मुंबई : अखेर महाराष्ट्रात कोरोनाचे सर्व निर्बंध हटवण्यात आले आहे. गुढी पाडव्यापासून (2 एप्रिल) महाराष्ट्र निर्बंधमुक्त होणार आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली आहे. तसेच यापुढे राज्यात मास्क वापरणे ऐच्छिक असणार आहे. मास्क लावला नाही तर आकारण्यात येणारा दंड आता रद्द करण्यात आला आहे. मात्र लोकांनी स्वतःची आणि इतरांची काळजी घेण्यासाठी मास्क घालावा, असे आवाहन टोपे यांनी केले आहे.
उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. आज झालेल्या मंत्री मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. याच बैठकीत बोलताना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत की, ”गुढीपाडवा म्हणजे नववर्षाची सुरुवात. जुनं ते मागे सारुन नवीन कार्याचा प्रारंभ करणारा हा दिवस. गेल्या दोन वर्षापासून आपण कोरोनाच्या भयंकर विषाणूचा यशस्वीरित्या मुकाबला केला आणि आज हे सावट दूर होताना दिसते. एक नवीन सुरुवात करण्यासाठी म्हणून आपत्ती व्यवस्थापन कायदा तसेच साथरोग प्रतिबंधक कायद्यान्वये कोरोना काळात लावण्यात आलेले निर्बंध गुढीपाडव्यापासून (2 एप्रिल) पूर्णपणे उठवण्यात येत आहेत.” यावेळी मंत्रिमंडळाच्या वतीने राज्यातील जनतेला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत.
गेल्या दोन वर्षापासून राज्यातील डॉक्टर्ससह सर्व फ्रंटलाईन कर्मचारी, एवढेच नव्हे तर सर्व नागरिकांनी कोरोनाशी लढतांना एकमुखाने आणि एकदिलाने राज्य शासनाच्या प्रयत्नांना बळ दिले, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी या सर्वांना देखील मन:पूर्वक धन्यवाद दिले. या संपूर्ण काळात राज्यातील विविध जाती-धर्म आणि पंथाच्या नागरिकांनी त्यांच्या सण, उत्सव तसेच समारंभांना देखील मर्यादित ठेवले व संयम पाळला, असं मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले. तसेच पोलीस यंत्रणा, पालिका – नगरपालिका, महसूल व ग्रामविकास यंत्रणा आणि एकूणच प्रशासनाने कोरोनाचा दिवस रात्र मुकाबला केला, याविषयी मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले तसेच सर्वांचे मनापासून आभार देखील मानले.
Maharashtra Corona Restricted from Gudi Padwa, Wearing Mask Optional!
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
कोरोना निर्बंधांतून महाराष्ट्र मुक्त झाला आहे. कोरोनाचे सर्व निर्बंध हटवण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. मात्र मास्कचा वापर करण्याचे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आले आहे. राज्यातील करोना रुग्णांची संख्या अत्यंत कमी आहे. नवीन होणारी रुग्णवाढ देखील कमी आहे. तसेच बहुतांश लोकांनी कोव्हिड प्रतिबंधक लस घेतलेली आहे.
वेगाने लसीकरण झाल्याने कोरोनाचे संकट बऱ्याच अंशी टळले आहे. त्यामुळे आता कोरोना निर्बंध शिथील करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. निर्बंध शिथिल झाल्यानंतर आपत्ती व्यवस्थापन कायदाही मागे घेण्यात येणार आहे. त्यामुळे मास्कचा वापर न केल्यास होणारी दंड आकारणीही रद्द होणार आहे. कोरोना निर्बंध शिथिल केले तरी मास्कचा वापर नागरिकांनी करावा यासाठी सातत्याने आवाहन करण्यात येणार आहे.
मार्च 2020 मध्ये घालण्यात आलेले निर्बंध हळू हळू शिथील करण्यात येत होते. मात्र आता दोन वर्षांनंतर निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. या निर्णयामुळं गुढीपाडवा मिरवणुका जोरात काढण्यात येणार आहेत. तर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जल्लोषात साजरी करण्यात येणार आहे.
रमझान ईद देखील साजरी करण्यास प्रतिबंध असणार नाहीत. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करुन माहिती दिली आहे.राज्यातील सर्व निर्बंध उठवण्यात आलेले आहेत. सर्वांनी आपले सण आनंदात साजरे करावेत. गुढीपाडवा, रमझान ईद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि इस्टर डे उत्साहात साजरा करावा, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.
I was able to find good info from your blog
posts.