सोलापूर : शेतामध्ये खर्च करूनही उत्पन्न अपेक्षित मिळत नसल्याने तणावामधून येथील एका २८ वर्षीय शेतकऱ्याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.
मनोज राजाराम गायकवाड असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. मोहोळ येथील नरखेड रस्त्यावरील गायकवाड वस्ती येथे मनोज गायकवाड, त्याचे वडील राजाराम व आजी राहण्यास आहेत. त्यांच्या पाऊण एकर शेतामध्ये खर्च करूनही त्याला उत्पन्न मिळत नव्हते. त्यामुळे तो तणावात असायचा.
त्यामधूनच त्याने दुपारी साडेतीनच्या सुमारास शेतातील लिंबाच्या झाडाला गळ्यातील पंचाने गळफास घेऊन आत्महत्या केली. शेजारी शेतात काम करणाऱ्याने ते पाहिले. त्याचे चुलते दयाराम पांडुरंग गायकवाड यांनी येथील पोलिसांत खबर दिली. त्यावरुन अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. हेडकाॅन्स्टेबल विजय माने तपास करीत आहेत.
□ कुंभारी बेवारस तरूणाचा मृतदेह; खुनाचा गुन्हा दाखल
सोलापूर कुंभारी घरकुल ( ता.दक्षिण सोलापूर) येथील साईस्वरूप हॉटेल शेजारी असलेल्या कोरड्या विहिरीत दोन तीन दिवसापूर्वी एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळला होता. अद्याप त्याची ओळख पटलेली नाही. शवविच्छेदनाच्या अहवालात त्याच्या डोक्यावर गंभीर जखम असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पोलिसांनी अनोळखी इसमाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास वळसंग पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक अतुल भोसले करीत आहेत.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
□ सोरेगावजवळ रिक्षा उलटून तिघे जखमी
सोरेगाव ते हत्तुर दरम्यान भारत पेट्रोल पंपाजवळ वेगाने जाणारी रिक्षा उलटल्याने सागर दत्तात्रय शेंडगे (वय २३ रा.वांगीरोड) राधिका मधुकर वाघमोडे (वय १७) आणि गायत्री दिनेश वाघमोडे (वय २० दोघी रा. कामती ता.मोहोळ) असे तिघे जण जखमी झाले. त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. बुधवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास तिघेजण सोलापूर ते औराद असा प्रवास करीत होते. पेट्रोल पंपा जवळ चार चाकी वाहन कट मारल्याने रिक्षा उलटून हा अपघात झाल्याची नोंद विजापूर नाका पोलीसात झाली आहे .
□ चाकूने मारून घेतल्याने महिला जखमी
घरगुती भांडणातून स्वतः चाकूने हातावर मारून घेतल्याने ऐश्वर्या सुहास सावंत (वय २१ रा.स्वागत नगर, कुमठा नाका) ही विवाहिता जखमी झाली. ही घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली. तिला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. एमआयडीसी पोलिसात याची नोंद झाली आहे.
Young farmer commits suicide in Mohol, charges of murder in pottery filed
□□□■■■■□□□□□
भारतातल्या पहिल्या महिला डॉक्टरांना विनम्र अभिवादन !
#first #women #doctor #विनम्र #अभिवादन #आनंदीबाई #जोशी #surajyadigital #सुराज्यडिजिटल
भारतातल्या पहिल्या महिला डॉक्टर होण्याचा बहुमान मिळविणाऱ्या डॉ. आनंदीबाई जोशी यांची आज जयंती ! अत्यंत खडतर परिस्थितीत डॉक्टर झालेल्या आनंदीबाई आज देशातील सर्व स्त्रियांसाठी एक प्रेरणास्रोत ठरल्या आहेत. विनम्र अभिवादन !