पाटणा : बिहारमध्ये येत्या शनिवारी (ता. 23 एप्रिल) एकाच वेळी 75 हजार राष्ट्रध्वज फडकवले जाणार आहेत. त्यामुळे पाकिस्तानचा 57 हजार 500 राष्ट्रध्वज फडकावण्याचा विश्वविक्रम मोडीत निघणार आहे. कुंवरसिंह विजयोत्सवात हा विश्व विक्रम केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थित नोंदवणार आहेत. दरम्यान, इंग्रजांवर मिळवलेल्या विजयाच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी जगदीशपूर इथे हा विजयोत्सव साजरा केला जातो.
सन १८५७ च्या स्वातंत्र्य संग्रामादरम्यान बिहारचे तत्कालीन जमीनदार बाबू वीर कुंवर सिंह यांनी इंग्रजांना सळो की पळो करुन सोडलं होतं. त्यांनी काही दिवस आपलं संस्थानही इंग्रजांपासून स्वतंत्र करण्यातही यश मिळवलं होतं. इंग्रजांसोबत लढताना जखमी झाल्यानंतर काही वेळानंतर त्यांना वीरगती प्राप्त झाली होती. त्यामुळं इंग्रजांवर मिळवलेल्या विजयाच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी जगदीशपूर इथं हा विजयोत्सव साजरा केला जातो.
अमित शहा यांच्या उपस्थित होणाऱ्या या कार्यक्रमात एकाच वेळी ७५ हजार राष्ट्रध्वज फडकावण्यात येणार आहेत. याद्वारे नवा विश्वविक्रम नोंदवण्यात येणार आहे. यापूर्वी एकाच वेळी ५७,५०० राष्ट्रध्वज फडकवण्याचा विश्वविक्रम पाकिस्तानच्या नावावर आहे. बिहारमधील कुंवरसिंह विजयोत्सवात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत एकाच वेळी ७५ हजार राष्ट्रध्वज फडकवले जाणार आहेत. याद्वारे पाकिस्तानचा विश्वविक्र मोडीत निघणार आहे. ५७,५०० राष्ट्रध्वज फडकवण्याचा विक्रम यापूर्वी पाकिस्तानच्या नावावर आहे.
Pakistan’s world record will be broken on Saturday by hoisting the highest number of national flags
सन १८५७ च्या स्वातंत्र्य संग्रामादरम्यान बाबू वीर कुंवर सिंह यांनी इंग्रजांवर विजय मिळवल्याचं स्मरण म्हणून विजयोत्सव साजरा केला जातो. यंदा साजरा होत असलेला स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या विजयोत्सवाला समर्पित करण्यात आला आहे. या विजयोत्सवाचं शनिवार, २३ एप्रिल रोजी आयोजन करण्यात आलं असून याला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थिती लावणार आहेत. जगदीशपूर येथील कुंवर सिंह यांच्या ऐतिहासिक किल्ल्यावर हा कार्यक्रम पार पडणार आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/524765462534521/
□ टॉयलेटमध्ये नंबर, शारीरिक संबंधांसाठी महिलेला आले 500 कॉल
कर्नाटकच्या एका महिलेला प्रचंड त्रास सहन करावा लागला आहे. महिलेच्या सहकार्यांनी तिचा फोन नंबर आणि ईमेल आयडी काही जिल्ह्यातील सार्वजनिक टॉयलेट आणि बस स्टँडच्या भिंतीवर लिहिला. त्यानंतर या महिलेला 500 पेक्षा जास्त फोन आले आणि तिच्याकडे शारीरिक संबंधाची मागणी करण्यात आली. आरोपींनी पीडितेला अश्लील मेसेजही पाठवले. या प्रकरणी पोलिसानी तीन आरोपींना अटक केली आहे.