सोलापूर : सोलापूर येथील आंबेडकर जयंतीतील कार्यक्रमातील डी. जे. वाजवून परतत असताना भरधाव वेगातील डी.जे. चा टेम्पो पलटी होऊन झालेल्या अपघातात चौघे जण जखमी, तर एकाचा जागीच मृत्यू झाला आहे.
सोलापूर येथील आंबेडकर जयंतीतील कार्यक्रमातील डी.जे. वाजवून परतत असताना भरधाव वेगातील डी. जे. चा टेम्पो पलटी होऊन झालेल्या अपघातात चौघे जण जखमी, तर एकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी पहाटे 3.30 वाजता मंगळवेढा तालुक्यातील चाळीसधोंडा येथे घडली.
यश ऊर्फ राहुल गुंड्या माने (रा. धनवड, ता. खानापूर, जि. सांगली) असे मृताचे नाव आहे. या घटनेची खबर राहुल कुंडलिक माने (वय 40, रा. धानवड, जिल्हा खानापूर) यांनी दिले असून त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, त्याच्या टेम्पोला सोलापूर येथील आंबेडकर जयंती कार्यक्रमासाठी मिरवणुकीसाठी डी.जे. ला सुपारी 17 एप्रिल साठी मिळाली होती.
The DJ’s tempo reversed as he passed through the procession, killing one and injuring four
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
सदर मिरवणुकीतील कार्यक्रम संपल्यानंतर (आंधळी, ता. पलूस, जि.सांगली) येथे जाण्याकरता टेम्पो क्रमांक एम एच 14 व्ही 451 मधून रत्नागिरी-नागपूर या महामार्गावरून जात असताना मंगळवेढा ते सांगोला रोडवर चाळीस धोंडा येथे भरधाव वेगाने जाणा-या टेम्पोने कडेला असणाऱ्या फुलांच्या कठड्याला धडकून पलटी झाला.
झोपेत असलेले अभिजित बाळासाहेब शिंदे, विशाल उत्तम चव्हाण, संदीप लक्ष्मण माने, मनोज जनार्दन पवार, यश उर्फ गुंड्या राहुल माने हे टेंपोतून फेकले गेले त्यामधील यश माने याच्या अंगावर टेम्पोचे हौदे पडल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.
बाकी जखमींना उपचारासाठी मंगळवेढ्यातील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातामध्ये 50 हजार रुपये टेम्पोचे नुकसान झाले असून भरधाव वेगाने वाहन चालवून चौघाला जखमी व एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी चालक अनिकेत शिंदे यांच्याविरोधात फिर्याद देण्यात आली.
महामार्गावरील एखाद्या अपघातामध्ये मृत्यू झाल्यानंतर मृतावर शवविच्छेदन करण्यासाठी आंधळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये शवविच्छेदन कक्ष नसल्यामुळे शवविच्छेदनासाठी गैरसोय होत असल्याची तक्रार नातेवाईकानी केली.
अपघातातील मृत झालेल्या यशला शवविच्छेदन करण्यासाठी मंगळवेढा येथे ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यास विलंब झाल्यामुळे मृताच्या नातेवाईकांना भर उन्हात दिवसभर मंगळवेढ्यातील निष्क्रिय आरोग्यसेवेचा मनस्ताप सहन करावा लागला. ही तक्रार पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे गेली. यावर प्रशासनाला तत्काळ संबंधित डॉक्टरांवर कारवाई करण्यासाठी सांगितल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.