कोल्हापूर : भाजप नेते छत्रपती उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जहरी टीका केली आहे. “आपण जे कर्म करतो ते याच जन्मी फेडावे लागते, ” असे उदयनराजे म्हणाले. संतप्त एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या बंगल्यावर जाऊन येथे चप्पलफेक आणि दगडफेक केली. या घटनेवरून उदयनराजे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी शरद पवार यांच्या घरावरील हल्ला प्रकरणात उदयनराजे यांची प्रतिक्रिया विचारली होती. त्यावर बोलताना उदयनराजे म्हणाले की, माझ्याकडून नेमक काय अपेक्षा आहे. मी म्हणायला हव का फार चांगल झालं, व्हायलाच पाहिजे, झालच पाहिजे होते. पण हा फार छोटा विचार आहे. कर्म असत ना ते प्रत्येकाला लागू होते. आपण जे या जन्मी करतो, ते सगळ्यांना लागू होते. आपण या जन्मी करतो, ते या जन्मीच फेडाव लागत अशा शब्दात उदयनराजे यांनी संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.
काँग्रेस, राष्ट्रवादीने घराणेशाही पुढे करून सत्ता मिळविली; मात्र त्यांना आता अहंकार आला आहे. केवळ सत्तेसाठीच ते एकत्र आले असून महाराष्ट्र अस्थिर आहे. वेगळी उद्दिष्ट्ये असणारे लोक आणि पक्ष सत्ता स्थापनेसाठी एकत्र येतात; मात्र त्यांची दिशा, वाटाही वेगळ्याच असतात, असे सांगून ते म्हणाले की, राजेशाहीचे रूपांतर लोकशाहीत करण्याचा विचार छत्रपती शिवरायांनी दिला.
Udayan Raje’s venomous criticism of Sharad Pawar, why should I say it was very good
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
आता मूठभर लोकांच्या हातात सत्ता एकवटली असून बाकी सर्वांना सोयीप्रमाणे वाकविले जात आहे. भाजपच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांनी चांगल्या प्रकारे राज्याची धुरा सांभाळली. त्यावेळी शिवसेना बरोबर होती, मग काय घडले की, त्यांनी चिरफाड करावी, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सर्वजण सत्ता टिकवण्यासाठीच एकत्र आहेत. मग, प्रगतीचा विचार त्यांच्या डोक्यात येणारच कसा, त्याचा विचार मतदारांनी करावा, असे ते म्हणाले.
शिवरायांचे नाव घेऊन शिवसेना स्थापन झाली. त्यांनी भाजपपासून फारकत घेताना विचार करायला हवा होता. लोकांना आकर्षित करण्यासाठी शिवरायांचा आधार घेता. मग, त्यांचे विचार का आचरणात आणत नाहीत, असा सवाल खा. उदयनराजे यांनी केला.
शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या घरावर दगडफेक आणि चप्पलफेक केली होती. त्यानंतर जवळपास १०७ आंदोलकांविरोधात गावदेवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणात एसटी संपकरी कर्मचाऱ्यांचे वकील ॲड. गुणरत्न सदावर्ते यांची मुंबई पोलिसांनी दीड तास चौकशी केली. त्यानंतर कट रचणे, तसचे शासकीय कामात अडथळा आणणे या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.