ठाणे : ठाण्यातल्या सभेत आज मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा मशिदींवरील भोंग्याचा मुद्दा मांडला. 3 मेपर्यंत सर्व मशिदींवरील भोंगे उतरवा, नाहीतर मशिदींसमोर हनुमान चालिसा लावणारच, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे. तसेच भोंग्याविरोधात मी पहिल्यांदा बोललो नाही, याच्या आधीही आपण विरोध केला आहे, असेही ते म्हणाले. केंद्र आणि राज्य सरकारने या बाबतीत लक्ष घालावे, असे आवाहन राज यांनी केले.
गुढीपाडव्याच्या बहुचर्चित सभेनंतर राज ठाकरे आज पुन्हा एकदा एक मोठी सभा घेतली. या सभेत ठाकरे यांनी आपल्यावर झालेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले. या सभेसाठी जोरदार वातावरणनिर्मिती करण्यात आली होती.
भोंग्यांचा आवाज हा बेसूरा असतो, त्यामुळे शांतता बिघडते असं सांगत राज ठाकरे म्हणाले की, “इतरांची शांती बिघडवून तुम्ही तुमचा भोंगे वाजवून प्रार्थना करा, असा कोणताही धर्म सांगत नाही. इतरांची शांती भंग होईल अशा कोणत्याही गोष्टीला परवानगी देण्यात येणार नाही असं 18 जुलै 2005 च्या सर्वोच्च न्यायालयाच्या एका सुनावणीत सांगितलं आहे.
आता 3 तारखेपर्यंत ऐकला नाही तर देशभरातील मशिदींच्या समोर हनुमान चालीसा लावा.”
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे राज्यातील गृहखातं अंमलबजावणी का करत नाही असा सवाल राज ठाकरेंनी केला आहे. राज्य सरकारचे हे मतांसाठी राजकारण सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
मशिदीच्या भोंग्यावर आपण या आधीही आवाज उठवल्याचं राज ठाकरेंनी या सभेमध्ये सांगितलं आहे. मशिदींच्या भोंग्याच्या आवाजासंबंधी मी या आधीही आवाज उठवला होता, अजित पवारांना तो ऐकू आला नाही. या मशिदीच्या भोंग्यामुळे देशाला त्रास होतोय, यामध्ये धार्मिक विषय कुठेय असा सवाल राज ठाकरेंनी केला आहे.
अजित पवारांना या आधीच्या वक्तव्याची आठवण करुन देण्यासाठी राज ठाकरेंनी ‘लाव रे तो व्हिडीओ’ चा मार्ग अवलंबला. राज ठाकरे म्हणाले की, “मशिदींच्या भोंग्यांमुळे लोकांना त्रास होतोय. रस्त्यांवरील नमाजामुळे लोकांना त्रास होतोय. राज्य सरकारने याचा सोक्षमोक्ष लावावा, आम्ही आमची भूमिका सोडणार नाही.”
Blow down the horns on mosques by May 3, otherwise: Raj Thackeray same civil law
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
□ राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष हा निवडून येणाऱ्या आमदारांची मोळी
राज ठाकरे पुढे म्हणाले, ”अजित पवारांच्या घरावर ईडीची धाड पडते मग सुप्रिया सुळे यांच्यावर का पडत नाही. पवार साहेब खूश झाले तर राजकीय नेत्यांना भिती वाटायला लागते. आता पवारसाहेब संजय राऊतांवर खूश आहेत. मी कधीही पवारसाहेबांना भडकताना पाहिलं नाही. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी नरेंद्र मोदी यांना आवाहन केलं होतं की, तुम्ही पंतप्रधान झाले की, उत्तरप्रदेश, बिहार आणि झारखंड सारख्या राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या लोकांना आवरा. त्याचबरोबर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष हा निवडून येणाऱ्या आमदारांची मोळी आहे, आणि पवारसाहेब त्या मोळीची रस्सी आहेत एवढचं.
