□ संजय राऊत राज्यसभेत आक्रमक; ‘तुम्ही डोळ्यात डोळे घालून म्हणू शकता का, की कायद्याचा गैरवापर होत नाहीय’
मुंबई / नवी दिल्ली : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची काही संपत्ती ईडीने जप्त केली आहे. त्यामुळे राऊत यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. तसेच आज राज्यसभेत बोलताना ते आक्रमक झाले. कायद्याचा दुरुपयोग होत आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. ‘तुम्ही डोळ्यात डोळे घालून म्हणू शकता का, की कायद्याचा गैरवापर होत नाहीय, ‘ असा सवाल राऊत यांनी गृहमंत्री अमित शाह यांना केला आहे.
संजय राऊत यांची अलिबागमधील संपत्ती जप्त करण्यात आली. त्यानंतर शिवसेना नेत्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. संजय राऊत राज्यसभेत बोलण्यासाठी उभे राहिले. तेव्हा त्यांनी केंद्रीय यंत्रणावर टीका केली. यावर मग गृहमंत्री अमित शाह यांनी उत्तर दिले.
संजय राऊत म्हणाले की, ‘मी गृहमंत्र्यांचा आभारी आहे. कायद्याचा गैरवापर होणार नाही असे गृहमंत्र्यांनी सांगितलं होतं, पण तुम्ही डोळ्यात डोळे घालून म्हणू शकता का कायद्याचा गैरवापर होत नाहीये. अमित शाह म्हणाले की, ‘एका मान्यवरांनी म्हटलं की, तुम्ही डोळ्यात डोळे घालून बोलू शकता का? मी तर नक्कीच देऊ शकतो. जर कोणी डोळ्यात डोळे घालून विचारण्याची हिंमत ठेवत असेल. माझ्या मनात चोर नाही आहे. आम्ही तेच करतो. जी आमची आत्मा सांगते. आणि आम्ही तेच करतो ज्यांची आत्मा कायद्याची आत्मा मानते.
Rangala match between Sanjay Raut and Amit Shah in Rajya Sabha over abuse of law
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
मी कोणाला घाबरत नाही आणि जे खरे घडलेले असेल त्याबाबत कोणाच्याही डोळ्यात डोळे घालून मी बोलू शकतो असा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज राज्यसभेत विरोधकांना उत्तर दिले.
□ राज्यसभेत गुन्हेगारी प्रक्रिया ओळख विधेयक मंजूर
गुन्हेगारी प्रक्रिया (ओळख) विधेयक आज बुधवारी राज्यसभेत मंजूर करण्यात आले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी वरिष्ठ सभागृहात या विधेयकावर चर्चा करताना गुन्ह्यांच्या तपासात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे, असे सांगितले.
शहा यांनी सांगितले की मोदी सरकार सूडबुध्दीने कोणताही कायदा करत नाही. सध्याच्या भारतीय दंडविधानातील दोष दूर करण्यासाठी हे दुरूस्ती विधेयक आणले आहे ज्यांनी वर्षानुवर्षे देशाची सत्ता सांभाळली त्यांना हे करण्याची बुध्दी झाली नाही. आता आम्ही काही चांगल्या गोष्टी घेऊन आलो तर त्यालाही विरोध होत आहे. यात कोणाच्याही खासगी अधिकारांचा भंग होत नाही. केरळमध्ये शेकडो भाजप कार्यकर्त्यांची हत्या झाली त्याला कोण जबाबदार आहे ? राजकारणच करायचे तर माझ्याबरोबर बंगालमध्ये करा, असे खुले आव्हान अमित शहा यांनी दिले.
शहा म्हणाले की दोष सिध्द करण्याचे प्रमाण वाढविणे, न्यायवैद्यक प्रयोगशाळांची क्षमता वाढविणे, डाटा प्रक्रिया सरळ व सुलभ करणे आदी या कायद्याचे उद्देश आहेत. आमचा सध्याचा कायदा इतर देशांच्या तुलनेत ‘बालका’ प्रमाणे आहे. ब्रिटन, दक्षिण अफ्रिका , अमेरिका कॅनडा आदी अनेक देशांतील कायदे कितीतरी जास्त कडक आहेत. स्वातंत्र्याचा दुरूपयोग करणारांना शिक्षा हे स्वातंत्र्याचे हनन होत नसल्याचे सांगून ते म्हणाले की गुन्हेगारांच्या शरीराचे माप घेणे व सारे ठसे एकत्र करणे व त्यांचे हस्ताक्षर आदींचा यात समावेश आहे.हा डाटा सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाची असेल.