अमरावती : आंध्र प्रदेशातील कडापा येथील मेकावरिपल्ली भागात धक्कादायक घटना घडली आहे. लॅपटॉपचा स्फोट झाल्यानं महिला सॉफ्टवेअर इंजिनियरच्या खोलीला आग लागली. यामध्ये इंजिनीयर 80 टक्के भाजली. सध्या तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुमलता असं या तरूणीचं नाव असून ती बंगळुरू येथील मॅजिक सोल्यूशनमध्ये कार्यरत होती. लॅपटॉप मांडीवर ठेऊन ती काम करत होती. तितक्यात लॅपटॉपचा स्फोट झाला.
आंध्र प्रदेशातील कडापा येथील मेकावरिपल्ली भागात लॅपटॉपचा स्फोट झाल्यानं महिला सॉफ्टवेअर इंजिनीयरच्या खोलीला आग लागली धक्कादायक घटना घडली आहे. यात ती महिला इंजिनीयर ८० टक्के भाजली. सध्या तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ती मृत्यूशी झुंज देत आहे. ती बेडवर बेशुद्ध पडली होती आणि आगीत पोळली होती. त्यानंतर आम्ही घरातील लाइट बंद केली. सुमलताला सुरुवातीला स्थानिक रुग्णालयात नेण्यात आलं. तिथून तिला मोठ्या हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलं. तिथं तिला बर्न युनिटमध्ये भरती करण्यात आलं आहे. ती शुद्धीवर आली आहे.
बंगळुरूच्या मॅजिक सोल्युशनमध्या कार्यरत असलेली २३ वर्षीय सुमलता अनेक महिन्यांपासून घरातूनच काम करत आहे. सोमवारी सकाळी ८ वाजता सुमलतानं नेहमीप्रमाणे काम सुरू केलं. लॅपटॉप मांडीवर ठेऊन ती काम करत होती. तितक्यात लॅपटॉपचा स्फोट झाला. तिच्या खोलीतून धूर बाहेर पडत असल्याचं पाहून आई वडिलांनी मदतीसाठी धाव घेतली. तेव्हा सुमलता त्यांना बिछान्यावर बेशुद्धावस्थेत पडलेली दिसली. ती गंभीररित्या भाजली होती. आई वडिलांनी तातडीनं घरातील वीज पुरवठा बंद केला.
Laptop explodes while working, female software engineer burnt
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
सुमलताला आधी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथून तिला तिरुपतीमधील मोठ्या रुग्णालयात नेण्यात आलं. सध्या तिच्यावर बर्न युनिटमध्ये उपचार सुरू आहेत. ती शुद्धीवर आली आहे. मात्र तिची स्थिती नाजूक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.
शॉर्ट सर्किटमुळे लॅपटॉपचा स्फोट झाला असावा असा संशय पोलिसांना आहे. लॅपटॉपची बॅटरी जास्त तापल्यानं स्फोट झाल्याचा अंदाज सुमलताच्या आई वडिलांनी व्यक्त केला. सध्या पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. विजेच्या शॉर्टसर्किटमुळे स्फोट झाला असावा असा संशय पोलिसांना आहे.
□ घ्या अशी काळजी
लॅपटॉपच्या चार्जिंग पोर्टचा प्रॉब्लेम असल्यास किंवा शॉटर सर्किटमुळे लॅपटॉपचा स्फोटो होतो. तसेच लॅपटचा अतिवापर केल्यास लॅपटॉप ओवरहीट होतो. लॅपटॉप ओवरहीट होऊ नये म्हणून त्यात पंखे लावले जातात. अनेकवेळेला या पंख्यातील वेंट बंद होतात आणि व्हेंटिलशन होत नाही आणि लॅपटॉप ओवरहीट होतो. अशा वेळी लॅपटॉप वापराताना त्याखाली पॅड ठेवणे गरजेचे आहे. लॅपटॉप ओवरहीट होऊ नये म्हणून काही वेळ लॅपटॉप बंद करावा. तसेच लॅपटॉप ओवरहीट होऊ नये यासाठी फॅन असलेले टेबल्सही बाजारात उपलब्ध आहेत.