Tuesday, January 31, 2023
Surajya Digital
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

18 वर्षांवरील सर्वांना बुस्टर डोस; खासगीत बुस्टर डोसला मोजावे लागणार पैसे

Surajya Digital by Surajya Digital
April 9, 2022
in Hot News, देश - विदेश
0
18 वर्षांवरील सर्वांना बुस्टर डोस; खासगीत बुस्टर डोसला मोजावे लागणार पैसे
0
SHARES
39
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

नवी दिल्ली – केंद्राने डोस घेण्याची परवानगी जरी बुस्टर दिली असली तरी हा डोस मोफत उपलब्ध होणार नाही. सीरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांच्या म्हणण्यानुसार कोविशिल्डची किंमत टॅक्ससहीत ६०० रुपये असणार आहे. त्याचबरोबर कोवोव्हॅक्सच्या बुस्टर डोसची किंमत ९०० रुपये बुस्टर असून त्यावर टॅक्स लागणार आहे.

१८ वर्षांवरील सर्व नागरिकांना आता रविवार म्हणजेच १० एप्रिलपासून खासगी लसीकरण केंद्रावर कोरोनाचा तिसरा डोस अर्थात बुस्टर डोस दिला जाणार आहे. जर कोणी व्यक्ती कोरोनाचा बुस्टर डोस घेऊ इच्छित असेल तर , तो खासगी रुग्णालयात जाऊन तिसरा डोस घेऊ शकते.

देशातील १८ वषावरील सर्व नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीचा बूस्टर डोस (दक्षता मात्रा) १० एप्रिलपासून देण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केली. दक्षता मात्रा खासगी लसीकरण केंद्रातही उपलब्ध होणार आहे.

Booster dose for all over 18 years; The private booster dose will cost money

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

लसीचा दुसरा डोस घेउन नऊ महिने झालेल्यांना दक्षता मात्रा घेता येईल. सर्व खासगी केंद्रांमध्ये ही सुविधा असेल. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडिविया यांनी द्वीट करून ही माहिती दिली. लसीच्या आतापर्यंत १८५.३८ मात्रा देण्यात आल्या आहेत.

१५ वर्षांवरील ९६ टक्के लोकांना लसीची पहिली, तर ८३ टक्के लोकांना दुसरी मात्रा देण्यात आली आहे. २.४ कोटींहून अधिक आरोग्य व फ्रंटलाईन कर्मचारी तसेच ६० वर्षांवरील ज्येष्ठांना दक्षता मात्रा दिली आहे. 12 ते 14 वयोगटातील ४५ टक्के मुलांना पहिली मात्रा टोचण्यात आली आहे.

सध्या सर्व पात्र नागरिकांना लसीची पहिली आणि दुसरी मात्रा सरकारी केंद्रांद्वारे देण्याची मोहीम सुरूच राहील. तसेच आरोग्य व फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांसह ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांनाही दक्षता मात्राही सरकारी केंद्रांमधून देण्यात येईल. मात्र, १८ ते ५९ या वयोगटातील नागरिकांना दक्षता मात्रा निःशुल्क मिळणार नाही. कोविशील्डसाठी ६०० रुपये तर कोवोवॅक्ससाठी ९०० रुपये अधिक कर, असे शुल्क मोजावे लागेल. कोवॅक्सिनच्या दक्षता मात्रेची किंमत जाहीर करण्यात आलेली नाही.

 

Tags: #18वर्षांवरील #सर्वांना #बुस्टर #डोस #खासगी #बुस्टर #डोस #पैसे#Booster #dose #allover #18years #private #booster #dose #costmoney
Previous Post

उदयनराजेंची शरद पवारांवर जहरी टीका, मी म्हणायला हव का फार चांगल झालं

Next Post

अमरावतीत क्लिनिकला भीषण आग; 400 विद्यार्थ्यांचे ‘रेस्क्यू’

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
अमरावतीत क्लिनिकला भीषण आग; 400 विद्यार्थ्यांचे ‘रेस्क्यू’

अमरावतीत क्लिनिकला भीषण आग; 400 विद्यार्थ्यांचे 'रेस्क्यू'

वार्ता संग्रह

April 2022
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
252627282930  
« Mar   May »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697