सोलापूर : पत्नीवर संशय घेतल्याप्रकरणी पतीने पत्नीच्या डोक्यात दगड घालून जखमी केल्याची घटना सोमवारी (दि.४) रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास वारोनको प्राथमिक शाळा रेल्वे लाइन्स सोलापूर येथे घडली.
याप्रकरणी रोजमेरी ब्रिजेश चव्हाण (वय- ३२,रा. वारोनको प्राथमिक शाळा, रेल्वे लाइन्स,सोलापूर) यांनी सदर बाजार पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.त्यांच्या फिर्यादीवरून पती ब्रिजेश रजनीकांत चव्हाण (रा. हिंदुस्तान शाळेच्या पाठीमागे, रंगभवन, सोलापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी यांचा पती ब्रिजेश याने त्यांची पत्नी रोजमेरी यांच्यावर संशय घेऊन शिवीगाळ करत हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर तेथेच पडलेला दगड घेऊन फिर्यादी यांच्या डोक्यात मारून जखमी केले आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेची नोंद सदर बाजार पोलिस ठाण्यात झाली असून, पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल खान हे करीत आहेत.
● बस कंडक्टरची रक्कम अज्ञात चोरट्याने पळवली
सोलापूर : कोणीतरी अज्ञात इसमांनी बस कंडक्टर यांच ११ हजार १५० रुपयांची रक्कम चोरून नेल्याची घटना मंगळवारी ( दि.५) संत तुकाराम चौक सोलापूर बस डेपो नंबर २ सोलापूर येथे घडली. याप्रकरणी परशुराम मल्लप्पा बजेंत्री (वय-३९,रा. गदक राज्य – कर्नाटक) यांनी सदर बाजार पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. यांच्या फिर्यादीवरून तीन अज्ञात इसमांवर गुन्हा दाखल झाला आहे.
Suspicious of his wife, the husband threw a stone at her head
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी हे के.ए.२६.एफ ९८६ सीबस घेऊन सोलापूर येथे आले. त्यावेळी त्यांनी सोलापूर बस डेपो येथे सर्व प्रवासी यांना उतरून संत तुकाराम चौक सोलापूर बस डेपो नंबर २ येथे मुक्कामी पोचले व नेहमीप्रमाणे जेवण करून दहा वाजण्याच्या सुमारास झोपी गेले.दरम्यान त्यांच्या खिशातील वरील रक्कम कोणीतरी अनोळखी इसमांनी चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेची नोंद सदर बाजार पोलिस ठाण्यात झाली असून पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल नदाफ हे करीत आहेत.
□ तिर्हे येथे अनोळखी वाहनाच्या धडकेने पादचारी ठार
सोलापूर – बसवेश्वर नगर ते तिर्हे (ता. उत्तर सोलापूर) या रस्त्यावर अनोळखी वाहनाच्या धडकेने शंकर चावला पवार (वय ५३ रा. बसवेश्वरनगर, देगाव) हे गंभीर जखमी होऊन उपचारादरम्यान मरण पावले. हा अपघात काल सोमवारी रात्री च्या सुमारास घडला.
शंकर पवार हे काल रात्री तिर्हे येथील नाईक यांच्या शेतात काम करून पायी घराकडे निघाले होते. वाटेत पाठीमागून अनोळखी वाहन लागल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना संतोष पवार (मुलगा) यांनी शासकीय रुग्णालयात दाखल केले असता ते पहाटे मरण पावले. या अपघाताची नोंद सलगरवस्ती पोलिस आज झाली आहे .
□ नशेत विष पिऊन आत्महत्या
वाशिंबे (ता.करमाळा) येथे राहणाऱ्या गंगाराम संजय सूनमारे (वय ४५) याने दारूच्या नशेत विष पिऊन आत्महत्या केली. काल सोमवारी रात्रीच्या सुमारास त्याने वाशिंबे येथील राहत्या घरात नशेत विष प्राशन केले होते. समाधान (मुलगा) यांनी त्याला करमाळा येथे प्राथमिक उपचार करुन सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान तो मंगळवारी सकाळी मरण पावला, अशी नोंद तालुका पोलिसात झाली आहे .