□ जोडव्यांचे जुने वण दिसताच टोळीला फुटला 4 घाम
मोहोळ : लग्न लावून देतो म्हणून बनावट नवरी उभी करून पंधरा हजाराची फसवणूक करण्यात आली. यातून बनावट नवरी उभी करून फसवण्याचा गोरखधंदा उघड झाला आहे. हा प्रकार मोहोळमध्ये उघडकीस आला आहे. यात सातजणांविरूद्ध पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
याप्रकरणी नवरीसह सात जणांविरुद्ध मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहोळ पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, खंडोबाची वाडी (अनगर) तालुका मोहोळ येथील बंडु महिपती नरके यांचे लग्न जमवण्यासाठी त्यांनी एजंट युवराज विठ्ठल जमदाडे ( रा. भोसे, करकंब) याला लग्न जमण्यासाठी सांगण्यात आले. तेव्हा त्यांनी लग्न लावण्यासाठी सव्वा लाख रुपये द्यावे लागतील, मुलगी दाखवल्यावर पाच हजार वेगळे द्यावे लागतील, साखरपुडा ठरल्यास वीस हजार रुपये द्यावे लागतील, असे सांगितले आणि त्यांनी बंडू नरके यांना मुलगी पाहण्यासाठी केव्हा येतो, अशी विचारणा केली.
दुस-या दिवशी मुलगी पाहण्यासाठी सोलापूर येथे बोलवले युवराज जमदाडे हे एका महिलेसह एसटी स्टँडवर आले तेव्हा बंडू नरके व त्याचा चुलत भाऊ मामा भावजय यांना एजंट जमदाडे यांना मुलगी दाखवली व तिचे नाव स्वाती पवार असे सांगितले व ती पसंत आहे का ? अशी विचारणा केली व तिचे आई वडील मयत झाले आहेत. तिचे नातेवाईक आम्हीच आहोत असे सांगून पसंती आहे. तर आता वेळ कशाला घालवता साखरपुडा करून टाकू, असे म्हणून साखरपुड्याचा कार्यक्रम केला आणि १९ एप्रिल रोजी लग्नाची २४ तारीख काढण्यात आली.
Mohol: The trick of making a fake bride and cheating; Read agent’s rate card
https://www.facebook.com/109399567404448/posts/528059368871797/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
त्यादिवशी घरासमोर लग्न मंडप टाकून लग्नाची तयारी जोरदार केली. दुपारी एक वाजता लग्न असल्याने सर्वजण मुलीची वाट पाहत असताना आमची गाडी स्वराज्य हॉटेल जवळ बंद पडल्यामुळे आम्ही एसटीने अनगर येथे आलो आहोत. आम्हाला गाडी पाठवा म्हणून सांगितले. मुलीला व पाहुण्यांना आणण्यासाठी गाडी, पाठवली. पाहुणे मंडळी लग्नात पोहचली पण लग्नात नवरी उभी करताना तिच्या पायात जोडवे घालताना नातेवाईकांना पूर्वी जोडवे घातलेले वण आढळले. याबाबत चौकशी केली असता मुलीस मराठी येत नाही म्हणून सांगितले.
पण मुलीची अधिक चौकशी केली असता मुलीचे खरे नाव सायरा रफिक शेख (वय २५ रा. बिडी घरकुल सोलापूर) असे तिने सांगितले. तेव्हा आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आले व खोटी नवरी खोटी मुलगी दाखवून १५ हजार रुपयांची फसवणूक केली म्हणून बंडू महिपती नरके यांनी एजंट युवराज विठ्ठल जमदाडे (रा भोसे करकंब), नवरीचा भाऊ सर्फराज सलीम ( रा कुमठा नाका सोलापूर), चैतन्य प्रल्हाद गायकवाड (रा शाहीर वस्ती भवानी पेठ ), शिवगंगा चैतन्य गायकवाड, (रा. शाहीर वस्ती, सोलापूर), शुभांगी सोमनाथ अधाटराव (रा. शिरापूर तालुका मोहोळ) व महानंदा चितानंद म्हेत्रे (रा. बिडी घरकुल सोलापूर) अशा सात जणाविरोधात मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात करण्यात असून सदर घटनेचा पुढील तपास पोहेका मुसळे हे करीत आहेत.
यातून एजंटगिरीची पोलखोल झाली आहे. लग्न लावण्यासाठी सव्वा लाख रुपये द्यावे लागतील, मुलगी दाखवल्यावर पाच हजार वेगळे द्यावे लागतील, साखरपुडा ठरल्यास वीस हजार रुपये द्यावे लागतील, अस रेटकार्डच त्याने वाचून दाखवले होते. मात्र लोकांनी अशा एजंटगिरीला न फसता नातेवाईक आणि सर्व सदस्यांना माहिती देऊनच स्थळ शोधावीत. त्यामुळे अशी फसवणूक टाळता येऊ शकते.
https://www.facebook.com/109399567404448/posts/528260355518365/