अक्कलकोट – येथील बसस्थानकाच्या पाठीमागील पार्सल आँफीस समोर एका ७२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा कर्नाटक आगाराच्या बसच्या धडकेमुळे उपचारादरम्यान मृत्यू झाला. आज सोमवारी सकाळी पावणेदहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला होता. मृत वृद्ध व्यक्ती ही वडापाव दुकानाचे मालक होते.
श्रीशैल इराप्पा हिप्परगी ( वय ७२ वर्षे रा. खासबाग गल्ली, अक्कलकोट) असे अपघातातील मृताचे नांव आहे. याची उत्तर पोलीस स्टेशनमध्ये बसचालकाविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पोलीस सुत्राकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, कर्नाटक बसक्रमांक के ए ३२ एफ १९८१ ने भरधाव वेगात येऊन श्रीराम वडापावचे मालक श्रीशैल हिप्परगी जात असताना बसने धक्का दिला.
यात ते खाली कोसळले. त्याच्या उजव्या पायावरून पाठीमागचे टायर गेले. यात ते गंभीर जखमी झाले. उपचारासाठी सोलापूर येथे खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान मृत्यू झाला.
याबाबत सुन रेखा महादेव हिप्परगी (वय ३२ वर्षे) यांनी पोलिसात फिर्याद दिली. कर्नाटक एसटी बस चालकाने आपले ताब्यातील बस हायगईने, अविचाराने, निष्काळजीपणाने चालवून यातील फिर्यादीचे सास-याचे उजवे पायावरून घालून गंभीर जखमी करण्यास कारणीभूत झाला म्हणून गुन्हा दाखल झाला. अधिक तपास सहाय्यक फौजदार राठोड हे करीत आहेत.
Karnataka bus hits Akkalkot; Vadapav shop driver killed
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
□ जमावबंदीचा आदेश डावलल्याने गुन्हा दाखल
सोलापूर : जमावबंदी हुकूम असतानासुद्धा डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती महामंडळाच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची गर्दी जमवून बैठक घेतल्याप्रकरणी दलित नेते राजा सरवदे, सुभानजी बनसोडे यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता व आपत्कालीन परिस्थितीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरिता महापालिका आयुक्त यांनी ३० मार्च रोजी सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमावर बंदी घातलेली असताना सुद्धा १४ एप्रिल रोजी होणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शहरातील प्रमुख मंडळी व पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावून गर्दी जमवल्या प्रकरणी राजा सरवदे व सुभानजी बनसोडे (दोघे रा.सोलापूर) यांच्याविरोधात सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
□ चोरट्याने प्रवाशांची तिकीट काढणारी मशिन पळवली
सोलापूर : चोरटे कधी कोणती वस्तू चोरतील? कशी आणि केव्हा चोरतील याचा कोणालाही थांगपत्ता लागत नाही, अशीच काहीशी आश्चर्यकारक घटना सोलापूर बस स्थानकात घडली आहे. अज्ञात चोरट्याने चक्क एसटी वाहकाची जवळ असलेली प्रवाशांची तिकिटे काढणारी ए.टी.आय.एम मशीनच चोरून नेली आहे.
या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, राजापूर आगारातील एसटी बस सोलापूर एसटी बस स्थानकात जाण्यासाठी उभी होती. फिर्यादी तथा त्या बसचा वाहक वेंकटेश लक्ष्मण शिरसाठ (रा.राजापूर जिल्हा रत्नागिरी) यांनी आपल्या जवळ असलेली प्रवासी तिकीट काढणारी ई.टी.आय.एम मशीन सिटच्या रॅकवर ठेवून लघुशंकेसाठी बाहेर गेले. असताना अज्ञात चोरट्याने बॅग मधील मशीन काढून कपडे अस्ताव्यस्त टाकून तेथून पोबारा केला.वाहक एसटीत आल्यानंतर त्याला ही चोरी लक्षात आली. त्यानंतर त्यांनी अज्ञात चोरट्याचा विरोधात फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. अधिक तपास पोलिस करीत आहेत.