अक्कलकोट : येथील एस. टी. सस्थानकासमोरील अयोध्या लॉजमध्ये निगडी (पुणे) येथे राहणाऱ्या २७ वर्षीय युवकाने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविल्याची घटना कार सोमवारी (ता. 18) दुपारी उघडकीस आली.
नीलेश संजय अंकुशराव असे गळफासाने आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. नीलेश हा रविवारी सकाळी पावणेनऊ वाजता अयोध्या लॉजमध्ये राहण्यासाठी उतरला होता. दिवसभर लॉजमध्ये व बाहेर बसस्थानक परिसरात ये- जा करीत होता.
रात्री नऊ वाजता लॉजमध्ये झोपण्यासाठी गेला. सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास दरवाजा तोडून आत जाऊन पाहिले असता नीलेश याने बेडशिटने छताच्या पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसले. त्यास व्यवस्थापकाने ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले.
अशी फिर्याद लॉजचे व्यवस्थापक कमलेशकुमार (राजस्थान) यांनी उत्तर पोलिसात दिली आहे. आत्महत्याचे नेमके कारण समजू शकले नाही. अधिक तपास पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी हे करीत आहेत.
Pune youth commits suicide by hanging himself in a lodge in Solapur
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
□ मोबाईलवर अश्लील चॅटींग करुन विनयभंग केल्याप्रकरणी युवकाला बार्शीत पकडले
बार्शी : फिर्यादीचा मोबाईल क्रमांक मिळवून त्यावर संपर्क साधून अश्लिल चॅटींग करुन महिना 50 हजार रुपये कमविण्याचे आमिष दाखवून विनयभंग केल्याप्रकरणी टेंभुर्णी येथील अजित वजाळे यास शहर पोलिसांनी बस स्थानकावर पकडले.
फिर्यादी महिलेची कसलीही ओळख नसताना व्हाटसऍपवर त्यांना लवकरच तुमचा भाग्योदय होईल, असा संदेश पाठविला. त्यावर त्यांनी त्याची विचारपूस केली असता तो आपल्या ओळखीचा नसल्याचे त्यांना जाणवले. तो सतत व्हॉटस अप वर मेसेज पाठवून फोटोची मागणी करत होता. त्यामुळे त्यांनी त्याचा नंबर ब्लॉक केला आणि मैत्रिणीच्या नंबरवरुन संपर्क साधून त्याची माहिती विचारली.
त्यावर त्याने महिन्याला 50 हजार रुपये कमवा असे आमिष दाखवून त्यांना कुर्डवाडी किंवा टेंभुर्णी येथे भेटण्यास सांगितले. त्यांनी त्यास नकार देवून बार्शीस बोलाविले आणि पती आणि पोलिसांना सांगून तो भेटण्यास आल्यानंतर त्यास पकडून पोलिसांच्या हवाली केले. याबाबत पुढील तपास पोउपनि. सारिका गटकुळ करीत आहेत.