सोलापूर : श्री विठ्ठलाचे दर्शन घेऊन घरी परत जाणाऱ्या भाविकांवर काळाने घाला घातल्याची घटना घडली आहे. भरधाव एसटी बस आणि आणि कारची समोरासमोर धडक झाल्यामुळे भीषण अपघातात अपघातात दोन भाविक ठार झाले आहे.
पंढरपूर तालुक्यातील भैरवनाथ वाडीजवळ नाईक नवरेमळा येथे आज रविवारी (दि.१७) सकाळी साडेअकरा वाजता ही दुर्घटना घडली. यात दोन ठार तर 4 जण जखमी झाले आहे. जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे. पंढरपूर सोलापूर रोडवर देगाव परिसरात हा अपघात झाल. सोलापूर येथील एक कुटुंब आणि इतर सदस्य पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनाला मारूती सुझुकी इर्टिगा (एमएच ११ बीव्ही १९४२) गाडीने आले होते.
विठ्ठलाचे दर्शन घेऊन सर्व जण सोलापूरकडे निघाले होते. देगाव परिसरात गाडी पोहोचली असता समोरून येणाऱ्या एसटी बसने कारला जोरात धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, कारच्या समोरील भागाचा चक्काचूर झाला. या अपघात दोन जण ठार झाले आहे तर चार जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी अशोक जाधव, नितीन चवरे, सुजित उबाळे घटनास्थळी धाव घेतली. हा अपघात झाल्याचे समजताच परिसरातील नागरिक मदतीसाठी घटनास्थळी धावले. यामध्ये चार चाकीमधील दोघांचा जागेवरच मृत्यू झाला. दत्तात्रय रामराव भोसले असे मयताचे नाव आहे. तर शिवराज प्रल्हाद भोसले, व्यंकट मारुती भोसले, शरद वसंत भोसले, सुनील किसन भोसले, सचिन किसन कदम, शंकर माधव मोटे अशी जखमींची नाव आहे. सर्व जखमींना पंढरपूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
● लातूर : पतीनेच पत्नीवर करायला लावला सामूहिक बलात्कार
लातूर : पती आणि पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना लातूरमध्ये घडली आहे. शेतमालक आणि त्याच्या भावाने शेतातील महिलेवर सामूहिक बलात्कार केला. यात खुद्द नवऱ्याची साथ मिळाली असल्याचा धक्कादायक प्रकार लातूरच्या औसा येथे घडला. पतीसह इल्लु शेख आणि मुसा शेख यांच्यावर औसा पोलिसांत बलात्कार आणि ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेतातील महिलेवर सामूहिक बलात्कार केला असून यात खुद्द नवऱ्याची साथ मिळाली असल्याचा धक्कादायक प्रकार लातूर जिल्ह्यातील औसा इथं समोर आला आहे. दुर्दैवाची बाब अत्याचारानंतर पीडितेचा तब्बल 10 ते 15 किलोमिटर चालत मध्यरात्री लातुरच्या दोन पोलीस ठाण्यात तक्रार करून देखील मदत मिळाली नाही. अखेर पोलीस अधीक्षक यांच्यापर्यंत विषय गेल्यानंतर त्यांच्या सूचनेनुसार गुन्हा दाखल झाला.
Two killed, four injured in ST-car accident in Pandharpur
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
दुर्दैवाची बाब अत्याचारानंतर पीडितेचा तब्बल 10 ते 15 किलोमिटर चालत मध्यरात्री लातुरच्या दोन पोलीस ठाण्यात तक्रार करून देखील मदत मिळाली नाही. अखेर पोलीस अधिक्षकांच्या सुचनेनंतर पतीसह तिघांविरुद्ध औसा पोलिसांत बलात्कार आणि ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील रहिवासी असलेली एक 32 वर्षीय महिला पतीसह औसा तालुक्यातील सारोळा रोडवर असलेल्या एका पानमळ्यात सालगडी म्हणून वास्तव्यास होते. काही दिवसांपूर्वी या पती-पत्नीमध्ये वाद झाल्यामुळे ही महिला लातुरातील आपल्या आईकडे वास्तव्यास होती.
वाद निवळल्यानंतर पीडित महिलेच्या आईने 9 एप्रिल रोजी या महिलेस पतीकडे नेऊन सोडले. रात्री 9 वाजेच्या सुमारास पीडित महिलेच्या पतीने पानमळ्याचे मालक असलेले इल्लु शेख आणि मुसा शेख या दोघांना घरी आणले आणि त्यांना स्वतःच्या पत्नीवर अत्याचार करण्यास सांगितले. त्यानुसार पतीसमोरच या महिलेवर दोघांनी अत्याचार केला.
घटनेनंतर पीडित महिला घटनास्थळावरुन मध्यरात्री बाभळगाव नाक्यावर असलेल्या ग्रामीण पोलीस ठाण्यात विवेकानंद चौक पोलीस ठाणे गाठले. परंतू, त्यांनी पोलीस अधिक्षकांकडे जाण्याचा सल्ला दिला. त्यामुळे सदर महिला आईला सोबत घेवून पोलीस अधीक्षकांची भेट घेतली.
स्वतःवरील अत्याचाराची कर्मकहाणी ऐकवल्यानंतर त्यांनी औसा पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानंतर आरोपी पतीसह अन्य दोघांविरुद्ध औसा पोलिसांत भादंवि तसंच अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे.