सोलापूर : उजनी धरणातून आज शनिवारपासून सोलापूर शहरासाठी भीमा नदीत सहा हजार क्युसेकने पाणी सोडण्यात येणार असून २५ एप्रिलपर्यंत हे पाणी नदीतून सुरू राहील, अशी माहिती जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे यांनी दिली आहे.
शुक्रवारी, उजनी धरणात ५३ टक्के पाणी साठा होता. सध्याच्या उन्हाळ्यात पिण्यासाठी, शेती व इतर सर्व उद्योगासाठी पाणी कमी पडणार नाही, असे नियोजन जलसंपदा विभागाने केले आहे.
सोलापूर शहराला टाकळी बंधाऱ्यातून पाणीपुरवठा करण्यासाठी सध्या नवीन दोन मोठे पंप बसवण्यात आले आहेत. त्यामुळे टाकळी बंधाऱ्यातील पाणी २६ किंवा २७ एप्रिलपर्यंत पुरेल अशी वस्तुस्थिती आहे. महानगरपालिकेच्या आयुक्तांनी २५ एप्रिलपर्यंत टाकळी बंधाऱ्यात पाणी आले पाहिजे असे पत्राद्वारे जलसंपदा विभागाला कळवले आहे. या नियोजनानुसार उद्या सकाळी धरणातून व वीजनिर्मिती केंद्रामधून १६०० क्युसेक पाणी सोडण्यात येणार असून हे पाणी पुढे नदी प्रवाहात येते.
Water will be released from Ujjain for Solapur from today; Drinking water will be provided
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
त्यानंतर १७ एप्रिलच्या सकाळपर्यंत धरणाच्या चार दरवाज्यातून ४४०० क्युसेक पाणी भीमा नदीत सोडण्यात येणार आहे. एकूण ६ हजार क्युसेक पाणी आठ ते नऊ दिवस नदी प्रवाहात राहणार आहे. हे प्रवाही पाणी २३ किंवा शेतीस २४ एप्रिलपर्यंत टाकळी बंधाऱ्यात पोहोचेल व २५ एप्रिलपर्यंत टाकळी व चिंचपूर बंधारे पूर्ण क्षमतेने भरतील व पुरेसा पाणीसाठा होईल.
दरम्यान, या पाण्यामुळे पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला आदी शहरांना व भीमा नदीकाठावरील अनेक गावे व वाड्या-वस्त्यांवरील नागरिक व पशुधनाला पिण्याच्या पाण्याची सोय होणार आहे. याचप्रमाणे भीमा नदीवर असलेले को.प.चे १७ बंधारे या पाण्यामुळे भरणार आहेत.
सध्या उजनी धरणातून कालवा, बोगदा, सीना-माढा व दहिगाव उपसा सिंचन योजनेतून मोठ्या प्रमाणावर पाणीपुरवठा करण्यात येत आहे. धरणात सध्या एकूण पाणीसाठा ९२ टीएमसी असून उपयुक्त पाणीसाठा २८ टीएमसी आहे.