सोलापूर / मोहोळ : मालट्रकला रुग्णवाहिकेने पाठीमागून धडक देऊन झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला, तर अन्य पाच जण गंभीर जखमी झाले. सर्व जखमींना सोलापूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. यात डॉक्टरही जखमी झाला आहे.
मालट्रकला रुग्णवाहिकेने पाठीमागून धडक देऊन झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला, तर अन्य पाच जण गंभीर जखमी झाले. हा अपघात सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील वडाचीवाडी ( ता. मोहोळ ) शिवारात सकाळी पावणे सात वाजता झाला.
सुहास मुकुंद हौसलमल (रा. वाशी) असे मृताचे नाव आहे. तर डॉ. शैलेश आर. चौधरी (वय-37, रा. बेलापूर), दत्ता अर्जुन खरटमल (वय-38, रा. हैदराबाद), ज्योती दत्ता खरटमल (वय-35, रा. हैदराबाद), विशाल सरदार (वय-27, रा. वाशी), जय आप्पा एकनाथ कावळे (वय-68, रा. कल्याण ) अशी अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत.
मोहोळ पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार, मालट्रक (क्र. केए 41 ए 4293) ही सोलापूरच्या दिशेने निघाली होती, तर रुग्णवाहिका (क्र. एम एच 4 जे यु 4742) ही सोलापूरच्या दिशेने निघाली होती. दोन्ही वाहने वडाचीवाडी शिवारात येताच रुग्णवाहिकेने पुढच्या मालट्रकला पाठीमागून जोराची धडक दिली, त्यात एक जण मयत तर अन्य पाच जण जखमी झाले. या अपघाताची मोहोळ पोलिसात नोंद झाली आहे. अधिक तपास सहाय्यक फौजदार अविनाश शिंदे करीत आहेत.
Mohol: One killed, five injured in ambulance collision
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
□ गावकऱ्यास जबरी मारहाण केल्याप्रकरणी सरपंचाचा अटकपूर्व जामीन फेटाळला
सोलापूर :– होटगी येथील रहिवासी दिपक पांडूरंग रजपूत (रा. होटगी, ता.द. सोलापूर) यांच्यावर हल्ल्ला करुन त्यांचे कुटुंबीयांना जबरी मारहाण केल्याप्रकरणीच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी व होटगी गावचे सरपंच हरीशचंद्र कन्नु राठोड (रा. होटगी, ता. द. सोलापूर, जि. सोलापूर) यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायालयाने नामंजूर केला.
याची थोडक्यात हकीकत अशी की, फिर्यादी दिपक रजपूत हा होटगीचा रहिवासी व संगमेश्वर कॉलेज येथील हा विद्यार्थी असून त्याने त्याचा मित्राकडून ३०० रुपये उसने घेतले होते. परंतू उसने घेतलेले रक्कम रुपये देण्यास उशीर झाला होता, त्यामुळे सदरची घटना सदर मित्राने सरपंच हरीशचंद्र राठोड यांना सांगितली. त्यावेळी आरोपी याने फिर्यादी यास रात्री ८.३० वा. ग्रामपंचायत ऑफिस येथे बोलावून घेतले व फिर्यादीस शिवीगाळ करुन हाताने, लाथा-बुक्याने व काठीने जबरी मारहाण सुरु केली व तोंडावर दगड मारुन जखमी केले.
त्यावेळेस फिर्यादीचे कुटुंबिय त्या ठिकाणी आले असता त्यांना देखील मुख्य आरोपीने इतर आरोपीच्या सहाय्याने फिर्यादीच्या कुटुंबियांना देखील मारहाण केली व कुटुंबियांच्या अंगावरील सोन्याचे दागिने जबरदस्तीने काढुन घेतले व फिर्यादीचा मोबाईल काढून घेतला. त्या प्रकरणी आरोपींवर वळसंग पोलीस स्टेशन येथे भा.द.वि. कलमा अंतर्गत गुन्हा दाखल झाला.
सदर गुन्ह्यात अटकेच्या भीतीपोटी यातील मुख्य आरोपी हरिशचंद्र राठोड यांनी न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता. त्यास फिर्यादीतर्फे हरकत घेण्यात आली. सदर प्रकरणी सरकारी वकिल यांनी असा युक्तीवाद केला की, सदरचा गुन्हा हा गंभीर स्वरुपाचा असुन, आरोपी हे गुंड प्रवृत्तीचे आहेत, तो स्वत: पक्षाचा राजकीय पुढारी असून गावचा सरपंच आहे, ते साक्षीदारांवर दबाव आणु शकतात.
तसेच मूळ फिर्यादीचे वकिल ॲड. शशि कुलकर्णी यांनी मुळ फिर्यादीचे प्रतिज्ञापत्र दाखल करुन जामीन अर्जास तीव्र विरोध दर्शविला व युक्तीवाद केला की, आरोपी हे गुंड प्रवृत्तीचे आहेत, त्यांना जामीनावर सोडल्यास ते फिर्यादीच्या गावातच रहाणेस असल्यामुळे त्यांच्यापासुन फिर्यादीचे कुटुंबाला व फिर्यादीचे जिवीतास धोका आहे. यात सरकारी वकिलांचा व मुळ फिर्यादी यांच्या वकिलांचा युक्तीवाद ग्राह्य धरुन में. अति सत्र न्यायाधिश श्री. व्ही. एच. पाटवदकर सो यांनी आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज नामंजुर केला.
सदर प्रकरणात सरकारतर्फे ॲड. दत्तुसिंग पवार, मुळ फिर्यादीतर्फे ॲड. शशि कुलकर्णी, ॲड. देवदत्त बोरगांवकर, ॲड. गुरुदत्त बोरगांवकर, ॲड. आशुतोष पुरवंत व आरोपीतर्फे ॲड. सचिन कोळी यांनी काम पाहिले.