Tuesday, January 31, 2023
Surajya Digital
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

जबरी चोरीचा फिर्यादीच निघाला चोर; वेळापूर पोलिसांनी बारा तासात केले चोरट्याला जेरबंद

सोलापूर शहरात अवैध धंद्यावर विशेष भरारी पथकाचा छापा

Surajya Digital by Surajya Digital
April 13, 2022
in Hot News, गुन्हेगारी, सोलापूर
0
जबरी चोरीचा फिर्यादीच निघाला चोर; वेळापूर पोलिसांनी बारा तासात केले चोरट्याला जेरबंद
0
SHARES
646
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

वेळापूर :  जबरी चोरीचा फिर्यादीच  १ लाख ८६ हजार रुपयांचा चोरटा निघाल्याची घटना सोलापुरात घडली. यात वेळापूर पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी बारा तासात या चोराला पकडण्यात यश आले आहे.

वेळापूर पोलीस स्टेशन येथे रामचंद्र हांबिराव साबळे (रा. लिंबोडी ता. इंदापूर जि. पुणे) हे राजेश तुकाराम फडे (रा. अकलूज) यांच्या हिंदुस्तान युनिलीवर लिमीटेड एजन्सी येथे सुमारे पंचवीस वर्षापासून सेल्समन म्हणून काम करत होते. ११ एप्रिल  रोजी नेहमीप्रमाणे त्यांनी माळेवाडी, खंडाळी गावातील किराणा दुकानदार यांच्याकडून मालाचे जमा झालेले एकूण १ लाख ८६ हजार  ४३६ रुपये रक्कम गोळा करून खंडाळी ते अकलूज असे मोटरसायकल वरून जात होते.

खंडाळी (ता. माळशिरस) येथील खडी क्रेशर समोर मोटारसायकलची  पुढील चाकाची हवा कमी झाल्यामुळे मोटरसायकल थांबवून हवा चेक करत असताना पाठीमागून स्प्लेंडर मोटरसायकल वरून अनोळखी तीन इसमांनी येऊन त्यापैकी  दोन इसमांनी एक इसमांनी धरून खाली पाडून दुसऱ्या अनोळखी इसमाने गळ्यातील पैसे असलेली खाकी रंगाची बॅग जबरदस्तीने हिसकावून चोरून नेली आहे, अशी हकिकत हकीगत रामचंद्र साबळे यांनी पोलिसात सांगितली.

The thief will file a complaint of forcible theft; Velapur police arrested the thief in twelve hours

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

यावरून वेळापूर पोलीस स्टेशनला ११ एप्रिल २०२२ रोजी गुन्हा रजिस्टर नंबर ११४/२०२२ कलम ३९२, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता.

मात्र फिर्यादी सांगत असलेली हकिकतमध्ये विसंगती आढळून आल्याने त्यांना विश्वासात घेऊन तपास केला असता जबरी चोरी घडलेली नसून त्याचा बनाव करून सदरचे पैसे रामचंद्र साबळे यांनी स्वतः लपवून ठेवलेले होते, असे सांगितल्यावर सदर आरोपीस अटक करून त्याच्याकडून चोरीस गेलेली रोख रक्कम १ लाख ८६ हजार ४३६ रुपये जप्त केली आहे.

या गुन्ह्याचा अधिक तपास सपोनि सुनील जाधव हे करीत आहेत. ही कारवाई अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी डाॅ. बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली वेळापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील जाधव, पोलीस नाईक यशवंत आनंदपुरे, अमोल वाघमोडे, संदीप पाटील यांनी केली.

