लखनौ : उत्तर प्रदेश मधील गोंडा येथे आसारामचे आश्रम आहे. त्या आश्रमातील एका अल्टो गाडीत अल्पवयीन मुलीचा मृतदेह सापडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार मुलीचे वय 14 वर्ष आहे. आश्रमात मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ माजली आहे. दरम्यान पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत.
अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण आणि खुनाच्या आरोपाखाली तुरुंगात असलेल्या आसाराम बापूच्या दीर्घकाळ तुरुंगात आहेत. मात्र आसारामचे आश्रम आजही देशाच्या अनेक भागात सुरू आहेत. त्याच्या उत्तर प्रदेशातील गोंडा येथील आश्रमातून अशी धक्कादायक घटना समोर आला आहे.
पोलीस आणि फॉरेन्सिक टीम आश्रम आणि वाहनाची चौकशी करत आहेत. तसेच आश्रम देखील सील करण्यात आलेय. प्रथमदर्शनी हा खून केल्यानंतर मृतदेह लपवून ठेवल्याची भीती व्यक्त केली जात असल्याची माहिती आहे.
उत्तर प्रदेशमधील गोंडा येथील आसाराम बापूच्या आश्रमामध्ये उभ्या असलेल्या कारमध्ये तरुणीचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. ही बातमी समजल्यावर घटनास्थळी जमाव जमला होता. मृतदेह सापडल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह ताब्यात घेतला. आता पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून, मृतदेह पोस्टमार्टेमसाठी रूग्णालयात पाठवण्यात आला आहे.
The body of a girl was found in Asaram Bapu’s ashram
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
दरम्यान, आश्रमात मृतावस्थेत सापडलेल्या तरुणीबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही तरुणी तिच्या घरामधून चार दिवसांपूर्वी बेपत्ता झाली होती. तिचा मृतदेह आसाराम बापूच्या आश्रमात अनेक दिवसांपासून उभ्या असलेल्या एका कारमध्ये सापडला. कारमधून दुर्गंधी येऊ लागल्याने कर्मचाऱ्यांनी कार उघडून पाहिले, तेव्हा त्यांना आत एका तरुणीचा मृतदेह दिसला. त्यानंतर याची माहिती पोलिसांना देण्यात आली.
त्यानंतर घटनास्थळावर पोहोचलेल्या पोलिसांनी आश्रम सील केला आणि पुढील तपासाला सुरुवात केली. पोलिसांनी सांगितले की, प्राथमिक तपासामध्ये हे प्रकरण हत्या करून मृतदेह लपवण्याचे दिसत आहे. ही घटना बिमौर गावातील आसाराम बापूच्या आश्रमात घडली आहे. तिथे ही कार गेल्या अनेक दिवसांपासून उभी होती.
पोलिसांनी सांगितले की, कारमधून दुर्गंधी आल्यानंतर आश्रमातील वॉचमनने कार उघडून पाहिली. त्यावेळी आतमध्ये एक मृतदेह दिसला. त्यानंतर त्याने याची माहिती पोलिसांना दिली. घटनास्थळावर आलेल्या पोलिसांनी कार आणि आश्रमाला सील केले. तसेच मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठवला. आता पोलीस आणि फॉरेंसिक टीम आश्रम आणि गाडीचा तपास करत आहेत.
मुलीच्या आईने सांगितले की, काही वर्षांपूर्वी माझे पतीही अचानक बेपत्ता झाले. ज्या लोकांनी माझ्या पतीला बेपत्ता केले त्याच लोकांनी माझ्या मुलीची हत्या केली आहे. मुलीच्या आईने काही नामांकित लोकांविरोधात तक्रार दिली आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.