कुर्डूवाडी (हर्षल बागल) : एप्रिल महिनाअखेरला मंत्रीमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. आगामी सात दिवसात यासंदर्भात महत्त्वाच्या खात्याच्या प्रमुख मंत्र्यांची बैठक होणार आहे. सोलापूर जिल्ह्यात महाविकास आघाडीचे सर्वाधिक उमेदवार आहेत. उपमुख्यमंत्री अजित दादांच्या खास मर्जीतले करमाळ्याचे आमदार संजयमामा शिंदे यांची मंत्रीमंडळात वर्णी लागणार का, याकडे सर्वाच्या नजरा लागल्या आहेत.
मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यास जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावर आता तरी जिल्ह्यातील भूमिपुत्र येईल अशी सोलापूर जिल्हावासियाची अपेक्षा आहे. अर्थातच संजयमामा शिंदे यांना मंत्रपद द्यावी, अशी मागणी वारंवार समर्थकांनी केलेली आहे. अजितदादांची कृपादृष्टी होईल का, याकडे लक्ष लागले आहे.
Possibility of cabinet expansion at the end of April; Karmala MLA Sanjay Mama gets ministerial post?
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
सोलापूर जिल्ह्याचे या पंचवार्षिकचे पहिले पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील, नंतर जितेंद्र आव्हाड , अन आत्ता इंदापूरचे दत्तात्रय भरणे यांनी पदावर वर्चस्व गाजवले. दत्तामामा उजनीच्या पाणी प्रकरणात व कोव्हिडच्या सेंटरच्या टेंडर प्रकरणात चांगलेच वादग्रस्त राहिले. यामुळे पालकमंत्री बदलाची मागणी जोर धरीत होती. अखेर संजयमामांनी मुंबईत सिल्व्हर ओकचे उबरे झिजवत जलसंपदामंत्री जयंत पाटील उपमुख्यमंत्री अजित पवार यांना उजनीच्या पाण्यावर सोलापूर जिल्ह्याच्या मनासारखा निर्णय घ्यायला संजयमामांनी भाग पाडले.
जिल्हा दूध संघाच्या निवडीत देखील महाविकास आघाडीची सत्ता आणत रणजित शिंदे यांना चेअरमन पदावर बसवले. सोलापूर जिल्ह्यात दिवसेंदिवस जिल्ह्याच्या राजकारणात संजयमामांचा वाढत चाललेला दबदबा हा भविष्यात मोठ्या पदाची वाट पाहत आहे हेच दिसत आहे.
□ मंत्रीपदात रस नाही – करमाळ्याला निधी वाढवण्याचा विचार
करमाळा मतदारसंघात माढ्याच्या ३६ गावांसह जेवढा निधी उपलब्ध करता येईल त्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करीत आहे. मला मंत्रीपद नाही मिळाले तरी चालेल पण विकासाची काम मला करु द्या. विकासकामांना आलेल्या निधीचा सदुपयोग करुन घ्या, कामे चांगली करा, असे आमदार संजयमामा शिंदे यांनी आपले मत व्यक्त केले.