मुंबई : अनेक कंपन्यांमध्ये विविध पदांसाठी कर्मचाऱ्यांची भरती निघत आहे. पण कोरोना काळात ऑनलाईन शिक्षणामुळे मिळालेल्या गुणांवर कंपन्या विश्वास ठेवत नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांची पात्रता तपासण्यासाठी कंपन्यांकडून विशेष परीक्षा घेतली जात आहे. कोरोना काळात अभियांत्रिकीच्या काही विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल करता आली नव्हती आणि त्यातच त्यांना ऑनलाईन परीक्षेत 90 टक्क्यांहून अधिक गुण मिळाले होते.
कोरोनाचे सर्व निर्बंध हटविल्यानंतर कंपन्यांनी कर्मचारी भरती मोठ्या प्रमाणावर सुरू केली आहे; मात्र विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षा व मिळालेले गुण यावर कंपन्या भरवसा ठेवत नसून आता कंपन्या स्वत:च परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांची पात्रता तपासत आहे.
कोरोना काळात परिस्थिती बिकट असल्याने विद्यार्थ्यांच्या परीक्षा नेहमीच्या सारख्या घेता आल्या नाहीत. त्यामुळे ऑनलाईन परीक्षांचा मार्ग स्वीकारला गेला. पण आता या काळात ऑनलाईन परीक्षा देऊन पास झालेल्या विद्यार्थ्यांचे टेन्शन वाढले आहे. त्याचे झालेय असे की, मागील दोन वर्षांत जवळपास अनेक ठिकाणची नोकर भरती बंद होती.
Special examination for the job of those who passed the Corona period
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
परंतु आता कोरोनाचे सर्व निर्बंध हटविल्यानंतर कंपन्यांनी कर्मचारी भरती सुरू केली आहे. परंतु आता या कंपन्या विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षा व मिळालेले गुण यावर भरवसा ठेवत नसताना दिसून येत आहेत. त्यामुळे या कंपन्या स्वत:च परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांची पात्रता तपासत आहे. म्हणजेच या विद्यार्थ्यांच्या पुन्हा परीक्षा कंपनीमार्फत घेतल्या जात आहेत.
गेल्या दोन वर्षांत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना कोरोनामुळे ऑनलाईन पद्धतीने शिक्षण घ्यावे लागले. अभियांत्रिकीसह सर्वच अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रॅक्टिकल (प्रात्यक्षिक)करता आले नाही. त्यातच विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आल्या. बहुपर्यायी प्रश्नांच्या आधारे झालेल्या परीक्षेमुळे विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले. त्यामुळे नोकरी कोणाला द्यावी, असा प्रश्न कंपन्यांसमोर उभा राहिला.
□□□□□।□□□□□□□□।□□□□
□ ‘फुले’ सिनेमाचा फर्स्ट लूक रिलीज
#surajyadigital #firstlook #phule #JyotibaPhule #फुले #release #सुराज्यडिजिटल
समाज सुधारक महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित ‘फुले’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तत्पूर्वी महात्मा ज्योतिबा फुले जयंतीचे औचित्य साधत या चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राष्ट्रीय पारितोषिक विजेते दिग्दर्शक अनंद नारायण महादेवन यांनी केले आहे.