मुंबई : विक्रांत आंदोलन हे बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीवार्दाने सुरु झाल्याचे किरीट सोमय्या यांनी सांगितले आहे. यामुळे शिवसेनाही या आंदोलनात सहभागी होती, असे त्यांनी म्हटले आहे. ‘किरण पैगणकर या व्यक्तीने सेव्ह विक्रांत ही मोहीम सुरु केली. मी त्यावेळी मुंबई भाजपचा अध्यक्ष होतो. मी केवळ त्याला बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे घेऊन गेलो होतो,’ असे सोमय्या म्हणाले.
बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादाने 1998 मध्ये विक्रांत सेव्ह मोहीम सुरू झाली असा मोठा गौप्यस्फोट किरीट सोमय्या यांनी केला. भाजप-शिवसेना संयुक्त सरकार महाराष्ट्रात होतं, विक्रांत वाचवा, त्याचं स्मारक झालं पाहिजे ही मागणी घेऊन आम्ही बाळासाहेबांकडे गेलो होतो. त्यांच्या आशीर्वादानेच सेव्ह विक्रांत मोहीम आखली गेली असं सोमय्या म्हणाले.
2013 मध्ये त्यावेळच्या पृथ्वीराज सरकार आणि केंद्रातील काँग्रेस सरकारने निर्णय घेतला की विक्रांत भंगारमध्ये काढतोय. म्हणून 17 डिसेंबरला भाजप आणि शिवसेनेचं एक शिष्ठमंडळ राष्ट्रपती प्रणव मुखर्जींना भेटलं. त्यानंतर मुंबई महापालिकेने प्रस्ताव केला आम्ही पैसे देतो, विक्रांतचं स्मारक करा. ही मोहिम होती. त्या मोहिमेचा एक भाग म्हणून चर्चगेट स्थानकावर १० डिसेंबरला विक्रांत वाचवा या म्हणून उभे राहिले. डब्यात फक्त पाच पंधरा हजार रुपये गोळा होतात. केवळ 35 मिनिटेच आयएनएस विक्रांत वाचवण्यासाठी निधी गोळा केल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला.
विक्रांत सेव्ह निधी संकलन 10 डिसेंबर 2013 रोजी झालं. किरिट सोमय्या यांनी 58 कोटी रुपये ढापले असा आरोप होत आहे. हो मी कार्यक्रम केला होता. आता 11 वर्षांनी संजय राऊत यांनी मुद्दा काय काढला 58 कोटी रुपये गोळा केला. संजय राऊत अडकले आहेत म्हणून नौटंकी करत आहेत.
संजय राऊत कारवाई झाली की दरवेळी काही तरी स्टंट करतात.
आता नवीन आरोप सुरु आहे. INS विक्रांतचा 58 कोटी रुपयांचा घोटाळा. याची त्यांनी कागदपत्र द्यावीत. यशवंत जाधववर कारवाई झाली म्हणून यांची मुंबईला वेगळी करण्याची भाषा सुरु आहे, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.
The Vikrant Save Campaign was blessed by Balasaheb Thackeray – Kirit Somaiya
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
25 वर्ष महापालिकेत यांची सत्ता, यशवंत जाधव यांची कंत्राटदारांशी पार्टनरशिप. ज्या बुलेट जॅकेटचा ज्यांनी घोटाळा केला, तो विमल अग्रवाल यशवंत जाधवचा पार्टनर आणि त्याच्यावर कारवाई करण्यासाठी किरीट सोमय्या सांगतो तर हा महाराष्ट्र द्रोही. कितीही आरोप झाले तरी ठाकरे सरकारच्या डर्टी डझनवर कारवाई होणारच असा इशाराही किरीट सोमय्या यांनी दिला आहे.
सध्या सोशल मीडियावर किरीट सोमय्या यांची फेसबुक पोस्ट व्हायरल होत आहे. किरीट सोमय्या यांनी यामध्ये म्हटले की, महाराष्ट्राच्या राज्यपालांची किरीट सोमय्या यांनी भेट घेतली. या भेटीत आयएनएस विक्रांत युद्धनौका वाचवण्यासाठी त्यांनी राज्यपालांना विनंती केली. त्याशिवाय विक्रांत शहीद स्मारक संग्रहालयासाठी 140 कोटी रुपये मुंबईकर जमवतील, असेही सोमय्या यांनी त्यांना सांगितले.
ही पोस्ट आता मजकूरासह व्हायरल होत आहे. याबाबत माहिती देताना भाजप नेते किरीट सोमय्या म्हणाले की, केवळ 35 मिनिटेच आयएनएस विक्रांतसाठी निधी गोळा केला. मी एवढ्या वेळात असे किती पैसे गोळा करु शकतो. 10 डिसेंबर 2013 रोजी प्रतिकात्मक कार्यक्रम केला होता फक्त.
काँग्रेसनंही भिक मांगो आंदोलन केले होते. मग त्यांनी किती पैसे गोळा केले? असे किरीट सोमय्या म्हणाले आहेत. तसेच, ऐकीव माहितीवर मुंबई पोलीस एफआयआर कशी दाखल करू शकतात? त्यांनी एकही कागद नसताना एफआयआर कशी दाखल करून घेतली? असा सवालही किरीट सोमय्यांनी मुंबई पोलिसांना केला आहे.