बार्शी : खंडणीसाठी दुकानात घुसून दमदाटी करुन व्यापार्याला मारहाण झाल्याची घटना येथील आझाद चौकात घडली आहे. तुम्हाला बार्शी मध्ये धंदा करायचा असेल तर मला हप्ता दयावा लागेल, अशी दमदाटी करत मारहाण झाली.
याबाबत व्यापारी जितेंद्र चंदनमल ललवाणी (रा. रोडगा रस्ता, गणेश वस्त्र दालनच्या शेजारी, बार्शी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन बिट्टया उर्फ हर्षल रमाकांत होनराव (रा. एसबी टेलर चे पाठीमागे, आगळगाव रस्ता, सुभाषनगर, बार्शी) याच्याविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
जितेंद्र ललवाणी यांचे आझाद चौकात जितेंद्र मोबी वर्ल्ड नावाचे मोबाईल व अँक्सेसरीज विक्रीचे दुकान आहे. सायंकाळी 07/30 वा.चे सुमारास ते व भाऊ हितेश नेहमीप्रमाणे दुकानी असताना हर्षल होनराव हा तिथे येऊन पैशाची मागणी करु लागला. त्यावर त्यांनी कसले पैसे द्यायचे असे विचारले असता त्याने तुम्हाला बार्शी मध्ये धंदा करायचा असेल तर मला हप्ता द्यावा लागेल अशी दमदाटी केली.
यावर व्यापारी जितेंद्रने त्यास तुला हप्ता वगैरे काही देणार नसल्याचे स्पष्ट सांगून टाकले. त्यावर त्याने जर हप्ता देणे होत नसेल तर मी ज्यावेळी दुकानी येईल त्यावेळी मला फुकटात मोबाईल, मोबाईलचा चार्जर तसेच अँक्सेसरीज द्यावे लागतील अन्यथा तुम्हाला येथे धंदा करु देणार नाही अशी दमदाटी करून शिवीगाळी केली. त्याने अंगातील शर्ट काढला व तो काऊंटरवर टाकला. दुकानातील गोंधळ ऐकून काय झाले हे पाहण्यासाठी जितेंद्रचे वडील चंदनमल दुकानात आले. त्यांना हर्षल याने मारहाण केली.
Barshit bribes a trader to enter a shop for a ransom
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
फिर्यादीस हातातील कढ्याने डावे डोळ्याचे बाजूस, डावे कानावर मारले. गळ्यावर, डावे हातावर नखाने ओरबडून जखमी केले. भावास लाथाबुक्क्याने मारहाण केली. लोक जमा होवू लागताच मोबाईल, एस.बी.आय. बँकेचे पासबूक व त्याचे मोटारसायकलची चावी तेथेच काऊंटरवर सोडून तुम्ही येथे धंदा कसा काय करताय हेच पाहतो. मी उद्या परत येऊन पैसे मागत असतो. पैसे नाही दिले तर अजून येऊन मारहाण करणार असे म्हणून तेथून निघून गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
□ पाटबंधारे विभागाचा लाचखोर कर्मचा-याला अटक
शेत जमीन विक्री करण्याकरीता पाटबंधारे विभागाच्या लाभक्षेत्रात येत नसल्याचा दाखल्याची एकाने मागणी केली होती. हा दाखला देण्याकरिता आवश्यक असणारा अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्याकरिता ७ हजाराच्या लाचेची मागणी केली होती.
ही लाचेची रक्कम स्वीकारताना पाटबंधारे विभागाच्या मोजणीदारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी रंगेहात पकडले. सुखदेव मारुती सुतार (वय ५३ वर्षे पद मोजणीदार, शाखाधिकारी पाटबंधारे शाखा, जवळगाव ता. बार्शी) असे लाच घेताना अटक करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.
यातील तक्रारदार यांची मौजे सासुरे तालुका बार्शी येथील शेत जमीन विक्री करण्याकरीता पाटबंधारे विभागाच्या लाभक्षेत्रात येत नसल्याचा दाखल्याची एकाने मागणी केली होती. हा दाखला देण्याकरीता आवश्यक असणारा अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्याकरीता ७ हजाराच्या लाचेची मागणी करण्यात आली होती.
सदरची लाच रक्कम सुतार यांनी स्वतः स्विकारली म्हणून त्यांच्याविरुध्द वैराग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई संजीव पाटील, पोलीस उप अधीक्षक, पोलीस अमलदार घुगे, ॲन्टी करप्शन ब्युरो सोलापूर यांनी पार पाडली आहे.