औरंगाबाद : जिल्ह्यातील शिल्लेगाव पोलीस ठाणे हद्दीतील एक महिला आणि पुरुष कीर्तनकाराचा शारीरिक संबंध प्रस्थापित करत असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कीर्तनकार महाराजांची जिल्ह्यात प्रतिष्ठीत कीर्तनकार म्हणून ओळख आहे. व्हिडिओतील महिलादेखील महाराज आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महिलेने विषप्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तिच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
पंचक्रोशीत कीर्तनकार म्हणून प्रसिद्ध असलेले वैजापूर तालुक्यातील 48 वर्षीय महाराज आणि सिल्लोड तालुक्यातील चाळीस वर्षीय महिला यांचा एक अश्लील व्हिडिओ सध्या जाम व्हायरल होताना दिसून येत आहे.
या व्हिडिओत शारीरिक संबंध प्रस्थापित करत असताना हे दोघे दिसून येत आहे. त्यामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ माजली आहे. वारकरी संप्रदाय संघटनेकडून या कीर्तनकार महाराजावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. सदर प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्याने आपली बदनामी होत असल्याचे लक्षात येताच या महिलेने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. या महिलेवर औरंगाबाद येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
दरम्यान या कीर्तनकार महाराजांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज सेनेचे ह.भ. प. ज्ञानेश्वर महाराज डोणगावकर यांनी व्हिडीओमध्ये असलेल्या कीर्तनकार महाराज आणि महिलेवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
Famous kirtankar maharaja’s physical relationship video goes viral
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
वारकरी संप्रदाय संघटनेकडून या कीर्तनकार महाराजावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्याने आपली बदनामी होत असल्याचे लक्षात येताच या महिलेने विषप्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती आहे.
याबाबत शिल्लेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. आपल्या किर्तनातून भक्ती व समाजप्रबोधन करत असल्यामुळे लाखो लोक त्यांना आपले आदर्श मानतात. मात्र या दोघांनीही त्या लाखो श्रध्दाळू लोकांच्या धार्मिक भावनांवर मोठा आघात केला. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
दोघांतील या ‘रासलीले’चे मोबाईलमध्ये टिपलेले ‘मोक्याचे क्षण’ व्हिडीओ चित्रीकरणाच्या रूपात चुकून सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि अवघ्या वारकरी संप्रदायात खळबळ उडाली. आता स्वतःच्या अश्लील संबंधांचे चित्रीकरण करून ते सोशल मीडियावर व्हायरल करीत वारकरी संप्रदायाला बदनाम करण्यासह धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी या दोघांची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी छत्रपती शिवाजी महाराज सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिल्लेगाव पोलिस ठाण्यात निवेदनाद्वारे केली आहे.
या महाराजासोबत व्हिडिओमध्ये दिसणारी महिला देखील कीर्तनकार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. विविध ठिकाणी भागवत कथेच्या निमित्ताने एकत्र आल्यानंतर या दोघांचे ‘सूर’ जुळले. त्यातूनच त्यांच्यात अनैतिक संबंध निर्माण झाले. त्यानंतर या दोघांमधील एका ठिकाणी परस्पर सहमतीने सुरु असलेल्या शारीरिक संबंधांचा आक्षेपार्ह व्हिडीओ समोर आला असून, हे चित्रीकरण महाराजानेच केल्याची शंका व्यक्त होत आहे. मोबाईलमध्ये चित्रीकरण झाल्यानंतर महाराजाच्या हातून चुकून हा व्हिडीओ सोशल मीडियावर टाकला गेला आणि त्यातूनच या प्रकरणाचा भांडाफोड झाल्याची चर्चा सुरु झाली आहे.