□ देशात समान नागरी कायदा आणा : राज ठाकरे
#RajThackeray #political #राजठाकरे #सुराज्यडिजिटल #समान #नागरी #कायदा #Thesamecivillaw #surajyadigital
》 देशात समान नागरी कायदा लागू करा आणि लोकसंख्येवर नियंत्रण आणणारा कायदा करा, अशा 2 मागण्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केल्या आहेत. ठाण्यातल्या आजच्या ‘उत्तर सभे’त बोलताना त्यांनी या मागण्या केल्या. यावेळी त्यांनी गुढीपाडव्याच्या सभेवर टीका करणाऱ्यांना उत्तर दिले आहे. तसेच मला ट्रॅक बदलण्याची गरज नाही, असेही राज ठाकरे म्हणाले.
ज्यावेळी मोदी सरकारने जम्मू-काश्मीर संबंधातील कलम 370 रद्द केलं त्यावेळी ट्वीट करणारा पहिला व्यक्ती मी होतो. देशात समान नागरी कायदा आणि लोकसंख्या नियंत्रण करणारा कायदा आणा अशी मी मागणी मोदी सरकारकडे करत असल्याचे सांगितले.
□ शरद पवारांच्या घरावरील हल्ल्याची उडवली खिल्ली
राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याबद्दल खिल्ली उडवली आहे. माझ्या ताफ्याला अडवल्याचं इंटेलिजन्सला कळलं पण पवारांच्या घरावरच्या हल्ल्याबद्दल कळलं नाही, अशा शब्दांत त्यांनी टोला लगावला आहे.
आपल्या भाषणाची सुरूवात करताना राज ठाकरे म्हणाले,” व्यासपीठावर येताना मला अग्निशमन दलाचा बंब दिसला. पण मी इतकी काही आग लावणार नाहीये. आज दुपारी मी बसलो असताना एका पोलीस अधिकाऱ्याचा फोन आला. त्यांनी मला विचारलं किती वाजता निघणार आहात? म्हटलं का? तर म्हणे काही संघटना तुमचा ताफा अडवण्याचा प्रयत्न करणार आहेत. आम्ही त्यांना ताब्यात वगैरे घेऊ. मी म्हटलं निघेन तेव्हा कळवतो. महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्या ताफ्याला कुणीतरी अडवणार आहे, हे इंटेलिजन्सला कळलं, पण पवारांच्या घरी एसटीचे लोक जाणार आहेत, हे इंटेलिजन्सला नाही कळलं. खरंतर त्यांना प्रत्येक गोष्ट माहिती असते. तुम्ही साधे शिंकलात तरी ती शिंक साधी आहे की करोनाची हेही त्यांना माहित असतं, मग एवढी मोठी गोष्ट त्यांना कळली नाही?”
□ पत्रकारांवर राज ठाकरे घसरले
आपल्या भाषणात राज ठाकरे यांनी अनेक पत्रकार राजकीय पक्षांचे मांडलिक बनल्याचे म्हणत पत्रकारांवरही घसरले. गुढीपाडव्याच्या दिवशी अनेक पत्रकार आपली स्वत:ची एक स्क्रीप्ट घेऊन आले होते. राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी ज्या प्रकारे शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस कशाप्रकारे एकत्र आले त्यावर मी गुढीपाडव्याच्या वेळी बोललो होतो. मला कोणत्याही प्रकारचा ट्रॅक बदलण्याची गरज वाटत नाही. तसेच कोणत्याही नोटीसी येऊदे मग त्या राजकीय असो किंवा कायदेशीर मी त्यास भीक नाही घालत नसल्याचे म्हणाले.
●●●●●●●●●●●●●●
उत्तर सभा : आज शरद पवार राऊतांवर खूष आहेत, कधी टांगलेला दिसेल सांगता येत नाही!
– राज ठाकरे
□□□□□□□□□□□
“शरद पवारांचा मंदिरात हात जोडतानाचा फोटो मिळणार नाही, ते नास्तिक आहेत”
– राज ठाकरे
#नास्तिक #सुराज्यडिजिटल #Atheists #temple #surajyadigital #sharadpawar #RajThackeray