□ अवैध धंद्यावर विशेष भरारी पथकाचा छापा ; दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

सोलापूर : पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांच्या विशेष पथकाने सोलापूर शहरामध्ये अवैधरित्या रिक्षामध्ये गॅस भरण्याचे ठिकाणी छापा टाकून २ आरोपी व अवैधरित्या गॅस भरण्याकरिता लागणारे साहित्य,१० गॅस टाक्या,०१ रिक्षा असे एकुण २ लाख ११ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मिळालेल्या  माहितीवरून विशेष भरारी पथकाने विजय लक्ष्मी नगर मजरेवाडी सोलापूर येथील एका घरामध्ये गेटबंद करून घरातील आतील बाजुस व्हरांड्यात चोरून घरगुती वापराच्या गॅस टाकीमधील गॅस इंधन म्हणून काळ्या बाजारात  धोकादायक पध्दतीने रिक्षामध्ये भरून विक्री करीत आहेत. त्यामुळे एखादी गंभीर स्वरूपाची दुर्घटना घडण्याची संभावना निर्माण झाली आहे, अशी गोपनिय माहिती प्राप्त झाली होती.
त्यानुषंगाने त्या ठिकाणी छापा टाकला असता सदर ठिकाणी घरगुती वापराच्या गॅस टाकी मधील गॅस इंधन म्हणून इलेक्ट्रीक मोटाराला नायलॉन पाईप जोडून एक पाईपला रेग्युलेटर लावून तेथे येणाऱ्या रिक्षामध्ये इंधन म्हणुन गॅस भरत असताना इसम नामे मुझफर ईलाही ईनामदार व ऑटो रिक्षाचा क्र.एम.एच.१३.सीटी.१७६३ याचे चालक नामे इरफान अ.रजाक बागवान हे त्यांच्या ताब्यातील रिक्षा व इतर साहित्य असे एकुण २,११, ०००/- रुपये किमतीच्या मुद्देमालासह मिळुन आले.
सदरचा व्यवसाय हा अवैध असल्याचे माहित असून देखील रिक्षाचालकाने त्यांच्या रिक्षामध्ये इंधन भरून व अवैध व्यवसाय सुलभ व्हावा याकरीता त्याला लागणारे गॅस सिलेंडरचा अवैधरीत्या पुरवठा करून तसेच घराचे मालक  शैनाजबी इलाही इनामदार यांनी स्वतःची घराची जागा उपलब्ध करून देवुन लोकाच्या जिवीतास धोका निर्माण करून हयगयीचे कृत्य केले आहे म्हणून दी लिक्वीफाईड पेट्रोलियम गॅस (रेग्युलेशन ऑफ सप्लाय अॅण्ड डिस्ट्रीब्युशन) ऑर्डर २००० व लिक्वीफाईड पेट्रोलियम गॅस (रेग्युलेशन ऑफ युज मोटार व्हेहिकल्स) ऑर्डर २००१ या कंट्रोल
३४ सह जिवानावश्यक वस्तू कायदा १९५५ चे कलम ३ व ७ प्रमाणे एम.आय.डी.सी.पोलीस ठाणे सोलापूर शहर येथे गुन्हा दाखल झाले.
या गुन्हयात १ ॲटो रिक्षा १ मोटार सायकल,१० घरगुती वापराचे गॅस सिलेंडर व इतर साहित्य असे एकुण २,११,००० /- रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आलेली आहे. ही कामगिरी पोलीस आयुक्त बैजल यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि जीवन निरगुडे, पोह दिलीप भालशंकर, पोना योगेश बर्डे, पोना वाजीद पटेल, पोकॉ संजय साळुंखे, चालक पोकों नरेंद्र नक्का यांनी केलेली आहे.

 

Tags: #thief #file #complaint #forcible #theft #Velapur #police #arrested #twelvehours#जबरी #चोरी #फिर्यादी #चोर #वेळापूर #पोलिस #बारातासात #चोरट्या #जेरबंद
Previous Post

किरीट सोमय्या यांना अखेर अटकपूर्व जामीन मंजूर

Next Post

वैराग : भूलतज्ञाऐवजी आरोग्य कर्मचार्‍यानेच दिली बेकायदेशीर भूल

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
वैराग : भूलतज्ञाऐवजी आरोग्य कर्मचार्‍यानेच दिली बेकायदेशीर भूल

वैराग : भूलतज्ञाऐवजी आरोग्य कर्मचार्‍यानेच दिली बेकायदेशीर भूल

वार्ता संग्रह

April 2022
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
252627282930  
« Mar   May »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697