मुंबई : दाऊद इब्राहिम कनेक्शनच्या मनी लाँड्रिंग प्रकरणी मंत्री नवाब मलिक यांना मोठा धक्का बसला आहे. मलिक हे सध्या तुरुंगात असून ईडीकडून 8 मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. यात नवाब मलिकांची उस्मानाबादेतील 148 एकर जमीन, कुर्ला पश्चिमेतील व्यावसायिक जागा, कुर्ला पश्चिमेतील तीन फ्लॅट्स, कुर्ल्यातील गोवावाला कम्पाऊंड, वांद्रे पश्चिमेतील दोन फ्लॅट्स आणि ठाण्यातील संपत्ती जप्त करण्यात आली.
ईडीने नवाब मलिकांची संपत्ती जप्त केली आहे. यामध्ये मुंबईतील महत्त्वाची संपत्ती आणि उस्मानाबादेतील 148 एकर जमिनीचा समावेश आहे. ईडीने संबंधित कारवाई ही मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी केली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. ईडीने नवाब मलिकांचे मुंबईतील पाच फ्लॅटवर जप्ती आणली आहे.
यातील तीन फ्लॅट हे कुर्ला तर दोन फ्लॅट हे वांद्रे परिसरातील आहेत. ईडीने नवाब मलिक यांची उस्मानाबाद येथील 148 एकर शेतजमीनही ताब्यात घेतली आहे. ईडीने मलिकांच्या एकूण 9 मालमत्तांवर टाच मारली आहे. ईडीची अद्यापही चौकशी सुरु आहे.
पण ईडीने मलिकांच्या संपत्तीवर आणलेली जप्ती ही तात्पुरत्या स्वरुपाची असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या प्रकरणाचा तपास ईडी आणि एनआयएकडून सुरु आहे. तसेच नवाब मलिकही सध्या अटकेत आहेत. ईडीने प्रेसनोट जारी करत कारवाईबाबत माहिती दिली आहे.
नवाब मलिक यांनी मनी लॉन्ड्रिंग म्हणजेच आर्थिक गैरव्यवहार करुन संबंधित संपत्ती मिळवली आहे. म्हणून या संपत्तीवर जप्ती आणल्याचं ईडीचं म्हणणं आहे. कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित जे आर्थिक व्यवहार झाले आहेत त्या व्यवहारातून ही संपत्ती घेतली गेली असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे कुर्ल्यातील गोवावाला कम्पाऊंड, कुर्ल्यातील कमर्शिअल युनिट, तसचे कुर्ल्यातील 3 फ्लॅट आणि वांद्रेतील 2 फ्लॅट, तसेच उस्मानाबादेतील 148 एकर शेतजमिनीवर जप्त आणण्यात आली आहे.
Property of Nawab Malik confiscated along with 148 acres of land in Osmanabad
ED has provisionally attached 8 properties belonging to Mr. Mohammed Nawab Mohammed Islam Malik @ Nawab Malik, his family members, M/s. Solidus Investments Pvt. Ltd. & M/s. Malik Infrastructure under PMLA, 2002.
— ED (@dir_ed) April 13, 2022
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
ईडीने दिलेल्या माहितीनुसार, मलिक जवळपास 11 कोटी 70 लाख रुपये या संपत्तीमधून कंट्रोल करत होते. त्यांची सॉरीडोस नावाची कंपनी आहे. मलिक इन्फ्रास्ट्रकचरच्या माध्यमातून पैसे देण्यात आले होते. ईडीने चौकशी केली असता संबंधित संपत्ती आणि पैशांचा संबंध हा दाऊदशी संबंधित व्यक्तींसोबत येतोय.
तिथून हे सगळे पैसे आले असून त्यातून ही संपत्ती घेतली गेल्याचा दावा आणि आरोप ईडीने केला आहे. मरियम गोवाला नावाच्या महिलेची संपत्ती हडप केल्याचा आरोप करण्यात आला आहे. नवाब मलिक यांनी जप्त केलेल्या संपत्तीविषयी निवडणुकीच्यावेळी प्रतिज्ञापत्रात माहिती दिली होती का हे अद्याप तपासलेलं नाहीय. पण उस्मानाबादची संपत्ती वगळता इतर सर्व संपत्ती त्यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात दाखवल्या असाव्यात, अशी चर्चा सुरु आहे.
¤ या पाच मालमत्तावंर ईडीची टाच
१) गोवावाला कंपाऊंड (कुर्ला पश्चिम)
२) कर्मशिअल जागा गोवावाला कंपाऊंड
३) उस्मानाबाद येथील १४८ एकर शेतजमीन
४) कुर्ला येथील तीन फ्लॅट्स
५) वांद्रे पश्चिम येथील दोन फ्लॅट्स
नवाब मलिक यांचे मंत्रीपद काढून न घेण्याचा निर्णय हा गेल्या काही दिवसात महाविकास आघाडी सरकार आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने घेतला होता. नवाब मलिक यांच्याकडील अल्पसंख्याक मंत्रालयाचे खात्याची जबाबदारी ही जितेंद्र आव्हाड यांच्याकडे देण्यात आली. तर कौशल्य विकास विभागाची जबाबदारी ही राजेश टोपे यांच्याकडे देण्यात आली. तसेच नवाब मलिक यांच्याकडे असणारे परभणीचे पालकमंत्री पद हे धनंजय मुंडे यांना देण्यात आले आहे. नवाब मलिक यांच्यावर गंभीर आरोप असतानाही मंत्रीपद काढून न घेण्याबाबत विरोधकांनी टीका केली होती. तर खात्यांची जबाबदारी इतरांना दिल्यानंतर फक्त तांत्रिकदृष्ट्या मंत्रीपद ठेवण्यात आले असल्याचे विरोधी पक्षात असलेल्या भाजपने म्हटले होते.