कोल्हापूर : करूणा शर्मा यांना नोटापेक्षाही कमी मते मिळाली आहेत. कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत करूणा शर्मा यांना नोटापेक्षाही कमी मते मिळाली आहेत. शर्मा यांना 133 मते मिळाली. तर नोटाला 1 हजार 788 मते मिळाली. त्यामुळे त्यांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. तर या निवडणूकीत काँग्रेसच्या उमेदवार जयश्री पाटील या 19 हजार मतांनी विजयी झाल्या आहेत.
कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या जयश्री जाधव यांनी भाजपच्या सत्यजित कदमांचा पराभव केला आहे. या निवडणुकीत आपल्या विजयाचा दावा करणाऱ्या करुणा शर्मा यांना अवघी 133 मतं मिळाली आहेत. कोल्हापूर उत्तरमधील पोटनिवडणुकीत करूणा शर्मा अपक्ष उमेदवार होत्या. या निवडणुकीत सर्वांचे लक्ष वेधून घेणाऱ्या अपक्ष उमेदवार करूणा धनंजय मुंडे यांना केवळ १३३ मते मिळाली आहेत. दरम्यान सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी कोणत्याही मतदारसंघात तुला ओळखणार नाही, अशी टीका करूणा मुंडे यांच्यावर केली होती.
या निवडणुकीत आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याचा आरोप करुणा शर्मा यांनी केला आहे, जर निवडणुक रद्द झाली नाही तर आपण न्याय मागण्यासाठी उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयात जाणार असंही त्या म्हणाल्या. निवडणूक आयोगाकडे तक्रार करताना आपण संबंधित वृत्तपत्रांची कात्रणं दिली आहे. निवडणूक आयोगाचे तसेच कायद्याचे उल्लंघन केले जात आहे. यावर गांभीर्याने विचार व्हावा अशी मागणी करुणा शर्मा यांनी केली आहे.
Kolhapur by-election: Karuna Sharma – Munde got only 133 votes
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
येत्या 2024 च्या विधानसभा निवडणुकीत बीडमध्ये धनंजय मुंडे विरुद्ध करुणा शर्मा अशी लढत शंभर टक्के होणार असल्याचं शिवशक्ती पक्षाच्या करुणा शर्मा यांनी या आधीच स्पष्ट केलं आहे. त्यामुळे बीडकरांना 2024 साली नवरा विरुद्ध बायको अशी लढत पहायला मिळणार आहे.
कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुक मतमोजणीत आत्तापर्यंत कॉंग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव या आघाडीवर आहेत. महाविकास आघाडीतील महत्वाचे नेते आणि मंत्री असणाऱ्या धनंजय मुंडे यांच्यावर केलेल्या आरोपानंतर चर्चेत आलेल्या करुणा शर्मा कोल्हापूरच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. निवडणूकी संदर्भात त्याच्याशी संवाद साधला असता, कॉंग्रेस, भाजपाकडून आचारसंहिता उल्लंघन केल्याचा आरोप, निवडणुक रद्द करण्याची मागणी करुणा मुंडे यांनी केली आहे.
निवडणूक निकालानंतर करुणा मुंडे यांनी निवडणुकीत आचारसंहितेचं उल्लंघन झाल्याचा आरोप केला. तसेच, ही निवडणूक रद्द करण्यात यावी, यासाठी आपण सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचंही करुणा यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. ”ही मतमोजणी रद्द करुन निवडणूकच रद्द करण्यात यायला हवी होती. पण, तरीही मतमोजणी सुरु आहे, याचा मी विरोध करते. याविरोधात मी सुप्रीम कोर्टापर्यंत धाव घेणार आहे, ही लोकशाही आहे, कायदा सर्वांसाठी समान आहे”, असे करुणा शर्मांनी म्हटले आहे.