सोलापूर : तडीपार गुंड सचिन ऊर्फ बॉबी शिंदे याच्यासह त्याच्या नातेवाईकांनी रविवारी (दि. १७) पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचार्यांवर हल्ला करून जखमी केले हाेते. या हल्ल्यात पोलीस नाईक रविराज काळे जखमी झाले आहेत. याप्रकरणी फौजदार चावडी पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे.
सचिन ऊर्फ बॉबी शिंदे, किर्ती शिंदे, सुलोचना शिंदे, दीक्षा वाघमारे, गुड्डी शिंदे आणि अन्य दोन अनोळखी अशा एकूण पाच जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
सचिन उर्फ बॉबी संभाजी शिंदे वय 38 (रा. आवसे वस्ती आमराई ) असे तडीपार आरोपीचे नाव आहे. त्यास सोलापूर शहर व जिल्हातून 2 वर्षाकरीता तडीपार केलेले असताना जयंती मिरवणुकीत सहभागी झाल्याचे पोलिसांना निदर्शनास आले दरम्यान नार्थकोट प्रशाला या ठिकाणी तडीपार बॉबी मिळून आला.
त्यास कारवाईकरीता पोलीस स्टेशनला घेऊन जात असताना बॉबीला कारवाईला घेऊन जावू नका असे हुज्जत घालून फिर्यादीस व फिर्यादीबरोबर असलेले पो.को पाटील यांना सर्वांनी झटापटी करून फिर्यादीच्या शर्टाची गच्ची धरून ओढा ओढी करुन फिर्यादीच्या डाव्या पोटरीळा चावा घेऊन शिवीगाळ करून आम्हाला सोड नाहीतर बघ असे म्हणून शिवीगाळ व दमदाटी करून फिर्यादीच्या शासकीय कामात अडथळा आणुन फिर्यादी व फिर्यादीबरोबरचे कर्मचारी या हल्ला केला आहे. पोलिसांनी कशा पद्धतीने त्याला ताब्यात घेतले त्यानंतर कसा गोंधळ उडाला फौजदार चावडी पोलिस ठाण्यात येऊन गेल्यानंतर संबंधित आरोपीला नातेवाईकांनी गोंधळ घातला.
Tadipar Bobby arrested during procession, five charged
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
रविवारी तडीपार गुंड सचिन उर्फ बॉबी शिंदे हा विनापरवानगी सोलापुरामध्ये येऊन रात्री साडेनऊच्या सुमारास फिरताना दिसून आला. त्याला पोलीस नाईक काळे आणि पोलीस शिपाई पाटील या दोघांनी ताब्यात घेऊन फौजदार चावडी पोलीस ठाण्याकडे नेले. याचदरम्यान सचिन शिंदे, त्याची पत्नी किर्ती शिंदे, सुलोचना दत्तात्रय शिंदे, दीक्षा वाघमारे, गुड्डी शिंदे यांच्यासह इतर दोन अनोळखी पुरुषांनी पोलिसांना विरोध करीत त्यांच्यावर हल्ला केला. या सर्वांनी पोलीस कर्मचार्यांची कॉलर पकडून त्यांना शिवीगाळ करून दमदाटी करीत त्यांच्याशी झटापट केली. यावेळी नातेवाईकांनी काळे यांच्या डाव्या हाताच्या पोटरीवर चावा घेऊन त्यांना जखमी केले.
पोलिसांनी तडीपार बॉबी शिंदे याला फौजदार चावडी पोलीस ठाण्यात आणले. त्यानंतर पोलीस ठाण्यात मोठा जमाव जमा होऊन गोंधळ घातला. यामुळे मिरवणुकीतील गाड्यांना पुढे जाण्यास व्यत्यय आला. त्यामुळे मिरवणुकीस उशीर झाला. पोलिसांनी प्रसंगावधानाने आरोपीस ताब्यात घेतले. मिरवणुकीत गर्दीमुळे अनुचित प्रकार घडला असता पण पोलिसांनी सावधगिरी बाळगली.
याबाबत फौजदार चावडी पोलीस ठाण्यात काळे यांच्या फिर्यादीवरुन सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस ठाण्याच्या आवारात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्यातून झालेले चित्रीकरण पाहून संशयितांना ताब्यात घेण्याचे काम सुरू आहे.