सोलापूर : सोलापुरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज एका पेट्रोल पंपवर 1 रुपयात 1 लिटर पेट्रोल देण्यात आले. यासाठी पेट्रोल पंपावर वाहनांच्या रांगा लागल्या. मध्यवर्ती उत्सव व विश्वस्त समितीने यासाठी पुढाकार घेतला. त्यानुसार डफरीन चौक येथील पेट्रोल पंपावर नागरिकांना 1 रुपयात 1 लिटर पेट्रोल उपलब्ध करुन दिले. दरम्यान आजपासून 17 एप्रिलपर्यंत जयंती उत्सव सप्ताह त्यांनी जाहीर केला आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त सोलापुरात आज 1 रुपयात एक लिटर पेट्रोल दिलं जात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्सव समिती आणि विश्वस्त समितीचे पदाधिकारी तसंच कार्यकर्त्यांकडून बाबासाहेबांची पूर्णाकृती पुतळ्याची मध्यरात्री बारा वाजताच्या सुमारास पूजा व बुद्धवंदना केली.
सध्या पेट्रोलच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. सर्वसामान्य लोक महागाईला वैतागून गेले आहेत. दरांमध्ये जवळपास दररोज वाढ होत आहे. अशा परिस्थितीत मध्यवर्ती उत्सव आणि विश्वस्त समितीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सोलापुरात एक रुपयात एक लिटर पेट्रोल देण्याचा निर्णय घेतला असून डफरीन चौक येथील पेट्रोल पंपावर आजच्या दिवशी नागरिकांसाठी एक रुपयात एक लिटर पेट्रोल उपलब्ध करण्यात येणार आहे.
Bhim Jayanti unique event in Solapur – 1 liter petrol for Rs. 1, queues
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त देशभरात उत्साहाचं वातावरण आहे. विविध ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करुन भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्यात येत आहे. डॉ. बाबासाहेबांची 131 जयंती आज साजरी होत आहे. त्यासाठी, गल्लीपासून दिल्लीपर्यंत विविध उपक्रमांनी यंदा जयंतीउत्सव साजरा होत आहे.
सोलापुरातील डफरीन चौक येथील पेट्रोल पंपावर आजच्या दिवशी नागरिकांसाठी एक रुपयात एक लिटर पेट्रोल उपलब्ध केले आहे. सोलापुरातल्या डॉ. आंबेडकर स्टुडन्टस आणि युथ पँथर्स या संघटनेच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात आला. सोलापुरात आज पेट्रोलचा दर 120.18 रुपये आहे.
नागरिकांना दिलासा देण्यासाठी पाचशे नागरिकांना एक रुपयाप्रमाणे पेट्रोल देत बाबासाहेबांना अभिवादन करत असल्याची भूमिका संघटनेच्या वतीने मांडण्यात आली. अवघ्या एक रुपयात पेट्रोल मिळत असल्याने नागरिकांची तुंबड गर्दी पेट्रोल पंपावर झाली होती. भली मोठी रांग यावेळी पेट्रोल पंपाच्या समोर दिसून आली. मात्र यातील पाचशे नागरिकांना प्रति एक लिटर प्रमाणे पेट्रोल वाटप संघटनेच्यावतीने करण्यात आले.
“महागाई वाढलेली असताना आमच्या सारखी छोटी संघटना पाचशे लोकांना पेट्रोल वाटप करुन दिलासा देऊ शकते तर सरकारने देखील नागरिकांना दिलासा देण्याचा उद्देश या उपक्रमामागचा आहे.”
महेश सर्वगोड – अध्यक्ष, डॉ. आंबेडकर स्टुडन्ट्स आणि युथ पँथर्स संघटना