सातारा : साताऱ्यातील जिल्हा क्रीडा संकुलात 64 व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेची अंतिम लढत पार पडली. महाराष्ट्र केसरीच्या गदेसाठी पृथ्वीराज पाटील आणि विशाल बनकर यांच्यात भिडत झाली. यात पृथ्वीराज पाटील याने विजय मिळवला. कोल्हापूरचा पैलवान पृथ्वीराज पाटील याने 5-4 च्या फरकाने मुंबईच्या विशाल बनकरला मात दिली. विशेष म्हणजे जवळपास 21 वर्षानंतर कोल्हापूरला महाराष्ट्र केसरीची मानाची गदा मिळाली आहे.
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा गतविजेता हर्षवर्धन सादगीरचा महाराष्ट्र केसरी 2022 च्या उपांत्य फेरीत पराभव झाला आहे. पुण्याचे हर्षद कोकाटेने त्याच्यावर विजय मिळवला. हा सामना अत्यंत चुरशीचा झाला. आता अंतिम फेरीत पृथ्वीराज पाटील आणि हर्षद कोकाटे यांच्यात लढत होणार आहे. यंदाच्या स्पर्धेत अनेक दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यातच पावसानेही स्पर्धेत व्यत्यय आणला.
काल शुक्रवारी वळवाच्या पावसाने तडाखा दिल्यानंतर आज शनिवारी सकाळी सेमी फायनलचे सामने झाले. यामध्ये माती गटात विशाल बनकर याने महेंद्र गायकवाड आणि सिकंदर शेख यांना चितपट करून मुख्य स्पर्धेसाठी दावेदारी केली. तर पृथ्वीराज पाटील याने अक्षय शिंदे आणि हर्षल कोकाटे यांचा पराभव करत मुख्य स्पर्धेतील प्रवेश निश्चित केला आहे. पृथ्वीराज पाटीलने पुणे शहरच्या हर्षद कोकाटेवर एकतर्फी विजयाची नोंद केली, तर शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या लढतीत विशालने वाशिमच्या सिकंदर शेखवर तेरा विरुद्ध दहा गुण फरकाने मात केली.
Prithviraj Patil becomes Maharashtra Kesari winner; Maharashtra Kesari – Defeated past winner Harshvardhan
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
ताकदीच्या आणि कौशल्य पणाला लावणाऱ्या कुस्ती खेळातही संयम किती महत्वाचा असतो याचे उत्तम उदाहरण समोर ठेवत कोल्हापूरच्या वीस वर्षीय पृथ्वीराज पाटील पदार्पणातच प्रतिष्ठेचा महाराष्ट्र केसरीचा किताब मिळविला. कोल्हापूरातील पन्हाळा येथील असणाऱ्या पृथ्वीराजची कुस्ती कोल्हापूरातूनच शाहू कुस्ती केंद्रातून झाली. जालिंधर मुंढे यांच्याकडे कुस्तीची बाराखडी गिरवल्यानंतर पृथ्वीराजने कुमार गटातून जागतिक पदकापर्यंत मजल मारली आणि आता प्रतिष्ठेच्या महाराष्ट्र केसरी किताबावरही त्याने आपले नाव कोरले.
लष्कराच्या सेवेत असणारा पृथ्वीराज मराठ लाईफ इंन्फट्रीमध्ये असून, सध्या पुण्यात लष्कराचा केंद्रात त्याचा राम पवार आणि निंबाळकर यांच्याकडे तो सराव करतो. ताकद आणि चपळता ही त्याची ताकद असली, तरी संयम हा त्याचा सर्वात महत्वाचा गुण आणि त्याच जोरावर त्याने कोल्हापूरला २१ वर्षांनी प्रतिष्ठेचा किताब मिळवून दिला. विनोद चौगुले याच्यानंतर प्रथमच कोल्हापूरला हा मान मिळाला.
माजी विजेता बाला रफिक आणि संभाव्य विजेतेपदात पहिली पसंती मिळणारा सिकंदर शेख यांना हरवून मुंबईच्या विशाल बनकरने अंतिम फेरी गाठली होती. त्यामुळे पृथ्वीराजला ही लढत सोपी नव्हती. लढतीची सुरवातही तशीच झाली. खेळात निष्क्रियता आणल्यामुळे पंचांनी बनकरला इशारा दिला. त्यामुळे त्याला पुढील ३० सेकंदात गुण मिळविणे अपेक्षित होते. त्यामुळे बनकर अपेक्षितपणे आक्रमक झाला आणि त्याने ४ गुणांची कमाई करत मोठी आघाडी घेतली. लढतील पहिली फेरी संपत असताना पृथ्वीराजने बनकरला बाहेर ढकलत एक गुण घेतला.
विश्रांतीच्या १-४ अशा पिछाडीनंतरही दुसऱ्या फेरीतही पृथ्वीराज कमालीचा शांत होता. त्याने एक दोनदा बनकरचा पट काढण्याचा प्रयत्न केला. बनकरने आपल्या उंचीचा फायदा घेत त्याला जरुर अडवले. एक मिनिट शिल्लक असताना एक संधी मिळाली आणि पृथ्वीराजने दुहेरी पट काढत त्याच्यावर पकड मिळविली आणि त्याला खाली घेत झटपट चार गुणांची कमाई केली. ही आघाडी टिकवून ठेवत त्याने किताबावर आपले नाव कोरले.