नांदेड : येथील बळीरामपूरमध्ये भीम जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली होती. दोन वर्षापासून जयंती न झाल्याने सगळ्यांचा उत्साह शिगेला पोहचला होता. दरम्यान मिरवणुकीत नाचण्याच्या कारणावरून एकाचा चाकू भोसकून खूण करण्यात आला. ग्रामीण पोलिसांनी या गुन्ह्यातील आरोपींना केवळ तीन तासांत अटक केली. सचिन थोरात असं मृत व्यक्तीचं नाव असून किशोर ठाकूर, आदिल शेख असे आरोपींची नावे आहेत.
या प्रकरणातील मृत युवकाचे नाव सचिन थोरात असं आहे. तर यामध्ये आणखी एकजण गंभीर जखमी झाला आहे. दोन मारेकऱ्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. शहरात भीम जयंती मिरवणूक परत निघाली असताना या मिरवणुकीत एकाचा भोसकून निर्घृण खून झाला आहे.
मिरवणुकीत डीजेच्या तालावर नाचण्याच्या कारणावरून हा प्रकार घडला. या घटनेत अन्य एक जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कोरोनाच्या निर्बंधांनंतर दोन वर्षांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जल्लोषात साजरी होत आहे. काल मध्यरात्री सिडको येथील नाईक महाविद्यालयासमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीत नाचण्याच्या कारणावरून हा प्रकार घडला अशी माहिती पोलिसांनी दिली.
Shocking, murder due to dancing on Bhim Jayanti
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
बळीरामपूर भागातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणूक रात्री उशिराच्या सुमारास नाईक कॉलेजसमोर पोहचली. त्या दरम्यान बळीरामपूर येथील किशोर ठाकूर आणि शेख आदिल असे दोघे मिरवणुकीत इतरांना अडथळे आणत नाचायला लागले. तेव्हा सचिन उर्फ बंटी थोरातने त्या दोघांना मिरवणुकीतून बाहेर जाण्यास सांगितले. त्यामुळे चिडलेल्या किशोर ठाकूरने आपल्या कमरेला असलेला चाकू काढून सचिन थोरातच्या शरिरावर अनेक ठिकाणी सपासप वार केले आणि त्याला भोसकले. तसेच सुमेध उर्फ बाळा राजू वाघमारे यासही चाकू मारून जखमी केलं.
या चाकू हल्ल्यात सचिन थोरात याचा मृत्यू झाला असून सुमेध वाघमारे गंभीर जखमी झाला आहे. या घटनेनंतर हल्लेखोर किशोर ठाकूर आणि शेख आदिल हे दोघे दुचाकीवरून पसार झाले होते. या घटनेची माहिती मिळताच नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्यासह इतर पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना रुग्णालयात दाखल केलं आहे.
जखमी सुमेध उर्फ बाळा राजू वाघमारे याच्यावर शासकीय रुग्णालय विष्णूपुरी येथे उपचार सुरू असून रात्री साडेबाराच्या सुमारास जखमीच्या जबाबावरून नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात किशोर ठाकूर आणि शेख आदिलविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 302, 307, 34 आणि अॅट्रॉसिटी कायदा कलम 3 (2) (व्हीए) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करून कोर्टात हजर केले असता कोर्टाने दोन्ही आरोपींना चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.