मुंबई : संगीत विश्वातील प्रतिष्ठीत ‘ग्रॅमी’ पुरस्कार सोहळा लास वेगासमध्ये पार पडला. यात भारतीय वंशाचे संगीतकार रिकी केज व भारतीय अमेरिकन गायिका फाल्गुनी शाह यांना पुरस्कार मिळाला. रिकी यांचा हा दुसरा ग्रॅमी पुरस्कार आहे. त्यांना ‘बेस्ट न्यू एज अल्बम’ या विभागात पुरस्कार मिळाला आहे. गायिका फाल्गुनी शाहला ‘बेस्ट चिल्ड्रन्स म्युझिक अल्बम’ विभागात ‘अ कलरफूल वर्ल्ड’ या तिच्या अल्बमसाठी पुरस्कार देण्यात आला.
जगभरातील संगीतक्षेत्रातल्या सर्वात प्रसिद्ध आणि तितक्याच प्रतिष्ठेचा मानला जाणाऱ्या ग्रॅमी पुरस्कारांची घोषणा झाली आहे. हिंदुस्थानचे संगीतकार रिकी केज ‘डिव्हाईन टाइड्स’ या अल्बमसाठी ग्रॅमी पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
हा सोहळा जानेवारीमध्ये लॉस अँजेलिस येथे पार पडणार होता. पण कोरोनामुळे हा सोहळा पुढे ढकलण्यात आला होता. ‘ग्रॅमी’ हा संगीत क्षेत्रातील सर्वात मोठा पुरस्कार मानला जातो. 28 कॅटेगिरीमधील ग्रॅमी पुरस्कार या सोहळ्यात प्रदान करण्यात आले. 64 वा ग्रॅमी पुरस्कारामधील बेस्ट न्यू आर्टिस्ट या कॅटेगिरीमधील पुरस्कार हा ओलिविया रोड्रिगोला देण्यात आला तर साँग ऑफ द इयर अवॉर्ड हे ‘लीव द डोर ओपन’ या गाण्याने पटकवला.
Grammy Awards – In honor of Falguni Shah, Ricky Cage
Won the Grammy Award today for our album Divine Tides 🙂 Filled with gratitude and love this living-legend standing with me – @copelandmusic . My 2nd Grammy and Stewart's 6th. Thank you to everyone who ever collaborated, hired, or listened to my music. I exist because of you. pic.twitter.com/Pe4rkOp0ba
— Ricky Kej (@rickykej) April 4, 2022
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
रिकी केज यांना याआधी 2015 मध्ये ‘विंड्स ऑफ संसार’ या अल्बमसाठी त्यांना ग्रॅमी पुरस्कार मिळाला होता.इतकेच नाही, तर त्या वेळी यूएस बिलबोर्ड न्यू एज अल्बम चार्टवरही या अल्बमने पहिले स्थान पटकावले होते. या चार्टवर पदार्पण करणारे रिकी पहिले भारतीय ठरले होते.
भारतीय संगीतकार ए. आर. रहमान देखील ग्रॅमी अवॉर्ड्सचा एक भाग बनले आहेत. त्यांनी देखील आपल्या मुलासोबत या पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली आहे.
》 विजेत्यांची नावे
बेस्ट न्यू आर्टिस्ट – ओलिविया रोड्रिगो
साँग ऑफ द इयर – लीव द डोर ओपन
बेस्ट रॉक अल्बम – फू फाइटर्स
बेस्ट रॉक साँग – फू फाइटर्स
बेस्ट रॉक परफॉर्मेंस – फू फाइटर्स
बेस्ट कंट्री अल्बम – स्टार्टिंग ओवर
बेस्ट प्रोग्रेसिव अल्बम – लकी डे
बेस्ट रॅप साँग – केन्ये वेस्ट
बेस्ट चिल्ड्रन अल्बम – फालू उर्फ फाल्गुनी शाह
बेस्ट कोरल परफॉर्मेंस- गुस्तावो डुडामेल, ग्रँटा गेशॉन, ल्यूक मॅकंडारफर
बेस्ट क्लासिकल कंटेम्पररी कम्पोजिशन – कॅरोलीन शॉ
बेस्ट पॉप सिंगर अल्बम – लव फॉर सेल
बेस्ट पॉप सोलो परफॉर्मेंस – ओलिविया रोड्रिगो
बेस्ट डांस/इलेक्ट्रनिक रिकॉर्डिंग – रूफुज डू सोल
बेस्ट म्यूजिक एडुकेटर – स्टीफन कॉक्स
प्रोड्यूसर ऑफ द इयर – जॅक एंटोनोफ
ट्रेडिशनल पॉप अल्बम – लव फॉर सेल