Wednesday, May 25, 2022
सुराज्य डिजिटल
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

मोहोळ : ओमनीकार ट्रकवर धडकली; दोन ठार चार जखमी, मृतात पोलिसाचा समावेश

कत्तलीसाठी जनावरे घेवून जाणार्‍या तीन वाहनांसह  नऊ लाखाचा ऐवज जप्त

Surajya Digital by Surajya Digital
April 4, 2022
in Hot News, गुन्हेगारी, सोलापूर
0
मोहोळ : ओमनीकार ट्रकवर धडकली; दोन ठार चार जखमी, मृतात पोलिसाचा समावेश
0
SHARES
190
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

मोहोळ : पंढरपूरहून   सोलापूरकडे निघालेली ओमनीकार रस्त्यावर उभारलेल्या एका ट्रकवर पाठीमागून  आदळून झालेल्या भीषण   अपघातामध्ये दोनजण भाऊ जागीच ठार तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना आज सोमवारी (दि.४) दुपारी अडीच वाजण्याचे  सुमारास सारोळे पाटीजवळ घडली.

याबाबत  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोलापूर मुख्यालयामध्ये पोलीस कॉन्स्टेबल म्हणून ड्युटीवर असणारे दयानंद अण्णाराव बेल्लाळे हे आपल्या परिवारासह ओमनी कार (क्रमांक एम एच १२ एन इ ४४८७) मधून पंढरपूर येथे देव दर्शनाला गेले होते. दरम्यान देवदर्शन आटोपून सोलापूरकडे परत येत असताना पंढरपूर मोहोळ रस्त्यावर सारोळे पाटीनजीक धोकादायक स्थितीत रस्त्यावर उभा असलेला ट्रक (क्रमांक एम एच १२ एफ झेड ७३७७ ) वरती पाठीमागून जोरात ओमिनी कार आदळली.

झालेल्या या भीषण अपघातात दयानंद अण्णाराव बेल्लाळे (वय ३०), सचिन आण्णाराव बेल्लाळे (वय ३२, रा. रोकडा सावरगड ता. अहमदपूर जि. लातूर) हे दोन जण भाऊ जागीच ठार झाले, तर स्वाती उर्फ राणी सचिन बेल्लाळे, (वय २८), दिपाली उर्फ जयश्री दयानंद बेल्लाळे (वय २५), त्रेशा दयानंद बेल्लाळे, (वय ८), श्लोक सचिन बेल्लाळे (वय १) हे गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान अपघाताची खबर मिळताच पोलिसांनी तातडीने जखमींना पुढील उपचारासाठी सोलापूर येथील खासगी रुग्णालयांमध्ये पाठवून दिले आले.

मृत कॉन्स्टेबल दयानंद अप्पाराव बिल्लाळी

याबाबत ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक फौजदार अविनाश शिंदे हे करीत आहेत.  या अपघातामध्ये मयत झालेले पोलीस कॉन्स्टेबल दयानंद अप्पाराव बिल्लाळी पोलीस उपनिरीक्षक पदाच्या  परीक्षेची तयारी करत असल्याची माहिती आहे. अपघाताची खबर मिळताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिम्मतराव जाधव, पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांनी घटनास्थळी भेट दिली.

Mohol: Omnicar hits truck; Two killed, four injured, police killed

● अशी होती अपघाताची भीषणता

ट्रकचा क्लीनर हा पाणी आणण्यासाठी गेला होता. जाताना ट्रक रस्त्याच्या कडेलाच उभा केला होता. तातडीने पाणी घेऊन येऊन पुढे जावे या हेतूने क्लीनर पाणी बाटली भरण्यासाठी गेला. याचवेळेस पाठीमागून वेगाने ओमनीकार आली पाठीमागून ट्रक वरजाऊन आदळली.

