मुंबई : स्कायमेट या खासगी संस्थेने देशभरातील यंदाच्या मान्सूनचा अंदाज जारी केला आहे. यंदा मान्सून सामान्य राहिल, असं स्कायमेटकडून सांगण्यात आलं. देशभरात मान्सून (जून ते सप्टेंबर) सरासरीच्या 98 टक्के राहण्याची शक्यता आहे. पावसाळ्याचा पूर्वार्ध उत्तरार्धापेक्षा चांगला असेल अशी अपेक्षा आहे. जून महिन्याच्या सुरुवातीला मान्सूनची एन्ट्री दमदार असेल, असा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे.
राज्यात एकीकडे उन्हाचा पारा वाढत असतानाच दुसरीकडे मात्र, यावर्षी चांगला पाऊस राहण्याचा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. यंदा सरासरीच्या 98 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. जून ते सप्टेंबर या महिन्यात 880 मिमी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याआधी फेब्रुवारीमध्ये स्कायमेटने सामान्य मान्सूनचा अंदाज वर्तवला होता. तो कायम ठेवला आहे. ला निना आणि एल निनोचा प्रभाव मान्सूनवर पडणार नाही, असे देखील स्कायमेटने म्हटले आहे.
शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी अशी की, यंदाचा मान्सून त्यांच्यासाठी चांगला असेल, कारण, सुरुवातीच्या महिन्यात पिकांच्या पेरणीसाठी चांगला पाऊस होईल, यामुळे शेतकऱ्यांना फायदा होईल. यंदा महाराष्ट्रात मान्सून सामान्य राहिल असा अंदाज खाजगी हवामान अंदाज एजन्सी स्कायमेटकडून वर्तवण्यात आला आहे. मान्सूनची सुरुवात चांगली होईल आणि जून महिन्यातच जास्तीत जास्त पाऊस अपेक्षित असल्याचे स्कायमेटने सांगितले आहे.
राज्यात अनेक भागात तापमानात चढउतार होत असल्याने कोकण, मध्य महाराष्ट्रात अवकाळी पावसाची परिस्थिती निर्माण झाली आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात आणखी दोन ते तीन दिवस पावसाळी स्थिती राहणार आहे. मात्र उत्तर महाराष्ट्रात उष्णतेची लाट कायम राहणार आहे.
Skymet forecasts 98 percent of the average rainfall this year
#Monsoon2022: #Skymet expects the upcoming monsoon to be ‘normal’ to the tune of 98% (with an error margin of +/- 5%) of the long period average of 880.6mm for the 4- month long period from June to September. #MonsoonForecast https://t.co/bDJoK7BkYp
— Skymet (@SkymetWeather) April 12, 2022
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरी 880.6 मिमी पाऊस पडतो. दीर्घकालीन सरासरीच्या 96 ते 104 टक्के पाऊस हा सरासरीइतका म्हणजेच सर्वसाधारण मानला जातो. गुजरातमध्ये सामान्यपेक्षा कमी पावसाचा अंदाज आहे. तर, पंजाब, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाणा आणि महाराष्ट्रात जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. केरळ आणि कर्नाटकच्या उत्तर भागात जुलै आणि ऑगस्टच्या महिन्यांत कमी पाऊस असेल.
पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेश, उत्तर भारतातील कृषिबहुल क्षेत्रे तसेच महाराष्ट्र, मध्यप्रदेश अशा राज्यांमध्ये सामान्य पातळीपेक्षा अधिक पाऊस पडेल. जूनपासूनच या प्रदेशांत उत्तम पाऊस असेल. गेल्या दोन वर्षी मोसमी पावसावर ला निनाचा प्रभाव होता. तत्पूर्वी ला निनाचा प्रभाव हिवाळ्याच्या ऋतूत वेगाने घटला. मात्र, पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांची गती अधिक असल्याने ला निनाचा प्रभाव कमी होण्याची प्रक्रिया थांबली आहे.
नैऋत्य मोसमी पावसाच्या सुरुवातीपर्यंत ला निनाचा प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अल निनोची शक्यता नाही. मोसमातील पहिले दोन महिने शेवटच्या दोन महिन्यांपेक्षा अधिक चांगले असतील. यंदाचा मान्सून शेतीसाठी चांगला असेल. कारण, सुरुवातीच्या महिन्यात पिकांच्या पेरणीसाठी चांगला पाऊस होईल.
स्कायमेटने दिलेल्या अंदाजानुसार राजस्थान, गुजरात, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि ईशान्येकडील त्रिपुरा सोबतच संपूर्ण हंगामात पावसाच्या कमतरतेची शक्यता आहे. केरळ आणि उत्तर अंतर्गत कर्नाटकात जुलै आणि ऑगस्टच्या मुख्य मान्सून महिन्यांत कमी पाऊस पडेल. पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, उत्तर भारतातील कृषी क्षेत्र आणि महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या पावसावर आधारित भागात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होईल. जूनच्या सुरुवातीला मान्सूनची सुरुवात चांगली होईल.