मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे मंत्री नवाब मलिक यांना पुन्हा कोर्टाने दणका दिला आहे. मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत 22 एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टात मलिक यांना आज हजर करण्यात आले होते. दरम्यान मनी लाँड्रिंग प्रकरणात मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर सध्या ते आर्थर रोड तुरुंगात आहेत.
मंत्री नवाब मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत आणखी चार दिवसांनी वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी दिलेली त्यांची कोठडी आज संपत असल्यानं त्यांना मुंबईतील विशेष पीएमएलए कोर्टात हजर करण्यात आलं होतं. यावेळी कोर्टानं त्यांना २२ एप्रिलपर्यंत आणखी चार दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. मनी लॉंड्रिग प्रकरणात मलिक यांना ईडीनं अटक केली होती. सध्या ते ऑर्थर रोड तुरुंगात आहेत.
न्यायालयीन कोठडी संपत असल्यानं नवाब मलिक यांना आज पुन्हा एकदा मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टात हजर करण्यात आलं होतं. दरम्यान, नवाब मलिक यांनी आपल्या तातडीच्या सुटकेसाठी आणि ईडीच्या कारवाईविरोधात सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं आहे. आपली अटक ही बेकयदा असल्याचा दावा त्यांनी या याचिकेतून केला आहे. या याचिकेवर लवकरच सुनावणी होणार आहे. दाऊद इब्राहिम मनी लाँडरिंग प्रकरणी ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
Shock to Nawab Malik, increase in cell
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
त्यामुळं १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी वाढवून न देता त्यांना फक्त ४ दिवसांची कोठडी वाढवून देण्यात आली आहे. त्यामुळं २२ एप्रिलपर्यंत त्यांच्या कोठडीत वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, जर तत्पूर्वी जर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली आणि काही निकाल आला तर मात्र हे चित्र बदलेलं अन्यथा पुन्हा २२ तारखेनंतर मलिकांना कोर्टासमोर हजर करावं लागेल.
मलिक यांना २२ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडीत राहावे लागणार आहे. मलिक यांच्यावतीने काँग्रेसचे नेते, माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी न्यायालयात बाजू मांडली. गॅंगस्टार दाऊद इब्राहिमची बहिण हसीना पारकर हिला मालमत्तेसाठी मलिक यांनी पैसे दिले होते. पारकरने ते दाऊद इब्राहिमला दिले. यामुळे टेरर फंडिंग झाल्याचा दावा करत ईडीने मलिक यांना ताब्यात घेतले.
उच्च रक्तदाब व मधुमेह असल्याने कमी मीठ असलेले घरचे जेवण मिळावे, अशा विनंतीचाही अर्ज करण्यात आला होता. त्यावर मलिक यांचा वैद्यकीय अहवाल पाहून त्यांना औषधं आणि घरगुती जेवण घेण्यास परवानगी देण्यात आली आहे. दुसरीकडे सक्तवसुली संचालनालयाने (ईडीने) पुन्हा एकदा दणका देत, मलिक यांच्या 8 मालमत्तांवर टाच आणली आहे. त्यात कुर्ला, वांद्रेतील मालमत्तांसह उस्मानाबादच्या 148 एकर जमिनीचा समावेश आहे. मनी लॉण्ड्रिंग प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. मलिक सध्या आर्थर रोड कारागृहात आहेत.