मोठा आवाज झाला. या आवाजाकडे रस्त्याच्या बाजूच्या माणसांचं लक्ष गेलं आणि अपघात झाला हे लक्षात येताच पाहणारे आवाजाच्या दिशेने पळत सुटले. जवळ जाऊन पाहतात तर समोरचे दोघेजण जागेवर थंड झालेली. पाठीमागे बसलेल्या महिलांचा मोठमोठ्याने ओरडण्याचा रडण्याचा मोठा आवाज, आजूबाजूच्या माणसांनी समयसूचकता दाखवत ओमनी पाठीमागे दाबली आणि आतील माणसांना काढण्याचा प्रयत्न केला.

दोघांच्यामध्ये एक वर्षाचे मुलगा रक्तबंबाळ झालेला, त्याचाही संपूर्ण अंगावर मानेवर काचा होत्या. दोघांच्या मध्ये असल्याने सुरुवातीला त्याच्याकडे कोणाचेही लक्ष गेले नव्हतं. दोघेही जागेवर दबलेले होते.

या दोघांना काढल्यानंतर त्या बाळाला बाहेर काढण्यात आले. आतील दयानंदची  पत्नी   दिपाली व सचिनची पत्नी दयानंदची मुलगी श्रेया हे जखमी झाले होते. त्यांनाही गंभीर स्वरूपाचा मार लागला होता. तोपर्यंत पोलिस घटनास्थळी पोहोचले होते. मयत व सर्व जखमी यांना तातडीने मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयात आणून जखमींना प्रथमोपचार करून सोलापूर येथील हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले.

 

□ कत्तलीसाठी जनावरे घेवून जाणार्‍या तीन वाहनांसह  नऊ लाखाचा ऐवज जप्त

बार्शी : 13 गोवंशीय जनावरे घेवून कत्तलीसाठी मालेगाव- रूई मार्गे  उस्मानाबादकडे निघालेली तीन वाहने पकडून पोलिसांनी सुमारे साडे नऊ लाख तीस हजार रुपयाचा ऐवज जप्त केला.

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

याबाबत  सोलापूर येथील प्राणीमित्र सुधाकर महादेव बहीरवाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन वैराग पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे. सुधाकर बहीरवाडे यांना गोवंशीय जनावरांची कत्तलीसाठी बेकायदेशीररित्या वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार ते रात्री 11 वा. रुई येथे आपल्या सहकार्‍यांनिशी थांबले होते.

त्यांना दोन पिकअप आणि एक लेलंड टेंपो येताना दिसला. ती वाहने थांबवून तपासली असता तीन वाहनात मिळून 10 जर्सी गायी, 3  जर्सी वासरे  कोंबलेली आढळली. वाहनात त्यांच्या चारा पाण्याची व औषधाची  सुविधा नव्हती. अत्यंत  अमानुषपणे दाटीवाटीने अपुर्‍या जागेत जनावरांचे  चारही पाय व मान नायलॉनच्या दोरीने पिकअप व टेम्पोच्या  लोखंडी पाईपला  बांधलेली आढळले.

याबाबत वैराग पोलिसांनी संशयित आरोपी शकील कुरेशी (रा. पापनस ता. माढा ) आवेज दादा कुरेशी (रा. बुधवार पेठ  ता. मोहोळ), सैफअली आरिफ कुरेशी ( रा. आझाद चौक अकलुज ता. माळशिरस) यांना ताब्यात घेऊन चौकशी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर सदर जनावरे हे सोलापूर येथील गोशाळेत पाठवली.

 

Tags: #Mohol #Omnicar #hits #truck #Twokilled #four #injured #police #killed#मोहोळ #ओमनीकार #ट्रक #धडकली #दोनठार #चारजखमी #मृत #पोलिस
Previous Post

आधी अमित ठाकरे यांनी हनुमान चालीसा म्हणून दाखवावी – सुजात आंबेडकर

Next Post

बार्शी : चोरांच्या टोळीतील भांडणात मध्यस्थी करायला गेलेल्या तरुणाचा निर्घृण खून

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
बार्शी : चोरांच्या टोळीतील भांडणात मध्यस्थी करायला गेलेल्या तरुणाचा निर्घृण खून

बार्शी : चोरांच्या टोळीतील भांडणात मध्यस्थी करायला गेलेल्या तरुणाचा निर्घृण खून

वार्ता संग्रह

April 2022
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
252627282930  
« Mar   May »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697