Tuesday, January 31, 2023
Surajya Digital
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

अजित पवारांनी टोचले अमोल मिटकरींचे कान

राज्यभर ब्राम्हण समाज आक्रमक

Surajya Digital by Surajya Digital
April 22, 2022
in Hot News, महाराष्ट्र
0
अजित पवारांनी टोचले अमोल मिटकरींचे कान
0
SHARES
186
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

पुणे :  आमदार अमोल मिटकरी यांच्या वादग्रस्त विधानाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवारांना विचारला असता, त्यांनी अप्रत्यक्ष मिटकरींना सल्ला दिला आहे. मी वारंवार सांगत असतो की कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्याने बोलताना तारतम्य ठेऊन बोललं पाहिजे. आपल्या बोलण्यातून कुठल्या समाजाबद्दल घटकांबद्दल अवमान होणार नाही याची काळजी घ्यायला हवी, असे अजित पवार म्हणाले आहेत.

पुण्यात एका कार्यक्रमानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार आले होते. यावेळी त्यांना अमोल मिटकरी यांच्या ब्राह्मण समाजाबद्दलच्या वक्तव्याबद्दल विचारलं असता ते संतापले. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलेल्या विधानाबाबत बोलताना कुठल्याही राजकीय क्षेत्राच्या व्यक्तीने मत व्यक्त करत असताना कुठल्याही समाजाच्या तसेच कुठल्याही घटकाबद्दल बोलताना तारतम्य ठेवूनच बोललं पाहिजे असं अजित पवार म्हणाले.

राष्ट्रवादीचे आमदार गेल्या दोन दिवसांपासून चांगलेच चर्चेत आहेत. मिटकरी यांनी राष्ट्रवादीच्या परिवार संवाद मेळाव्यात ब्राम्हणांची नक्कल केली त्यावरून राज्यात मोठा वाद सुरु झाला आहे.

कोणत्याही राजकीय पक्षाच्या व्यक्तींनी मत व्यक्त करत असताना कुठल्या समाजाबद्दल, घटकाबद्दल अपमान होईल किंवा नाराजी वाढेल, असे न करता तारतम्य बाळगूनच वक्तव्ये केली पाहिजेत”, असे पत्रकार परिषदेत बोलत असताना अजित पवार यांनी अमोल मिटकरींना यावेळी टोला लगावला आहे.

Ajit Pawar pierces Amol Mitkari’s ear

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

अजित पवार म्हणाले, ‘माझं नेहमी स्पष्ट मत असतं आणि तुम्हा सर्व मीडियाला माहिती आहे. तुम्ही नेहमी मला असले प्रश्न विचारत असता की याने असं वक्तव्य केलं त्याबद्दल तुमचं मत काय आहे. कोणत्याही राजकीय पक्षाच्या व्यक्तींनी मत व्यक्त करत असताना कुठल्या समाजाबद्दल, घटकाबद्दल अवमान होणार नाही तसंच नाराजी वाढणार नाही याचं तारतम्य ठेवूनच वक्तव्यं केली पाहिजेत.

अमोल मिटकरी यांनी कन्यादानासंदर्भातील केलेल्या वक्तव्यामुळे विरोधकांकडूनही टीकेची झोड उठत आहे. यावर बोलताना अमोल मिटकरी म्हणाले की, ‘माझ्या बोलण्याचा भाजप आणि काही इतर संघटनांनी विपर्यास करून सांगितला. तसंच मला माफी मागायला सातत्याने सांगितलं जात आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचीही बदनामी करीत आहे.
माझ्या पक्षाची अशी शिकवण नाही. तसेच शिव, शाहू फुले आंबेडकर, आण्णाभाऊ साठेंनी अशी कुणा धर्माविरूद्ध बोलावं अशी शिकवण दिलेली नाही’. असंही मिटकरी यांनी म्हटलं आहे. दरम्यान अमोल मिटकरी यांनी माफी मागण्यास नकार दिला आहे. ज्यांनी माझ्यावर आरोप केले आहेत, त्यांनी व्हिडिओ पूर्ण पाहावा, मी कोणत्याही समाजाचं नाव घेतलं नाही, याला कोणीही जातीय किंवा राजकीय रंग देण्याचं काम करु नये असं मिटकरी यांनी म्हटलं होतं.

अमोल मिटकरींच्या या विधानावर ब्राम्हण समाज आक्रमक झाला आहे.  मिटकरी यांनी माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली आहे. मिटकरींनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ पुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं. आज सोलापुरात ब्राम्हण समाजाने पोलिसात निवेदन देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. गुन्हा दाखल न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ब्राम्हण समाजाने दिला आहे.

ऐका आणि पहा हा खालील व्हिडिओ

 

 

Tags: #AjitPawar #pierces #AmolMitkari's #ear#अजितपवार #टोचले #अमोलमिटकरी #कान
Previous Post

मोहोळ : बस आणि जीपचा भीषण अपघात, दोन ठार

Next Post

जिल्हास्तरीय निवड बुद्धिबळ स्पर्धेत सोलापुरातील मुलांचे यश

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
जिल्हास्तरीय निवड बुद्धिबळ स्पर्धेत सोलापुरातील मुलांचे यश

जिल्हास्तरीय निवड बुद्धिबळ स्पर्धेत सोलापुरातील मुलांचे यश

वार्ता संग्रह

April 2022
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
252627282930  
« Mar   May »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697