शालेय शिक्षण विभागाकडून आणि महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून काय मार्ग काढला जाणार हे पाहावं लागणार आहे.
राज्यात शिक्षण विभागानं विनाअनुदानित तत्त्वावर शाळा सुरु करण्यास परवानगी देण्याचं धोरण स्वीकारलं होतं. त्यानंतर विनाअनुदानित शाळांना काही प्रमाणात अनुदान देण्यास सुरुवात केली. विनाअनुदानित शाळातील शिक्षकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागत असल्यानं त्यांनी वेतन आणि इतर मागण्यांसाठी बहिष्काराचा निर्णय घेतला आहे. विनाअनुदानित शाळांमधील जवळपास 30 हजार शिक्षकांनी दहावी आणि बारावीच्या उत्तर पत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकला आहे. यामुळं दहावी आणि बारावीचा निकाल लांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
राज्यातील विनाअनुदानित शाळांतील शिक्षकांकडून उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकण्यात आला आहे. राज्यातील 30 हजार शिक्षकांनी उत्तर पत्रिका तपासणीच्या कामावर बहिष्कार टाकला आहे. विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांनी उत्तर पत्रिका तपासणीला नकार दिला आहे. यामुळं 1200 गठ्ठे तपासणीविना पडून राहणार आहेत.